Ad code

Latest

6/recent/ticker-posts

PDF file म्हणजे काय? Pdf full form. PDF meaning in marathi - Naadmarathi

PDF म्हणजे काय? pdf चा फुल फॉर्म काय आहे - pdf meaning in marathi


जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की पीडीएफ म्हणजे काय? आणि Pdf चा फुल फॉर्म काय आहे? तर आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला Pdf full form सांगणार आहे सोबतच Pdf म्हणजे काय? Pdf वापरण्याचे फायदे काय आहेत? Pdf file कशी तयार करावी? आणि pdf चा इतिहास काय आहे? येेेथे मी तुम्हाला पीडीएफ बद्दल पूर्ण माहिती देणार आहे, चला तर मग सुरू करूया.


मित्रांनो, जर तुम्ही Android mobile किंवा computer वापरत असाल. तर तुम्ही या pdf शब्दाबद्दल नक्कीच ऐकले असेल. कारण बहुतेक file व documents pdf मध्ये पाठवले जातात. पण अनेकदा pdf फाईल म्हणजे काय? याचा फायदा काय हेच माहीत नसतं, नवीन स्मार्टफोन किंवा संगणक वापरणाऱ्यांना या विषयाची कोणतीही माहिती नसते.

त्यामुळे त्यांना पीडीएफ फाइल तयार करताना त्रास सहन करावा लागतो. पण एक स्मार्ट युजर असल्याने, तुमच्याकडे pdf बद्दल महत्त्वाची आणि अचूक माहिती असली पाहिजे.

Pdf File म्हणजे काय ( What is PDF File )

PDF हे Adobe सॉफ्टवेअर कंपनीने तयार केलेले फॉर्मेट आहे. आज आलेली सर्व e-books PDF स्वरूपात आहेत. पीडीएफ हे लोकप्रिय ई-बुक फॉर्मेट आहे.

Mobile, Computer, tablet यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये PDF फॉरमॅट उघडणे खूप सोपे आहे. आणि तुम्ही PDF फॉरमॅटही सहज तयार करू शकता print करू शकता.

PDF full form - pdf चा फुल फॉर्म काय आहे
Pdf चा फुल फॉर्म "Portable Document Format" आहे .PDF चा इतिहास काय आहे?

Pdf च्या इतिहासाबद्दल बोलायचे तर, PDF फॉर्मेट ला 1990 मध्ये Adobe सॉफ्टवेअर कंपनी द्वारे तयार केली गेली, आणि 1993 मध्ये Adobe ने PDF चा पहिला Version 1.0 जारी केला गेला. त्यानंतर ते संगणकाच्या जगात खूप लोकप्रिय झाले. कारण तेव्हा स्मार्टफोनचा वापर नव्हता तेव्हा बहुतांश  संगणकात वापरले जायचे.

आज स्मार्टफोनमध्ये pdf चा भरपूर वापर केला जातो. आज, जर तुम्ही इंटरनेटवरून कोणतेही document डाउनलोड केले, तर ते केवळ पीडीएफ फाइल स्वरूपात डाउनलोड केले जातात.

1993 पासून 1 जुलै 2008 पर्यंत, PDF ची मालकी Adobe च्या मालकीची होती, परंतु 1 जुलै 2008 रोजी Adobe ने सार्वजनिक पेटंट परवाना प्रकाशित केला. ज्या अंतर्गत पीडीएफ रॉयल्टी फ्री झाली. यामुळे आता कोणतीही कंपनी किंवा संस्था त्यांच्या इच्छेनुसार PDF वापरू शकते.

पीडीएफ फाइल चे फायदे

पीडीएफ फाइल ही पोर्टेबल फाइल आहे, म्हणजे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे सोपे आहे.
पीडीएफ फाइल पासवर्ड संरक्षित असू शकते, जी फक्त तुम्हीच उघडू शकता. व ज्याच्याकडे याचा पासवर्ड आहे तीच व्यक्ती उघडू शकते.
PDF फाईल मोठ्या कागदपत्रे अगदी लहान आकारात साठवू शकतात.
PDF फाईलची प्रिंट आउट देखील काढता येते जी खूप सोपी आहे.
तुम्ही मोबाईल कॉम्प्युटर, इंटरनेट इत्यादी कोणत्याही उपकरणात PDF फाइल उघडू शकता.
तुम्ही पीडीएफ फाइल सहज उघडू शकता, यासाठी मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.
तुम्ही प्रिंटआउट, इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीसाठी PDF वापरू शकता.

मोबाईल मध्ये PDF फाईल कशी उघडायची?
जर तुम्ही इंटरनेटवरून PDF फाइल डाउनलोड केली असेल, तर ती उघडण्यासाठी तुम्हाला PDF Viewer ऍपची आवश्यकता असेल. हे तुम्ही Play Store वर अनेक free application उपलब्ध आहेत, यातून तुम्ही pdf open करू शकता व तयार करू शकता. परंतु आम्ही तुम्हाला काही लोकप्रिय मोफत PDF Reader बद्दल सांगणार आहोत जे तुम्ही सहज डाउनलोड करू शकता.
Android फोन्ससाठी top 5 सर्वोत्कृष्ट pdf reader Application:

1. Adobe Acrobat Reader

Adobe Acrobat Reader हे एक अतिशय लोकप्रिय  फाइल व्ह्यूअर app आहे. जे computer आणि mobile दोन्हीवर open करता येते. Adobe Reader तुम्हाला नवीन PDF फाईल्स तयार करण्यास आणि PDF संपादित करण्यास देखील अनुमती देतो. हे अॅप तुम्ही प्ले स्टोअरमधून मोफत इन्स्टॉल करू शकता.

2. Google PDF Viewer
पीडीएफ फाइल्स उघडण्यासाठी हे एक उत्तम अँप आहे. जर तुम्हाला ईबुक वाचण्याची आवड असेल तर तुम्ही गुगल पीडीएफ व्ह्यूअर इन्स्टॉल करू शकता. 4.2 स्टार रेटिंगसह, या अँपला आतापर्यंत प्ले-स्टोअरमध्ये 100M+ डाउनलोड मिळाले आहेत.


3. Xodo PDF Reader & Editor
हे अँप उत्तम पीडीएफ एडिटर तसेच पीडीएफ रीडर आहे. 4.7 स्टार रेटिंगसह प्ले स्टोअरमध्ये आतापर्यंत 10M+ डाउनलोड झाले आहेत.

4. Fast scanner
हे देखील एक लोकप्रिय आणि विनामूल्य PDF फाइल रीडर आहे. त्याचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे आपण कोणतेही दस्तऐवज स्कॅन करू शकता आणि पीडीएफ फॉरमॅटमध्ये रूपांतरित करू शकता.

5. PDF Reader
पीडीएफ रीडर 2020 आमच्या top 5 लिस्टमध्ये देखील येतो. हे एक लोकप्रिय पीडीएफ व्ह्यूअर, स्कॅनर आणि कन्व्हर्टर आहे. येथे तुम्ही PDF फाइल उघडू शकता, तयार करू शकता, संपादित करू शकता, विलीन करू शकता आणि जतन करू शकता.

येथे आम्ही तुम्हाला पीडीएफ फाइल कशी बनवायची याबद्दल सांगितले आहे, जर तुम्हाला या माहितीशी संबंधित कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील, किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणतीही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता, आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

तर आशा आहे की, ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला पीडीएफ म्हणजे काय आणि पीडीएफ फाइल कशी उघडायची हे माहित असेलच? पीडीएफ फॉरमॅट आज खूप लोकप्रिय आहे आणि फाईल शेअरिंगसाठी ते खूप वापरले जाते. तुम्ही संपूर्ण पुस्तक PDF मध्ये रूपांतरित करू शकता. शेवटी पोस्ट मधून तुम्हाला काही शिकायला मिळाले तर ते तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. व आमच्या नाद मराठी या फेसबुक पेज ला like करायला विसरू नका.


(Image credit :- Freepic.com)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site