Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Pilot म्हणजे काय ? पायलट कसे बनावे शिक्षण, फी संपूर्ण माहिती how to become a pilot in marathi

पायलट कसे व्हायचे याची संपूर्ण माहिती


आपली लहानपणापासूनच खूप मोठ मोठी स्वप्ने असतात, कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनियर, कुणाला शिक्षक, कुणाला पायलट, कुणाला वैज्ञानिक, कुणाला उद्योजक व्हायचे असते, पण ते स्वप्न कसे साकार करायचे हेच कळत नसते. कारण ती स्वप्ने साकार करण्यासाठी काय करावे, कोणते शिक्षण घ्यावे हेच त्यांना माहीत नसते त्यामुळे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात. जर तुम्हालाही इतरांप्रमाणे pilot व्हायचे असेल, विमान उडवायचे असेल व pilot kase vhave याची माहिती नसेल तर आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला pilot kase banave, pilot bananyasathi konate shikshan ghyave आणि त्यासाठी किती वेळ लागतो इत्यादीची माहिती येथे दिली आहे.


How to become a pilot step by step in Marathi

चांगले वैमानिक बनणे इतके सोपे नाही, यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, आता अनेक प्रकारचे पायलट आहेत, काही हवाई दलाचे पायलट आहेत, काही व्यावसायिक पायलट आहेत, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विमाने उडवतात. ही एक वेगळी प्रक्रिया आहे, त्यामुळे येथे आम्ही तुम्हाला पायलट कसे व्हावे याबद्दल माहिती देत ​​आहोत, त्याआधी  pilot mhanje kay आणि pilot बनण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे ते जाणून घेणे आवश्यक आहे.

पायलट म्हणजे काय? what is pilot in marathi? पायलट ( Pilot ) कोणाला बोलतात?

सर्वप्रथम आपण pilot म्हणजे काय याबद्दल बोलू?  विमानाच्या चालकाला इंग्रजीत 'Pilot' म्हणतात. सर्व वैमानिकांना पायलट म्हणतात. विमान चालकाला विमान पायलट म्हणतात, हेलिकॉप्टर चालकाला हेलिकॉप्टर पायलट म्हणतात.

एक विमान चालक किंवा pilot विमानाचे उड्डाण करून प्रवासी आणि त्यांचे सामान कमीत कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो. अनेक विमान कंपन्या त्यांचे विमान उडवण्यासाठी पायलट नेमतात. भारतात एअर इंडिया, इंडिगो, स्पाईस जेट, गो एअर, एअर एशिया इंडिया इत्यादी अनेक सुप्रसिद्ध विमान कंपन्या आहेत.

पायलटचा अभ्यास आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या कंपन्यांमध्ये पायलट होऊन तुम्ही विमान उडवू शकता. विमानाचा पायलट बनून, चांगला पगार मिळवून, तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. आणि आई-वडिलांचे नाव रोशन करू शकतो.

पायलट कसे बनावे how to become a pilot in marathi


पायलट होण्याचे दोन मार्ग आहेत; सैन्यामध्ये हवाई दलाचा पायलट बनून किंवा इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट सारख्या विमान कंपनीत व्यावसायिक पायलट बनून तुम्ही तुमचे करिअर करू शकता. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांना बारावीनंतर विमान वाहतूक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी दहावीत  चांगल्या गुणांसह उत्तीर्ण व्हावे लागेल. त्यानंतर पायलट होण्यासाठी विद्यार्थ्याला 11वी आणि 12वीत Physics Chemistry आणि Maths या विषयांसह अभ्यासक्रम निवडून चांगले गुण मिळवावे लागतील. बरोबरच तुमची इंग्रजी बोलण्यातही चांगली प्रभुत्व असणे आवश्यक आहे तुम्हाला उत्तम प्रकारे इंग्रजी बोलता आली पाहिजे. जवळजवळ सर्व फ्लाइंग इन्स्टिट्यूट science असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात, परंतु काही फ्लाइंग संस्था वाणिज्य पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात.

पायलट होण्यासाठी कोणती पात्रता असावी

Pilot होण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते ती पुढील प्रमाणे.
12 वि मध्ये physics chemistry आणि maths या विषयांसह 12वी मध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
उंची किमान ५ फूट असावी.
तुमची डोळ्यांची दृष्टी परिपूर्ण असणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला commercial pilot व्हायचे असेल तर तुमचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे असावे.
त्याचप्रमाणे हवाई दलाचा पायलट होण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा १७-१९ वर्षे आणि २०-२४ वर्षे असावी.
तुम्हाला इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असले पाहिजे, तुम्हाला इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता आली पाहिजे.
उमेदवाराला इतर कोणताही गंभीर आजार नसावा.

पायलट कसे व्हायचे याची संपूर्ण माहिती

1. विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण
जर तुम्हाला 12वी नंतर पायलट व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला 12वीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, ती सुद्धा विज्ञान विषयात physics, chemistry आणि maths सह 12 वि मध्ये चांगले गुण मिळवावे लागतील. तुमच्या बारावीत किमान 50% गुण असणे खूप महत्वाचे आहे. काही ठिकाणी कॉमर्स च्या विद्यार्थ्यांना ही पायलट training institute मध्ये प्रवेश मिळतो.

2. विद्यार्थी पायलट परवान्यासाठी अर्ज करा
तुम्ही 12वी पास होताच, त्यानंतर तुम्हाला पायलट होण्यासाठी student pilot License साठी थेट अर्ज करावा लागेल, ज्याला SPL देखील म्हणतात, यासाठी तुम्हाला DGCA म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन साठी भारतातील कोणतेही कॉलेज असेल. तुम्ही त्यात प्रवेश घेऊन, त्यात प्रवेश परीक्षा पास करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला वैद्यकीय चाचणी देखील द्यावी लागेल, त्यानंतरच तुम्ही SPL साठी अर्ज करू शकता.

3. खाजगी पायलट परवान्यासाठी आता अर्ज करा
खाजगी पायलट परवान्यासाठी अर्ज करन्यासाठी तुम्हाला  SPL पास करावी लागेल, private pilot licence ज्याला आम्ही (PPL) देखील म्हणतात. नंतर येथे देखील तुम्हाला पायलट होण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल आणि तुमचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.

पायलट होण्यासाठी कौशल्य

पायलट होण्यासाठीची कौशल्ये खाली दिली आहेत ज्याची पायलट होण्यासाठी खूपच उपयुक्तता असते. तरच तुम्ही एक यशस्वी pilot बनू शकता.

 1. मजबूत तांत्रिक कौशल्ये.
 2. गंभीर विचार आणि निर्णय घेणे.
 3. परिस्थितीजन्य आणि पर्यावरणीय जागरूकता.
 4. चांगले संवाद कौशल्य.
 5. अत्यंत लक्ष केंद्रित आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व.
 6. उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील.
 7. उच्च प्रमाणात लवचिकता.
 8. मानसिक स्थिरता आणि शारीरिक तंदुरुस्ती.
 9. टीमवर्कची चांगली जाणीव.
 10. जन्मजात किंवा शिकलेली नेतृत्व गुणवत्ता.

कमर्शियल पायलट कसे व्हावे


कमर्शिअल पायलटची नोकरी ही खूप जबाबदारीची नोकरी असते. तथापि, व्यावसायिक पायलट झाल्यानंतर, तुमचा आकाश प्रवास सुरू होतो आणि त्यानंतर तुम्ही मोठी विमाने उडवण्यास सुरुवात करता. कमर्शिअल पायलट मध्ये तुमचा पगार देखील खूपच आकर्षक असतो. कमर्शिअल  पायलटबद्दल बोलायचे तर व्यावसायिक पायलट मध्ये तुम्ही मोठमोठी मालवाहू विमाने, मोठी प्रवासी जेट आणि चार्टर्ड विमाने उडवतात.

कमर्शिअल पायलटचे स्थान विमानाच्या कॉकपिटमध्ये असते, परंतु विमानाच्या कॉकपिटपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्याना अनेक प्रकारचे परवाने घ्यावे लागतात. त्यासाठी त्याला सुरुवातीपासूनच चांगला अभ्यास करने गरजेचे असते, त्यानंतरच तुम्ही व्यावसायिक पायलट बनू शकता.

कमर्शियल पायलट बनण्यासाठी तुम्हाला व्यावसायिक पायलट परवान्यासाठी अर्ज करावा लागेल.
तुम्ही (SPL) आणि (PPL) चे प्रशिक्षण पूर्ण करताच व्यावसायिक पायलट होण्यासाठी थेट commercial pilot licence साठी अर्ज करावा लागेल. commercial pilot licence मिळवण्यासाठी तुम्हाला काही परीक्षा द्याव्या लागतील. परीक्षा उत्तीर्ण होताच त्यानंतर तुम्हाला commercial pilot licence मिळेल.

Pilot होण्यासाठी किती खर्च येतो

तर इथे लोकांना प्रश्न पडतो की पायलट होण्यासाठी किती खर्च येतो, त्यामुळे पायलट व्हायचे असेल तर खूप खर्च येतो, त्यासाठी सुमारे 20 लाख ते 25 लाख खर्च येतो, म्हणजेच जर तुम्ही पायलट होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचा बँक बॅलन्स चांगला असावा लागेल. काही फ्लाइंग स्कूल शिष्यवृत्ती देतात पण त्या फार कमी प्रमाणात आहेत.

पायलट होण्यासाठी किती वेळ लागतो

पायलट होण्यासाठी, तुम्हाला फ्लाइंग क्लबमध्ये प्रवेश घ्यावा लागेल जो डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) आणि भारत सरकार द्वारे मान्यताप्राप्त आहे. त्याच बरोबर, तुम्हाला विद्यार्थी पायलट परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. पायलट होण्यासाठी प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला भारतात पायलट होण्यासाठी किमान 2 ते 3 वर्षे लागतात.

भारतातील पायलट प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम शाळा

भारतामध्ये pilot honyasathi खूप असे इन्स्टिट्यूट आहेत, ज्या मध्ये प्रवेश घेऊन त्याचा अभ्यास करून तुम्ही pilot बनू शकता.
भारतातील काही खास pilot प्रशिक्षण संस्था ची नावे पुढील प्रमाणे :-

 • Bombay Flying Club ( Mumbai )
 • Madhya Pradesh Flying Club ( Indore, Bhopal )
 • Rajiv Gandhi Academy of aviation technology ( Thiruvananthapuram )
 • Indira Gandhi Rashtriya Uran Academy ( Uttar Pradesh )
 • CAE Oxford Aviation Academy ( Bangalore )
 • IndiGo cadet training programme ( Hyderabad )
 • Thakur Institute of Aviation Technology ( Mumbai )
 • Government Flying Club ( Mumbai, Nagpur )
 • National Flight Training Institute ( Maharashtra )
 • Ahmedabad aviation Aeronautics Limited ( Ahmedabad )
 • Government Aviation Training Institute ( new Delhi, mumbai, bengluru )
 • Orient flying school ( Karnataka )
 • Institute of aviation and aviation safety ( mumbai )
 • Asiatic International Aviation Academy, Indore
 • Blue Diamond aviation, Pune
 • Acumen School of pilot training, Delhi
 • International School of aviation, New Delhi
 • Indian Aviation Academy, Mumbai

जेव्हा तुम्ही Pilot training पूर्ण करता आणि तुम्हाला परवाना मिळतो, त्यानंतर तुम्ही कोणत्याही एअरलाइन कंपनीमध्ये पायलट ची नोकरीसाठी अर्ज करू शकता.

Pilot Career Options पायलट करिअर पर्याय


जर तुम्हाला पायलट म्हणून करिअर करायचे असेल तर तुमच्यासमोर करिअरचे अनेक पर्याय असतील. तुम्ही तुमच्या आवडत्या जागी काम करू शकता, ज्यांची यादी खाली दिली आहे. :-

 • Government Service pilot
 • Law enforcement pilot
 • Military pilot
 • Commercial airline pilot
 • Cargo pilot
 • Charter pilot and air taxi
 • Flight instructor
 • Medical and air ambulance pilot
 • Test pilot
 • Drone pilots
इत्यादी करिअर चे ऑपशन्स तुमच्या समोर खुले होतात, तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी तुमचे करिअर करू शकता.

पायलट चा पगार किती असतो? Pilot sallary

तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की एका pilot चा पगार किती असेल. हा पगार पायलटची पोस्ट प्राधान्य आणि ज्या ठिकाणी काम करतो त्या एअरलाइनवर अवलंबून असतो. तरीही आम्ही तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती देतो ती पुढील प्रमाणे.
सर्वप्रथम, तुम्हाला ज्युनियर फर्स्ट ऑफिसरचे पद मिळते जिथे पगार दरमहा जवळपास एक लाख रुपयांपर्यंत असतो. जेव्हा तुम्ही फर्स्ट ऑफिसर होता तेव्हा तुम्हाला मासिक वेतन दोन लाख रुपये मिळू लागतात.


एका सिनियर फर्स्ट ऑफिसरला 3.5 लाख रुपये आणि कॅप्टनला 6-7 लाख रुपये महिन्याला मिळतात.
त्यामुळे पायलट झाल्यावर तुम्हाला किती चांगला पगार मिळतो हे तुम्हीच ठरवू शकता.

निष्कर्ष

खूप शिकून मोठ्या पदावर नोकरी मिळवण्याचे स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असते. सरकारी असो किंवा खाजगी क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला नेहमीच उच्चस्तरीय नोकरी मिळवायची असते.

आजच्या लेखात, आम्ही तुम्हाला pilot mhanje kay? Pilot kase banave? पायलट बनण्यासाठी काय करावे कोणते शिक्षण घ्यावे फी किती असते?  याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडली असेल. आमच्या या लेखाशी संबंधित कोणाला काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site