Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Gb whatsapp वापरताय तर रहा सावधान hack होऊ शकत अकाउंट - whatsapp अकाउंट कायमच होईल ब्लॉक

GB WhatsApp काय आहे? Download करण्याआधी जाणून घ्या सर्व माहिती. What is GbWhatsapp 


भारतातच नव्हे तर जगभरात whatsapp चे वापरकर्ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. चॅटिंग सोबतच अन्य महत्वाची कामे म्हणजे document पाठवणे, एखादी माहिती share करणे whatsapp वर मोठ्या प्रमाणात होते. काही काळापूर्वी हे app त्याच्या नवीन गोपनीयता धोरणामुळे वादात सापडले होते. त्यावेळी अनेक लोक इतर अँप्सकडे वळले होते. मात्र तरीही देशात Whatsapp चे users मोठ्या संख्येने आहेत आणि whatsapp चा वापर आणखीच वाढत आहे. या दरम्यान, गुगलवर GB Whatsapp हे अँप ट्रेंड करत आहे. ते का  GB Whatsapp वापरणे किती योग्य आहे GB Whatsapp che fayde v nuksan काय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.


What is GB whatsapp - GB Whatsapp काय आहे ?


सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगतो की जीबी व्हाट्सअप्प ही ओरिजिनल व्हाट्सअप्प ची कोणतीही अपडेटेड आवृत्ती नाही आहे. GB Whatsapp ही थर्ड पार्टी पक्षांनी विकसित केलेली WhatsApp च moded version आहे. तुम्ही याला एक प्रकारे Whatsapp चा clone म्हणू शकता, GB Whatsapp चे फंक्शन्स Whatsapp सारखेच आहेत पण यात काही अतिरिक्त features देखील वाढवलेले आहेत. जेणेकरून users त्यांच्या सोयीनुसार GB whatsapp ला कस्टमाइझ करू शकतील. त्याची theme, icon, fonts ते बदलू शकतात. पण तुम्हाला माहीत नसेल की GB whatsapp चे फिचर्स जितके आकर्षक वाटतात तितकेच ते आपल्यासाठी, आपल्या privacy साठी अधिक धोकादायक ठरू शकतात. कारण, त्याचा वापर केल्याने तुमच्या डेटामध्ये बिघाड होऊ शकतो.

GB whatsapp ला Has.007 नावाच्या वरिष्ठ XDA ने विकसित केले आहे. Gb whatsapp ला थेट Google Play store वरून डाउनलोड केले जाऊ शकत नाही. त्याला त्याच्या website वरून त्याची APk file शोधून डाउनलोड केले जाऊ शकते आणि आपल्या फोनमध्ये install केले जाऊ शकते. तथापि, असे Mod अँप्स व हे अँप्स वापरण्याची शिफारस केलेली नाही.

GB Whatsapp चे फायदे

तुम्ही तुमच्या आवडीनुसार GB Whatsapp ला कस्टमाइज करू शकता.
तुम्ही तुमचा status लिहिण्यासाठी तुम्ही 250 शब्दांचा वापर करू शकता.
जीबी व्हाट्सअप्पमध्ये तुम्ही मोठ्या आकाराच्या फाइल्स आणि फोल्डर्स सहजतेणे पाठवू शकता.
जर तुम्ही एखाद्याला मेसेज केला असेल व त्याला समोरच्याने न पहावे असे वाटले असेल व तो msg डिलीट करायचे असेल  तर तुम्ही तुमचे मेसेज डिलीटही करू शकता.
Gb whatsapp चा एक फायदा असा देखील आहे की तुम्ही त्यात 30 Mb पेक्षा जास्त फाइल्स आणि डेटा पाठवू शकता.

GB WhatsApp चे तोटे काय आहेत - Gb Whatsapp ke nuksan


Gb whatsapp हे एक mod version app आहे, हे अँप वापरण्याचा तोटा म्हणजे ते तुमचे मूळ WhatsApp खाते कायमचे ब्लॉक करू शकते. तसेच सायबर तज्ज्ञांनी असे अँप  वापरणे धोकादायक मानले आहे.
असे mod apk वापरणे तुमच्या privacy साठी धोकादायक ठरू शकतात. तुमचा private data लिक होण्याची शक्यता असू शकते असे ciber expert यांचे म्हणणे आहे.

Gb Whatsapp ची वैशिष्ट्य Best features of gb whatsapp 

1). Auto reply 

GB whatsapp च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर ऑटो रिप्लाय फीचर यात उपलब्ध आहे तुम्हाला कोणता msg आला तर सेट केलेली उत्तरे त्यात  ऑटोमॅटिकली दिली जात असत.

2). Whatsapp Story an Status saver

तुम्ही तुमच्या डिव्हाइसमध्ये इतरांनी ठेवलेली कोणतीही WhatsApp स्टोरी किंवा status सेव्ह करू शकता. यात कोणाचेही स्टेटस कॉपी करता येते.


3). Theme Change

तुम्ही Whatsapp च्या होम स्क्रीनची theme बदलू शकता! तसेच, आणि तुमची आवडती थीम सेट करू शकता व GB Whatsapp ला तुमच्या आवडीनुसार कलरफुल करू शकता.

4). Hide Bluetick

जेव्हा आपल्याला एखाद्याचा संदेश प्राप्त होतो आणि तो वाचतो तेव्हा आपल्याला whatsapp वर Bluetick पहायला मिळते, परंतु Gb whatsapp मध्ये आपण सेटिंग करून ती ब्लूटिक लपवू शकता.

5). Hide typing

जेव्हा आपण एखादा मेसेज टाईप करत असतो तेव्हा दुसऱ्या युजरला whatsapp वर typing ची खूण दिसते! पण GB WhatsApp मध्ये आपण ही typing खूण लपवू शकतो.


6). Hide Seen Status

जेव्हा तुम्ही GB WhatsApp वापरत असताना दुसऱ्यांचे WhatsApp स्टेटस पाहता, तेव्हा तुम्ही तो status पाहिलात की नाही याची माहिती स्टेटस ठेवलेल्या व्यक्तीला मिळत नाही. 


7). Always online

GBWhatsapp मध्ये तुम्ही स्वतःला 24 तास Whatsapp वर ऑनलाइन दाखवू शकता! यामुळे अन्य व्यक्ती तुम्हाला कधीही मेसेज करतील,

8). Stop Internet

जर तुम्हाला काही काळासाठी व्हाट्सअप्प बंद करायचे असेल, तर तुम्ही Gbwhatsapp मध्ये इंटरनेट बंद करून थोड्या काळासाठी whatsapp बंद करू शकता. पण बाहेर तुमचे इंटरनेट चालूच असेल.


इतकेच नाही तर यामध्ये वापरकर्त्यांना इतर अनेक प्रकारचे कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या कारणास्तव बरेच वापरकर्ते देखील वापरतात. मात्र, त्याचा वापर धोकादायक ठरू शकतो.

Dont download GB Whatsapp 

आपनाला जेव्हा एखादे अँप डाउनलोड करायचे असते, तेव्हा ते मोबाइलच्या प्ले स्टोअर मधून डाउनलोड करतो. पण GB Whatsapp हे mod apk व third party अँप असल्याकारणाने ते प्ले स्टोर वर उपलब्ध नाहीये. तुम्ही गब whatsapp ला play store वरून डाउनलोड करू शकत नाही. GB WhatsApp Download 2022 new Version साठी तुम्ही त्याच्या website वरून GB WhatsApp सहजपणे डाउनलोड करू शकता.

Developer of Gb Whatsapp : GBWhatsapp ला कोणी बनवले 

GBWhatsApp चा मालक कोण आहे? Gbwhatsapp कोणी तयार केले हा प्रश्न तुमच्यापण मनात आला असेलच. GBWhatsApp ला सीरिया मधील अँड्रॉइड प्रोग्रामर आणि डेव्हलपर Omar याने बनवले आहे असे म्हणतात. पण काहींचे असे म्हणणे आहे की याला whatsapp चा mod version एका सिनिअर XDA member Has.007 याने बनवले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site