Ad code

Latest

6/recent/ticker-posts

डार्क वेब काय आहे व कसे काम करते What is Dark web in marathi

डार्क वेब काय आहे व कसे काम करते


इंटरनेट ने आपले जीवन खूपच सोपे आणि फास्ट बनवले आहे, किंवा असे म्हणा की पूर्णपणे बदलले आहे. कारण येथे आपल्याला अभ्यासापासून शॉपिंग पर्यंत, जॉब पासून बँकापर्यंत सर्व प्रकारची माहिती अगदी सहजरीत्या आणि काही सेकंदात मिळते.

पण तुम्हाला माहित आहे का ज्या इंटरनेट ला आपण कनेक्ट आहोत ज्याला आपण access करू शकतो, त्याची एक Dark Site पण आहे त्यात आपली एक छोटीशी चूक पण आपल्याला खूप मोठ्या संकटात टाकू शकते. हो हे खर आहे आज या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत Dark Web काय आहे, Dark Web म्हणजे काय?. आणि का आपण या पासून लांब राहिलेलंच बरं तर चला जाणून घेऊ या डार्क वेब बद्दल.
इंटरनेटला तुम्ही जेवढे सोपे समजता तेवढे ते सोपे नाहीये. इंटरनेट हे खूपच गुंतागुंतीचे आहे, इंटरनेट किंवा वेब हे तीन भागात विभागले आहे Surface Web, Deep Web आणि  Dark Web. 

Surface web काय आहे :- 

जेवढे इंटरनेट आपण वापरतो ज्याबद्दल आपल्याला माहित आहे, व त्याला आपण ऍक्सेस करू शकतो तो फक्त इंटरनेटचा 4 टक्केच भाग आहे ज्याला आपण सरफेस वेब म्हटले जाते. तुम्ही जे गूगल वर search करता, youtube वर पाहता, websites च्या मदतीने माहिती गोळा करताते फक्त या चार टक्के भागांमध्ये मिळते. म्हणजे सरफेस वेबवर मिळते.

Deep Web म्हणजे काय :- 

 Surface web नंतर येतो Deep Web. डीप वेब हा इंटरनेटचा तो भाग आहे जो search Engines पासून लपवलेला असतो. इथे अशा link व वेबसाइट असतात ज्या Google व अन्य search इंजिनवर मिळत नाहीत. म्हणजे Bank Details, कोणत्याही कंपनी चा Web Data, गव्हर्नमेंट ची सीक्रेट इंफॉर्मशन, मेडिकल क्षेत्रातील सीक्रेट माहिती इत्यादी. यांना ऍक्सेस करण्यासाठी तुमच्याकडे वेगळी link व username असणे गरजेचे आहे आणि कोणताही अज्ञात व्यक्ती यापर्यंत पोहोचू शकत नाही.
 उदाहरणार्थ :- तुमच्या मेल वर काय आहे, याची माहिती ई-मेल ओपन केल्यावरच भेटते कोना दुसऱ्या मार्गाने ती माहिती मिळवणे अशक्य आहे. तसेच बँकिंग लॉगिन पासून दुसरे लॉगिन deep web मध्ये येतात. काही लोक deep web व dark web यांना एकच मानतात, पण असे नाही डीप वेब व डार्क वेब हे वेगवेगळे आहेत.

Dark Web :- 

डार्क वेब हा इंटरनेट चा अनियंत्रित भाग आहे. आणि यावर खूप सारी अशी बेकायदेशीर काम होतात ज्या बद्दल तुम्ही विचारही केला नसेल. हा इंटरनेटचा तो भाग आहे जिथे हॅकिंग, लोकांना लुटणे असे खूप सारी कामे होतात. इथे अश्या   वेबसाईट व लिंक असतात, त्यांना तुम्ही तुमच्या ब्राउझर मधून ओपन करू शकत नाही. या फक्त काही खास ब्राऊजर मधूनच ओपन होऊ शकतात. ज्या mask IP address वापरतात हे user ची ओळख लपवून त्यांना ट्रॅक होण्यापासून वाचवतात

 तुम्ही खाली दिलेल्या फोटोला पाहून इंटरनेटचे surface web, deep web आणि dark web ला समजून घेऊ शकता, की डार्क वेब किती मोठं आहे.

Surface Web च्या मनाने Dark Web खूपच मोठ आहे, व त्याचा आकार वाढतच जात आहे. 2001 मध्ये केल्या गेलेल्या university of california च्या रिसर्च नुसार, Dark Web वर  जवळपास 7.500 terabyte माहिती उपलब्ध आहे. व surface web वर सर्व माहिती एकत्र करून 19 terabyte इतकी होते. म्हणजे जवळजवळ चारशे पटीने जास्त माहिती डार्क वेब वर उपलब्ध आहे.

जेव्हा तुम्ही इंटरनेटवर काही सर्च करता तेव्हा तुम्ही वेब चा फक्त 0.03% भाग सर्च करता. यातून तुम्ही अंदाज लावू शकता की डार्क वेब किती मोठे आहे.

Dark Web मध्ये काय होते


डार्क वेब इंटरनेटच्या जगातील अंडरवर्ल्ड आहे आणि या जागेवर गुन्हेगार बेकायदेशीर कामे करण्यासाठी याचा वापर करतात. डार्क वेब वर कोणत्याही देशाचे Duplicate Passport, तुमच्या आमच्या क्रेडिट कार्ड ची माहिती, बंदूक, Drugs, कॉन्ट्रॅक्ट किलर, illigal Wepons विकणे अशी सर्व कामे डार्क वेब च्या माध्यमातून गुन्हेगार करत असतात. एवढी माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल डार्क वेब ला कोणी मोट्या क्रिमिनल ने बनवलं असेल तर असं नाहीये. चला जाणून घेऊयात डार्क वेब ला कोणी बनवलंय.

Dark Web कोणी बनवले.

डार्क वेब बद्दल एवढी माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, की याला कोणी बनवलं?. डार्क वेब Onion Routing Technique वर काम करते ज्याला, American Nevi ने आपल्या गव्हर्नमेंट साठी 1990 मध्ये डेव्हलप केलं होतं. याचा उपयोग गव्हर्मेंटचे Confidential Documents आणि पेपर्स पाठवण्यासाठी होत होता. कारण त्याना leak आणि hack होण्यापासून वाचवले जाऊ शकेल. सुरवातीला हे फक्त काही खास लोकांनाच याचे ऍक्सेस होते नंतर काही वेळाने डार्क वेब ला सर्वांसाठी ओपन केलं गेलं. आणि त्यानंतरच डार्क वेब वर गुन्हेगारीची कामे चालू झाली. Dark वेब कोणत्याही search engine मधून ओपन होत नाही यासाठी त्यांनी खास ब्राउझर पण बनवला गेला होता. जो onion routing वर चालत असे. त्याचे नाव Onion म्हणजेच कांदा यासाठी ठेवलेला आहे, कारण कांद्यामध्ये जशा लेयर्स असतात, तसेच या browser च्या मदतीने जो मेसेज पाठवला जातो तो पाठवनाऱ्याचा iP Address या अनेक लेयर्स मधे बदलला जातो. यावर कोणताही Data खूप सर्व VPN व नेटवर्क मधून Bounce करून जातो त्यामुळे user आणि वेबसाइट दोन्हीही अज्ञात राहतात. डार्क वेब ला ॲक्सेस करण्यासाठी गुप्तता पाहिजे असते. कारण कोणीही कोणालाही track न करता सुरक्षित पणे काम करावे आणि हे काम Onion Routing technique करते.

Dark web ही अशी आभासी दुनिया आहे, ज्यापासून तुम्ही लांबच राहिलेल बर. कारण येथे तुम्ही गेलात तर येथे सगळ्यात मोठा धोका तुम्हालाच होईल. येथे मोठे मोठे हॅकर्स नवीन शिकार च्या शोधात असतात आणि तुमच्या एका क्लिक वर तुमची सर्व प्रायव्हेट इन्फॉर्मेशन, तुमची डिटेल्स त्यांच्या हातात जाईल. म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही डार्क वेब सारख्या गोष्टींपासून नेहमी लांबच रहा. कारण तुमची एक चूक तुम्हाला कायमच्या संकटात टाकू शकते.

(Image credit :- freepic.com)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site