Ad code

Latest

6/recent/ticker-posts

देशाचा तिरंगा ध्वज फडकवण्याचे काही नियम आहेत ते तुम्हाला माहीत आहे का? Har ghar tiranga

हर घर तिरंगा फडकावायचे नियम काय आहेत?


यंदा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रसरकार हर घर तिरंगा ही मोहीम राबवत आहे, या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे आव्हान भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र घरी झेंडा फडकवण्यासाठी त्याचे काही नियम आहेत व त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींना आपण लक्षात घ्यायला हव्यात, याची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. जेणेकरून आपल्या कडून राष्ट्र ध्वजाचा अपमान होणार नाही, व ध्वज फडकवताना आपल्याकडून कुठल्या चुका होणार नाहीत.


घरी तिरंगा कसा फडकवावा

राष्ट्रध्वज फडकवायला ध्वजसंहिता कायदा 2002 तसेच राष्ट्रियप्रतीक अपमान विरोधी कायदा 1971 चे पालन करावे लागते. पण अलीकडच्या काळात या संवेदनात दोन मोठे बदल केले आहेत 30 डिसेंबर 2021 ला केलेल्या एका बदलानुसार प्लास्टिकचा कापडाचा ध्वज तयार केला जाऊ शकतो या आधी फक्त खादीच्या कापडापासून तयार करण्यात करण्याची परवानगी होती.


तर 20 जुलै 2022 ला केलेल्या एका सुधारणानुसार राष्ट्रध्वज दिवसाचा किंवा रात्री दोन्ही वेळेस फडकवता येईल. तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरी तो फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकवण्याची परवानगी होती. पण राष्ट्रध्वज फडकवताना कोण कोणत्या गोष्टी ध्यानात घ्यावे ते जाणून घेऊयात.


राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम काय आहेत?


  1. राष्ट्रध्वज फडकविताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित मोकळ्या ठिकाणी फडकवावा ध्वजावर काहीही लिहलेलं नसावं.
  2. राष्ट्रध्वज ज्या उंचीवर फडकवला आहे त्याच्याबरोबर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावून नये.
  3. ध्वज फडकवताना नारंगी रंग वरच्या बाजूला व हिरवा रंग खालच्या बाजूला राहील, तसेच तो स्तंभाच्या उजव्या बाजूला राहील याची दक्षता घ्यावी.
  4. ध्वजस्तंभावर किंवा ध्वजावर फुल, पान, हार ठेवू नये ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात गरज असल्यास फुल किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवता येतील.
  5. तिरंगा फरशीवर पडलेला नसावा तसेच तो पाण्यावर तरंगता नसावा.
  6. कोणत्याही प्रकारचा वेशभूषेसाठी ध्वजाचा वापर करणे तसेच त्याला रुमाल, सोप्याचे कव्हर, अंतर्वस्त्रे किंवा कापड म्हणून त्याचा वापर करू नये.
  7. राष्ट्रध्वज काढताना तो संपूर्ण आदर सन्मानाने काढला जाईल त्याचे कुठे नुकसान होणार नाही किंवा तो कुठेही असाच टाकला जाणार नाही, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे, त्याची व्यवस्थित ठिकाणी जतन करून ठेवणे ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.

या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास किंवा पहिल्यांदाच गुन्हा घडल्यास दंड करण्याची तरतूदही या ध्वजसंहितेत आहे. जर ही माहिती महत्वाची वाटली कामाची वाटली असेल तर नक्की शेअर करा.


( Image credit :- freepic.com )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site