Ad code

Latest

6/recent/ticker-posts

प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे कमवा - Quora मधून पैसे कमावण्याचे मार्ग - Naadmarathi

Quora अँप काय आहे आणि Quora मधून पैसे कसे कमवायचे? What is Quora? And how to earn money from quora in 2022


माहितीची देवाणघेवाण तसेच आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म बद्दल, म्हणजेच quora वर आपण पैसे कमवू शकतो पण कसे, तेच आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. सोबतच Quora काय आहे, Quora मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल बोलणार आहोत.

आजकाल, ऑनलाइन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. या ऑनलाईन पैसे कमावण्याच्या मार्गामध्ये Quora चे देखील खूप महत्वाचे योगदान आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त प्रश्न विचारून आणि उत्तरे देऊन खूप पैसे कमवू शकता. Quora app वरून पैसे कसे कमवायचे, फक्त तुमच्या एका उत्तराने तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात, Quora ही इतकी powerful वेबसाइट आहे की, ती तुमच्या उत्तराला खूप लवकर रँक करते. तुमच्यापैकी अनेकांना quora बद्दल माहिती असेलही, येथे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्याचा वापर करू शकता. तुमच्याकडे कुठला प्रश्न असेल तर येथे विचारू शकता, तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल.
जर तुम्हाला Quora वरून पैसे कसे कमवायचे ते जाणून घ्यायचे असेल तर ही पोस्ट पूर्ण वाचा.

Quora काय आहे? What is quora in marathi?


Quora ही जगातील 81 व्या क्रमांकावर असलेली सर्वात मोठी वेबसाइट आहे.  जी जगभरातील लोक आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी वापरतात. Quora वर 7 कोटींहून अधिक ऑरगॅनिक कीवर्ड Google वर रँक करतात आणि 12 कोटीहून अधिक ट्रॅफिक या website वर येते. सोप्या भाषेत बोलायचे तर Quora हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही विषयावर प्रश्न विचारू शकता, आणि त्या बदल्यात Quora तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देते.

यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की Quora कोणत्या प्रकारची आणि किती मोठी website आहे. त्यामुळे तुम्हाला Quora अँप म्हणजे काय हे नक्कीच समजले असेल.

Quora चे संस्थापक कोण आहेत?

Quora चे संस्थापक म्हणजेच ज्यांनी quora ला बनवले त्यांनी सुरुवातीला Facebook मध्ये काम केले आहे, Adam DiAngelo आणि Charlie Cheever, ज्यांनी facebook मधील नोकरी सोडून स्वतःच काहीतरी करावं यासाठी 2009 मध्ये Quora ही website तयार केली व 2010 मध्ये quora लॉन्च झाला होता.
Quora चे निर्माते चार्ली चीवर सांगितात की त्यांनी Quora साठी एक वेगळं नाव ठरवल होत. पण ते नाव थोडे विचित्र आणि मोठे होते. पण Quora हे नाव बोलायला सुद्धा खूप चांगलं होतं आणि ते लहान पण होतं, म्हणून त्या लोकांनी Quora असं नाव दिलं, आज Quora हा एक Question Answer Forum बनला आहे ज्यामध्ये पैसे कमवण्याचे पर्याय आहेत.

Quora मधून पैसे कसे कमवायचे – Quora Se Paise Kaise Kamaye in marathi


Quora मधून पैसे कमावण्याचे 7 सर्वोत्तम मार्ग खालीलप्रमाणे आहेत -
2022 मध्ये quora मधून पैसे कसे कमवायचे?
  • Quora Space द्वारे
  • Quora Partner Program द्वारे
  • Blog Promotion द्वारे
  • Affiliate Marketing द्वारे
  • E-book selling द्वारे
  • Advertising द्वारे
  • Refer करून पैसे कमवा

मित्रांनो, तुम्हाला Quora द्वारे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सापडतील, ज्याप्रमाणे तुम्ही Youtube आणि ब्लॉग द्वारे कमाई करता त्याचप्रमाणे Quora वापरून ही तुम्ही कमाई करू शकता. Quora मध्ये देखील तुम्हाला paise kamavnyacha पर्याय मिळतो ज्याद्वारे तुम्ही Quora मधून पैसे कमावता, परंतु या व्यतिरिक्त तुम्ही Quora चा उपयोग करून अनेक मार्गांनी पैसे कमवू शकता जे थर्ड पार्टी कमाईद्वारे होते.

आता या पैसे कमावण्याच्या मार्गाबद्दल सविस्तर जाणून घेऊया

Quora Space म्हणजे काय आणि त्यातून पैसे कसे कमवायचे?

Quora Space हा एक ग्रुप असतो, जसे आपण whats app वर Facebook वर ग्रुप बनवतो, तसेच तुम्ही quora वर ग्रुप बनवून त्यामध्ये खूप लोकांना सहभागी करू शकता, यालाच Quora Space असे नाव देण्यात आले आहे. तुम्ही Quora space मधून पैसे कमवू शकता.

Quora Space तयार करण्यासाठी, प्रथम तुम्हाला Quora वर काही दिवस सक्रिय राहावे लागेल, त्यानंतर तुम्हाला Quora Space तयार करण्याचा पर्याय दिसेल. येथे तुम्ही इंग्रजी मध्ये स्वतःचा space तयार करून यात पोस्ट टाकू शकता, येथील प्रश्नांची उत्तरे देऊ शकता तसेच तुमचे प्रश्न विचारू शकता.

जर तुम्ही इंग्रजीमध्ये स्पेस तयार केली, तर त्यावर Quora द्वारे add दाखवली जाते, जेणेकरून तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता, परंतु जर तुम्ही Quora वर इतर भाषेत स्पेस तयार केली असेल, तर तुम्ही त्यातून पैसे कमवू शकत नाही कारण त्यावर जाहिराती चालत नाहीत. सध्या तुम्ही इंग्लिशमध्ये स्पेस तयार करून कमाई करू शकता, कदाचित येणाऱ्या काळात हिंदी किंवा मराठी व इतर स्पेसवर जाहिराती चालवल्या जाऊ शकतात आणि त्याहूनही जास्त कमाई करू शकता, पण सध्या तरी Quora Space मधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला इंग्रजी स्पेस तयार करावी लागेल.

Quora Partner Program मधून पैसे कसे कमवायचे
Quora Partner Program म्हणजे काय :-

Quora Partner Program मध्ये तुम्ही लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे कमवू शकता. जेव्हा कोणी Quora वर प्रश्न विचारतो, तेव्हा Quora त्यावर जाहिराती चालवते, त्या जाहिरातीतील कमाईचा काही % ठेवते, बाकीचे पैसे तुम्हाला देते. जे तुम्ही तुमच्या Paypal द्वारे तुमच्या बँकेला पाठवू शकता.

Quora Partner Program प्रत्येकासाठी उपलब्ध नाही आहे, यासाठी तुम्हाला तुमच्या प्रश्न आणि उत्तरांना 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळणे आवश्यक आहे, तसेच तुमच्या प्रश्न आणि उत्तरांवर वापरकर्त्याचा चांगला सहभाग असने गरजेचे आहे, तरच तुम्ही Quora पार्टनर प्रोग्राम मध्ये सहभागी होऊ शकता. जेव्हा quora team ला वाटते तुमच्या प्रश्न व उत्तरांना वाचकांचा चांगला प्रतिसाद आहे तेव्हा तुम्हाला एक आमंत्रण दिले जाते ज्यानंतर तुम्ही Quora Partner Program मधून कमाई सुरू करू शकता.

Quora वर Blog Promotion करून पैसे कमवा

मित्रांनो, जर तुम्ही blog किंवा website ने पैसे कमवत असाल व काम करत असाल, तर Quora च्या मदतीने तुम्ही येथे विचारलेल्या प्रश्न आणि उत्तरे देऊन तुमच्या ब्लॉग व website चे promotion करून तेथे तुम्ही तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर चांगला ट्रॅफिक आणू शकता, व तुमच्या ब्लॉग वर Google Adsense किंवा इतर अनेक मार्गांनी जास्त पैसे कमवू शकता.

यासाठी, तुम्हाला तुमच्या प्रश्नोत्तरामध्ये तुमच्या ब्लॉगची किंवा वेबसाइटची लिंक द्यावी लागेल, जेणेकरून अधिकाधिक लोक तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर visit करतील व तेथील पोस्ट वाचतील. तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर ट्रॅफिक आणण्याचा हा एक सोपा आणि उत्तम मार्ग आहे. कारण लोक उत्तर वाचण्यासाठी Quora च्या साइटवर जातात आणि जेव्हा त्यांना त्याच उत्तराची लिंक मिळते तेव्हा ते त्यावर क्लिक करतात, त्यानंतर ते तुमच्या ब्लॉगवर किंवा वेबसाइटवर जातात. ज्यामुळे तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटचा ट्रॅफिक खूप वाढतो, व तुमच्या ब्लॉग वर किंवा website वर दाखवली जाणारी ऍड जास्त लोकांपर्यंत पोहचते ज्यामुळे तुम्ही चांगले पैसे कमावु शता.

Affiliate Marketing मधून पैसे कमवा

Affiliate Marketing करून तुम्ही quora द्वारे पैसे कमवू शकता, येथे तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट ची संविस्तर माहिती देऊन त्या प्रॉडक्टची ऑनलाईन लिंक देऊ शकता. तुमच्या लिंक शेअरमधून तुम्ही जितके उत्पादन विकाल तितके पैसे तुम्हाला मिळतील ज्याला एफिलिएट मार्केटिंग म्हणतात जो एक पैसे कमावण्याचा चांगला पर्याय आहे.

जेव्हा तुम्ही Quora वेबसाइट उघडली असेल, तेव्हा तुम्ही पाहिले असेल की अनेक उत्पादनांची माहिती येथे दिलेली शेअर केले आहे. आणि त्या माहितीच्या खाली उत्पादनाच्या लिंक्स देखील दिल्या आहेत, तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या लिंक देखील येथे देऊ शकता. आता जेव्हा कोणीही त्या लिंकवरून एखादे उत्पादन विकत घेते, तेव्हा तुम्हाला त्यावस्तूच्या किमतीतील कमिशनचे पैसे मिळतात, यासाठी तुम्हाला फक्त Amazon, Flipkart सारख्या affiliate प्रोग्राममध्ये सामील व्हावे लागेल आणि इतर अनेक affiliate program आहेत ज्यात तुम्ही विनामूल्य सामील होऊ शकता.

एफिलिएट मार्केटिंगद्वारे Quora app वरून खूप चांगली कमाई करू शकता जी तुम्ही येथे किती काम करता यावर अवलंबून आहे, तुम्ही affiliate marketing द्वारेदरमहा लाखो रुपये कमवू शकता.

Ebook विकून Quora मधून पैसे कमवा

तुम्ही Quora वर Ebooks विकून देखील  चांगली कमाई करू शकता कारण Quora हे एक असा platform आहे जिथे अशी लोक एकत्र येतात ज्यांना नवीन माहिती आणि ज्ञान मिळवायचे असते. यामुळेच जर तुम्ही पुस्तके लिहिण्यात तज्ञ असाल, तर तुम्ही ऑनलाइन ईबुक तयार करू शकता, जर तुम्ही एखादे ईबुक बनवून Quora वर पोस्ट केले व विकले तर लोक तुमची ebooks खरेदी करतील ज्यातून तुम्ही पैसे कमवू शकता.

याशिवाय, तुम्ही तयार केलेले ebook सोशल मीडियावर शेअर करून त्याची जाहिरात करून लोकप्रियता वाढवू शकता जेणेकरून तुमचे ईबुक अधिक विकले जाईल.

Advertising द्वारे पैसे कमवा
जाहिरातीद्वारे पैसे कमवा

जर तुमची कंपनी असेल, किंवा उद्योग असेल तर तुम्ही quora वर तुमच्या कंपनीची जाहिरात करायची असेल, तर ही सुविधा तुम्हाला Quora पुरवते, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कंपनीशी product संबंधित प्रश्नांची उत्तरे देउ शकता. शिवाय तुमचे प्रॉडक्ट कंपनी याविषयीची माहिती येथे पोस्ट करू शकता. ज्यामुळे तुमच्या कंपनीचा व प्रॉडक्ट ची माहिती इतरांपर्यंत पोहचेल

अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या कंपनीची जाहिरात करून त्या वस्तूची विक्री वाढवू शकता, तसेच तिच्या जाहिरातीतून पैसे कमवू शकता, जिथे तुमचा फायदाही आहे आणि कंपनीचाही फायदा आहे ज्यातून तुम्ही अधिक उत्पन्न मिळवू शकता.

Refer करून पैसे कमवा

मित्रांनो Quora अँपमध्येही तुम्ही Refer करून पैसे कमवू शकता. Refer करा आणि पैसे कमवा हा असा एक मार्ग आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त काही रेफरल प्रोग्राममध्ये सहभागी होऊन त्याची रेफरल लिंक तुमच्या मित्रांसह शेअर करावी लागेल.

आता जो कोणी त्या रेफरल लिंकवर क्लिक करून आपले खाते त्यात तयार करतो, तर तुम्हाला त्या रेफरल वरती कमिशन मिळते, यामुळे प्रत्येक रेफरल प्रोग्राममध्ये वेगवेगळे कमिशन असतात, काहींमध्ये तुम्हाला 50 रुपये, काहींमध्ये 500 रुपये किंवा त्याहून अधिक मिळतात. तुम्ही रेफेर करून quora द्वारे उत्तम कमाई करू शकता.


जर तुम्ही या दोन्हीच्या रेफरल प्रोग्राममध्ये सामील झालात, तर तुम्हाला तुमच्या% नुसार कमिशन मिळेल, तुम्हाला काही% पैसे मिळतील जे रेफरल करणारी व्यक्ती त्याच्या खात्यातून कमाई करेल जोपर्यंत ते खाते आहे आणि त्यातून कमाई होईल.

Quora चे फायदे काय आहेत?

Quora चा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही Quora App वरून पैसे कमवू शकता. आजच्या काळात Quora हा एक उत्तम व जलद काम करणारा प्लॅटफॉर्म बनवला आहे, ज्याचा वापर लाखो लोक करतात कारण यातून लोकांना अनेक फायदे मिळतात, चला तर मग जाणून घेऊया quora चे फायदे काय आहेत.

Quora che fayde kay aahet?

1. Quora हे सोशल मीडिया म्हणून वापरू शकता, ज्यामध्ये तुम्ही एखाद्याशी मैत्री करू शकता, मेसेज करू शकता आणि त्याच्याशी बोलू शकता. कारण हे facebook सारखे socil media platform आहे जिथे खूप लोक एकत्र येतात.

2. यामध्ये तुम्ही कोणत्याही व्यक्तीला टार्गेट करून त्याला कोणताही वैयक्तिक प्रश्न विचारू शकता व त्याच्याकडून उत्तराची मागणी करू शकता. व दुसऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता.

3. Quora वरील सर्व प्रश्न आणि उत्तरे Google मध्ये रँक करतात, त्यावर क्लिक करून कोणीही प्रश्न उत्तरे वाचू शकतो.

4. Quora च्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉग/वेबसाइट किंवा Youtube चॅनलवर खूप ट्रॅफिक आणू शकता. व आपली कमाई वाढवू शकता.

5. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही Quora वर तुमचा स्वतःचा ब्लॉग देखील तयार करू शकता आणि त्यातून खूप सारे पैसे कमवू शकता. कारण Quora मध्ये जाहिराती देखील चालतात ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळतात.


तर ही होती Quora बद्दलची संपूर्ण माहिती, ज्यामध्ये तुम्हाला Quora App मधून पैसे कसे कमवायचे याची माहिती दिली आहे, माझा नेहमीच प्रयत्न असतो की कोणतीही पोस्टमध्ये मी त्या विषयाची माझ्या पोस्ट मध्ये संपूर्ण माहिती द्यावी.  जेणेकरून तुम्हाला दुसरी पोस्ट वाचण्याची गरज लागणार नाही.

त्यामुळे मला आशा आहे की तुम्हाला या माहितीतून बरेच काही शिकायला मिळाले असेल ज्यामध्ये Quora madhun paise kamvnyache marg तसेच Quora kay aahe, Quora Space mhanje kay, याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. .

तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की कळवा आणि Facebook, Twitter, Quora आणि इतर सोशल मीडियावर तसेच तुमच्या मित्रांसह शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांना ही माहिती वाचता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site