Ad code

Latest

6/recent/ticker-posts

सोरायसिस म्हणजे काय? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय. What is Psoriasis in marathi

Psoriasis : सोरायसिस म्हणजे काय? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय.


जगात असे अनेक आजार आहेत, जे खूप धोकादायक आहेत. यामध्ये HIV, कॅन्सर, मधुमेह, क्षयरोग इ. आजार आहेत. तसेच त्वचेशी संबंधित सोरायसिस हा देखील एक गंभीर रोग आहे. हा आजार माणसाला कोणत्याही वयात होऊ शकतो, पण सामान्यतः हा आजार वयस्क लोकांमध्ये जास्त दिसून येतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोरायसिस हा मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आहे. असे म्हटले जाते की हा आजार रोगप्रतिकारक शक्ती आणि अनुवांशिक कारणांमुळे  कोणालाही होऊ शकतो आणि त्याचा परिणाम शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. म्हणून, त्याच्या लक्षणांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया soraysis mhanje kay त्याची लक्षणे, सोरायसिस कशामुळे होतो, सोरायसिस वरती उपाय काय आहेत आणि त्याच्याशी संबंधित इतर धोके कोणते आहेत.

सोरायसिस म्हणजे काय? What is Psoriasis in marathi :-

सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे जो कोणत्याही वयात होऊ शकतो. ही त्वचेची अशी स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेच्या पेशी असामान्य पातळीवर वाढत जातात. सामान्यत नवीन पेशी बनत जातात म्हणजेच पेशींचे पुनरुत्पादन (Cell regeneration) होते, आणि मृत त्वचेच्या पेशींचे संतुलन होते. त्वचेच्या पेशी असामान्यपणे वाढू लागल्या की, ते त्वचेवरती वाढतात आणि मरतात. या आजारात त्वचेवर लाल रंगाचा जाड थर तयार होतो, जो पुरळ उठल्यासारखा दिसतो. या पुरळांमध्ये खाज सुटण्यासोबत वेदना आणि सूज देखील जाणवू शकते.

साधारणपणे सोरायसिस हे सहसा गुडघे, कोपर आणि कधीकधी आपल्या टाळूवर व शरीराच्या इतर भागावरही आढळतात. तज्ज्ञांच्या मते, शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास हा आजार होतो. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे यात त्वचेच्या पेशींची वाढ सामान्य विकासापेक्षा 10 पट वेगाने होते. पाहिल्यास, यावर कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु त्यांची सौम्य लक्षणे कमी करण्यासाठी काही खास उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही सोरायसिस पासून दूर राहू शकता.


सोरायसिसचे होण्याची कारणे काय आहेत? Psoriasis ka hoto? Psoriasis कश्यामुळे होतो.

Psoriasis infection होण्याचे कारण अद्याप कळलेले नाही, परंतु तज्ञांचे मते सोरायसिस होण्याचे कारण अनेक गोष्टींच्या संयोजनामुळे असू शकते. ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि अनुवांशिक घटक हे मुख्य आहेत. सोरायसिस संसर्गामध्ये, रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे तयार केलेल्या रक्त पेशी, ज्यांना टी-सेल्स देखील म्हणतात त्या चुकून निरोगी त्वचेच्या पेशींवर हल्ला करतात. ज्यामुळे ही स्वयंप्रतिकार स्थिती विकसित होते. तसेच काही लोकांमध्ये, ते त्यांच्या पालकांकडून किंवा कुटुंबाकडून मिळालेल्या अनुवांशिक जनुकांमुळेही सोरायसिस होऊ शकतो.


सोरायसिसची लक्षणे कोणती आहेत?  psoriasis symptoms in marathi.त्वचेवरील इतर रोगांपेक्षा सोरायसिस नावाचा रोग अतिक्रियाशील रोगप्रतिकारक शक्तीमुळे होतो, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी पेशी आणि ऊतींवर हल्ला करते. सोरायसिसची काही लक्षणे खाली दिली आहेत.
शरीराच्या काही सामान्य भागांमध्ये म्हणजेच गुढग्यावर, खोपरावर, तळहातावर तसेच इतर ठिकाणी खाज सुटते.
त्वचेवर कवचासारखा थर जमा होतो व तो थर जात राहतो.
शरीरावर लाल ठिपके आणि पुरळ येतात व खाज सुटते.
सोरायसिसवर कोणताही पूर्ण इलाज नाही, पण सोरायसिसच्या लक्षणांची तीव्रता कितीही असली तरी त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण करता येते. त्यामुळे सोरायसिसच्या लक्षणांबाबत जागरुकता असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची काही विशेष लक्षणे पाहिल्यानंतर या आजारावर उपचाराची प्रक्रिया सुरू करन सोरायसिस कमी होऊ शकतो.

सोरायसिसवर औषधीय उपचार काय आहेत?

सोरायसिस वर अजूनही खात्रीशीर औषध आलेलं नाहीये, परंतु युनानी औषध पद्धती अंतर्गत, डॉक्टर प्रभावित भागावर मलम किंवा तेल च्या स्वरूपात इमल्शन लावण्याचा सल्ला देतात. हे औषध हर्बल मिश्रण आणि नैसर्गिक घटक वापरून तयार केले जातात. हे त्वचेला मऊ करण्याचे काम करते यावर वेळीच त्वचेच्या जखमांवर औषध लावल्यास सोरायसिसपासून आराम मिळतो. जर तुम्ही मलम किंवा तेल वापरत असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय सोरायसिस असल्यास काही पथ्य पाळले व औषध घेतले तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. यामध्ये हिरवी मिरची, वांग,आंबवलेले पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, तळलेले व जास्त आंबट पदार्थ, नॉनव्हेज, दही, चीज ई. पूर्णपणे बंद करा व असा सल्ला डॉक्टर देतात आहारात गोड किंवा आंबट पदार्थ टाळण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.

सोरायसिसपासून मुक्ती मिळवण्यासाठी बाजारात अनेक औषधे व क्रीम उपलब्ध आहेत. पण यापासून विशेष आराम मिळत नाही. जर तुम्ही युनानी औषधाकडे वळलात तर ते सोरायसिसशी संबंधित समस्येवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहेत.


सोरायसिसच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत? Home remedies to get rid of psoriasis problem


सोरायसिसच्या समस्येवर मात करण्यासाठी खालील घरगुती उपाय वापरून तुम्ही सोरायसिस होण्यापासून दूर होऊ शकता तसेच सोरायसिस च्या सुरुवातीच्या लक्षणे घालवू शकता. चला जानुया psoriasis वर उपाय काय आहेत.

तुरटी- तुरटी मुळे psoraysis थोड्या प्रमाणात कमी करू शकता, यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात तुरटी मिसळा. व त्या पाण्याने आंघोळ केल्याने, सोरायसिसमुळे त्वचेवर येणार कोरडेपणा आणि खाज या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

कोरफड aloeVera - कोरफडचेऔषधी गुण खूप आहेत. कोरफड त्वचा सुधारण्यास, केसांना चमक देण्याबरोबरच एकंदर आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. सोरायसिसची समस्या दूर करण्यासाठी कोरफड खूप उपयुक्त आहे. ताज्या कोरफडीचा पल्प सोरायसिस झालेल्या त्वचेवर लावून मालिश केल्याने खूप फायदेशीर ठरू शकते.

हळद आणि गुलाब - त्वचा सुधारण्यासाठी आपण सर्वच हळद आणि गुलाबाचा फेस पॅक वापरतो, परंतु आयुर्वेदानुसार हळद आणि गुलाबाचे मिश्रण सोरायसिसच्या ठिकाणी लावल्यास फायदा होऊ शकतो.

या सोबतच सोरायसिससाठी प्रतिबंधात्मक काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही सोरायसिस पासून बरे होऊ शकता. कारण लवकर लक्ष दिल्यास रोग वाढण्यापासून रोखता येतो.

पूरक आहार घ्या
पूरक आहार तुम्हाला सोरायसिसची लक्षणे कमी करण्यात मदत करू शकतात. नॅशनल सोरायसिस फाउंडेशनच्या मते, फिश ऑइल, व्हिटॅमिन डी, दूध, कोरफड, द्राक्ष यांसारखे सप्लिमेंट्स घेतल्याने सोरायसिस मुळापासून नाहीसा होऊ शकतो.


त्वचा कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करा
सोरायसिस टाळण्यासाठी, आपली त्वचा कोरडी होऊ न देणे महत्वाचे आहे. संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी त्वचा मऊ ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर हा एक उत्तम मार्ग आहे.

मजबूत सुगंध टाळा
सुगंधित साबण आणि परफ्यूम वापरणे टाळा, कारण त्यातील रसायने आणि रंग तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकतात. त्यांचा मजबूत सुगंध सोरायसिसच्या लक्षणांना भडकावण्याचे काम करतो. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी असे साबण आणि परफ्यूम वापरणे टाळावे.

दारू पिणे टाळा
सोरायसिस टाळण्यासाठी, अल्कोहोलचे सेवन न करणे हा सर्वोत्तम उपचार आहे. जे लोक दर आठवड्याला पाच नॉनलाइट बिअर पितात त्यांना सोरायसिस होण्याची शक्यता दुप्पट असते. म्हणूनच डॉक्टर प्रथम या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना अल्कोहोल पिणे बंद करण्याचा सल्ला देतात.

तणाव कमी करा
सोरायसिस सारखी कोणतीही समस्या तणाव निर्माण करून त्यांची लक्षणे अधिकाधिक तीव्र करू शकते. त्यामुळे ताणतणाव शक्यतो कमी करा. यासाठी योगासने, ध्यानधारणा यासारखे व्यायाम खूप प्रभावी ठरतील.

जर तुमच्या मनात psoriasis mhanje kay, psoriasis kasa hoto, psoriasis chi lakshane किंवा psoriasis var upay या व्यतिरिक्त सोरायसिस बद्दल कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.

( all image credit :- Freepic.com )

[अस्वीकरण टीप: हा लेख विविध वैद्यकीय वेबसाइटवरून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तयार केला गेला आहे. तुमची जागरूकता आणि ज्ञान वाढवण्यासाठी लेखात समाविष्ट केलेली माहिती आणि तथ्ये सामायिक केली गेली आहेत. नादमराठी.इन लेखात दिलेल्या माहिती आणि उपायासाठी दावा करत नाही किंवा कोणतीही जबाबदारी घेत नाही. संबंधित विषयावर अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site