Ad code

Latest

6/recent/ticker-posts

मुतखडा का होतो ? मुतखडा लक्षणे व उपाय Kidney stone meaning in marathi

Kidney Stone, मुतखडा म्हणजे काय? कारण, लक्षणे व उपाय.


किडनी स्टोन किंवा मुतखडा या बद्दल आपल्याला माहीतच असेल. पण तुम्हाला हे माहित आहे का? की किडनी स्टोन हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात. पुरुषांमध्ये किडनी स्टोन किंवा महिलांमध्ये किडनी स्टोन असला तरी त्याचे उपचार आणि लक्षणे ही सारखीच असतात.

या पोस्टमध्ये आपण मुतखड्या संबंधित सर्व माहिती देनार आहोत जसे की मुतखडा कधी होतो? किडनी स्टोन कसे तयार होतात? मुतखडा कसा बरा होऊ शकतो? आणि मुतखडा असल्यास काय खावे?

Image credit - Freepic
Image credit - Freepic

किडनी स्टोन ही एक गंभीर समस्या आहे. मुतखड्याचा त्रास खूपच असह्य असतो. किडनी स्टोन हा मूत्रपिंडात किंवा पित्तशयात तयार होऊ शकतो. सामान्यत: मूत्रपिंडात तयार झालेले खडे औषधांच्या साहाय्याने लघवीद्वारे काढले जाऊ शकतात, परंतु पित्ताशयात तयार झालेले खडे ऑपरेशनद्वारे शरीरातून काढून टाकले जातात. तर चला जाणून घेऊयात मुतखडा कसा होतो त्याची लक्षणे कारणे व उपचार काय आहेत. जेणे करून तुम्ही मुतखडा होण्यापासून दूर रहाल व जर असेलच तर ते उपाय करून मुतखडा घालवता येईल.

किडनी स्टोन कसे तयार होतात? मुतखडा कसा होतो Mutkhada ka hoto

Image credit - Freepic

आजकाल किडनी मध्ये स्टोन असणे सामान्य झाले आहे. मुतखडा होण्याचे कारण जेव्हा आपल्या मूत्रामध्ये  कॅल्शियम, ऑक्सलेट, युरिक ऍसिड आणि सिस्टीन यांसारख्या विशिष्ट पदार्थांचे प्रमाण वाढते तेव्हा ते क्रिस्टल्स मध्ये बदलून आपल्या किडनीशी जोडले जातात आणि हळूहळू त्यांचा आकार वाढुन मुतखडे बनतात. मुतखड्याची लक्षणे दिसू लागताच, मुतखड्यावर ताबडतोब उपचार करावेत.
चला जाणून घेऊया किडनी स्टोनची कारणे कोणती आहेत.

 • आनुवंशिकता: ज्या लोकांच्या कुटुंबात किडनी स्टोन झाला असेल त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
 • कमी प्रमाणात पाणी पिणे हे एक प्रमुख कारण आहे. पाण्याचे सेवन दिवसातून 3-4 लिटर असावे. यामुळे मिठाचा साठा कमी होईल आणि किडनी स्टोन होणार नाही.
 • मूत्र मध्ये रासायनिक जादा
 • शरीरात खनिजांची कमतरता
 • डिहाइड्रेशन (निर्जलीकरण)
 • व्हिटॅमिन डी जास्त
 • जंक फूडचे अतिसेवन. :- किडनी स्टोन होण्याची शक्यता आपण काय खातो यावरही अवलंबून असते

मुतखड्याचे प्रकार काय आहेत?
किडनी स्टोनचे चार प्रकार आहेत-

 1. कॅल्शियमचा मुतखडा
 2. यूरिक ऍसिड मुतखडा
 3. struvita मुतखडा
 4. सिस्टिन मुतखडा
यापैकी, मानवी शरीरात कॅल्शियमचे खडे आणि यूरिक ऍसिडचे खडे साधारणपणे सर्वाधिक आढळतात.

किडनी स्टोन्सची लक्षणे - मुतखड्याची लक्षणे कोणती आहेत? (Symptoms of Kidney Stone)

Image credit - Freepic


किडनी स्टोन असल्याने आपल्याला त्रास होतोच पण काहीवेळा जर मुतखडा आकाराने लहान असला तर वेदना होत नाहीत, परंतु काही वेळा या वेदना खूपच तीव्र असतात, तेव्हा उपचारांची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त, किडनी स्टोनची इतर अनेक लक्षणे असू शकतात, जसे की 
 • लघवी करताना दुखणे.
 • लघवीमध्ये रक्त येणे.
 • लघवीतून खूप घाण वास येणे.
 • लघवीचा रंग बदलणे.
 • कमी प्रमानात लघवी होणे.
 • लघवी करण्याची इच्छा होणे.

मुतखडा असल्यास हे पदार्थ टाळावेत :


मुतखडा असल्यास काही पदार्थ भाज्या न खाल्लेल्याच बऱ्या असतात. टोमॅटो, पालक या भाज्यांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असल्याने यासोबतच चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स, कॉफीशी संबंधित पेये कमी खावेत, त्यासोबतच मीठाचे प्रमाण कमी ठेवावे.


रुग्णामध्ये काही आजार आढळून आल्यास पुन्हा पुन्हा किडनी स्टोन होऊ शकतो. जसे की मधुमेह, कोलायटिस, UTI (मूत्रमार्गाचा संसर्ग) इ.


ज्या लोकांना किडनी स्टोन आहे त्यांनी कॅल्शियम ताबडतोब बंद करू नये कारण आपल्या शरीरात कॅल्शियम एका पातळीपर्यंत असणे महत्वाचे आहे. जर कॅल्शियमचे सेवन पूर्णपणे कमी केले तर किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.

मुतखडा टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?


किडनी स्टोन न होण्यासाठी या गोष्टींची विशेष काळजी घ्या:
जसे की जास्त पाणी प्या, दिवसातून किमान ७-८ ग्लास पाणी प्यावे. सेलेरी खाल्ल्याने किडनीच्या समस्याही दूर होतात. हा एक डिटॉक्सिफायिंग घटक आहे जो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो. मांसाहार कमी करा, मीठ आणि साखरेचे प्रमाण संतुलित ठेवा. पालक, संपूर्ण धान्यांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, तेही टाळावे.

मुतखड्यावर उपचार :

मुत्रमार्गातील स्टोन चा आकार आणि स्थान यावर स्टोन चा उपचार अवलंबून असतात.

मुतखडा 5 मिमी पेक्षा कमी असेल तर सामान्यतः विशिष्ट उपचारांशिवाय बाहेर पडतात. त्यासाठी खूप प्रमाणात द्रवपदार्थ घेणे आणि pain killer घेणे आवश्यक आहे.

Image credit - Freepic

मूत्रपिंडाचा आजार गंभीर झाल्यास, त्याला इतर औषधे घेण्यासोबतच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची देखील आवश्यकता असू शकते.

मोठ्या खड्यांना (म्हणजेच 9 मिमी पेक्षा जास्त) पर्क्यूटेनियस नेफ्रोलिथोटॉमी किंवा शॉक-वेव्ह लिथोट्रिप्सीद्वारे शस्त्रक्रिया काढून टाकण्याची आवश्यकता असू शकते.

उपाय :

 1. आहार आणि सवयींमध्ये काही बदल करून मुतखड्याला प्रतिबंध करता येतो.
 2. लघवीचा प्रवाह चांगला राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यावे. दररोज किमान 7-8 ग्लास पाणी प्यावे.
 3. आहारात कॅल्शियमचे प्रमाण पुरेसे असावे. दूध, दही, मसूर, संत्री आणि इतर दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमने समृद्ध असतात.
 4. योग्य प्रमाणात प्रथिने खा - दररोजच्या प्रथिनांची आवश्यकता सहसा दररोज 2-3 सर्विंग्सने पूर्ण केली जाते.
 5. तुमच्या आहारातील सोडियमचे प्रमाण 2-3 ग्रॅम पर्यंत कमी करा. प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की हॉट डॉग, चटण्या, कोरडे सूप, लोणचे इत्यादी कमी करा कारण त्यात मीठ जास्त असते.
 6. व्हिटॅमिन सीचे जास्त डोस टाळा कारण ऑक्सलेट हे व्हिटॅमिन सीपासून तयार होते ज्यामुळे मूत्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सलेट होऊ शकते.
 7. पालक, बदाम, शेंगदाणे, अक्रोड, लोणी, ब्लूबेरी यांसारखे ऑक्सॅलेट्स समृद्ध पदार्थांचे सेवन टाळा.
 8. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेऊ नका
 9. नियमित व्यायामाने रक्तातील साखर, रक्तदाब आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवा कारण ते दगड तयार होण्याचा धोका कमी करतात.

तुम्हाला उपचार किंवा पथ्ये सुरू किंवा थांबवायची असल्यास, प्रथम तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि सल्ला घ्या!


(Image credit :- Freepik.com)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site