Ad code

Latest

6/recent/ticker-posts

जेवण झाल्यावर नवरा बायकोला विचारतो New marathi jokes

नवीन मराठी जोक्स 


कसे आहात सगळे, आणि हसताय ना हसायलाच पाहिजे कारण तुम्हाला हसवण्यासाठी घेऊन आलोय धमाकेदार मराठी जोक्स ज्यांना वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल. तर सर्व जोक्स वाचायला विसरू नका आवडले असतील तर मित्रांना नक्की share करा. व कंमेंट करायला विसरू नका.

मराठी जोक्स Marathi Jokes: 1

एक मुलगी तिच्या प्रियकराला तिच्या घरी येण्याचा मार्ग सांगत होती. "हे बघ, इमारतीच्या आत आल्यावर डावीकडे एक लिफ्ट आहे. लिफ्टमध्ये येताना आपल्या कोपराने 9 नंबरचे बटण दाब
- जेव्हा तुम्ही नवव्या मजल्यावर याल तेव्हा उजव्या हातावर दुसरा फ्लॅट आमचा आहे. इकडे ये आणि कोपराने बेल दाबा, मी दार उघडते.
" प्रियकर : पण प्रिये, मी बोटाने ही सर्व बटणे दाबली तर सोपे होईल
मुलगी : अरे देवा!!!... म्हणजे तू रिकाम्या हाताने येतोस?!!!


मराठी जोक्स Marathi Jokes: 2


डॉक्टर:-तुमच्या आजाराच नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय...कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं....!

पेशंट:- हरकत नाही तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.....


मराठी जोक्स Marathi Jokes: 3


बेवडा नवरा : अग!
हे काय जेवण आहे? आमटीत केस,
भाजीत केस,
चपातीमध्ये केस....  काय चालय काय?
...
बायको : अहो ते साधे-सुदे केस नाही आहेत...
झा*टे आहेत झा*टे!
....
पती: काय?
....
बायको : अहो तुम्हीच तर रोज ढोसुन येता आणि म्हणता ना.....
"आज आमटीला झा"ट्याची चव ऩाही!
भाजीला झा#ट्याची चव ऩाही.
म्हणून टाकले थोड़े !

मराठी जोक्स Marathi Jokes: 4

एक माणूस त्याच्या बायकोसोबत विमानाने प्रवास करत होता. Air Hostess जवळ आली आणि तिने विचारले :
"Sir, would you like to take Tea together?"
नवरा "Yes" म्हटला आणि बायको कडे बघुन बोलला,
"ऊठ.
तिला बसू दे.."

मराठी जोक्स Marathi Jokes: 5

रात्रीचे २ वाजले होते..... खूप जोराचा पाऊस सुरू होता.... गण्या ने एका घराची बेल वाजवली आणि विचारलं : धक्का देणार का प्लीज??
माणूस झोपेत होता म्हणून 'नाही' म्हणून आत गेला...
त्या माणसाला नंतर वाईट वाटलं आणि विचार केला जर तो स्वतः कधी पावसात अडकला, त्याची गाडी बंद पडली आणि त्याची मदत कोणी केली नाही तर......?????
तो माणूस उठला... दरवाज्याजवळ गेला आणि त्याने मोठयाने विचारले : "तुला धक्का मारायचा आहे का?" अंधारातून गण्या चा आवाज आला....'हो...."
तो माणूस बाहेर गेला....आणि ओरडला :
"अरे कुठे आहेस तू????"
___ अंधारातून गण्या चा आवाज आला..."डावीकडे....तुमच्या गार्डन मध्ये.... झोक्यावर बसलो आहे...."

मराठी जोक्स Marathi Jokes: 6

रात्रीचे अडीच वाजलेले असतात, बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते, नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो,
नवरा - काय झालं? काय झालं?
बायको - काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. . आधी गोळी घ्या न मग झोपा.

मराठी जोक्स Marathi Jokes: 7

सर :- बंड्या सांग बघू अकबर चा जन्म केव्हा झाला?

बंड्या शांत पणे उत्तर देतो
हे बघा सर मी इथे शिकायला येतो
बाळंतपणाच्या नोंदी ठेवायला नाही.

मराठी जोक्स Marathi Jokes: 8

जेवण झाल्यावर नवरा बायकोला बोलतो
नवरा :- साडी काढ लवकर..
बायको :- अहो थांबा पोर तरी झोपुदेत
नवरा :- अग फुकने बाहेर वाळत घातलेली साडी काढ पाऊस येणार आहे.

मराठी जोक्स Marathi Jokes: 9

पाटील साहेब रोज एका बार मध्ये जातात आणि तीन ग्लास बिअर मागवतात.

आणि त्या तीनही ग्लास मधून एक एक सिप घेत संपवत असत.
एक दिवस वेटरला राहवले नाही म्हणून त्यानी विचारले की साहेब तुम्ही एका ग्लास मधून सुद्धा पिऊ शकता तीन ग्लास कशाला?
पाटील साहेब उदास होऊन सांगतात अरे आम्ही लहानपणापासूनचे तीन मित्र आहेत आणि आम्ही एकत्र बसायचो परंतु आता ते परदेशात आहेत म्हणून त्यांचे दोन ग्लास सुद्धा मीच पितो म्हणजे ते जवळ असल्यासारखे वाटते.
काही महिन्यानंतर एक दिवस पाटील साहेबांनी दोन ग्लास मागवले आणि प्यायला सुरुवात केली.
वेटरला वाटलं ह्यांचा एक मित्र गेला वाटतं.

त्यानी विचारले साहेब तुमच्या एका मित्राला काही झाले का?

पाटील: नाही रे माझे दोन्ही मित्र एकदम व्यवस्थित आहेत.

" मी श्रावणात पीत नाही"

मराठी जोक्स Marathi Jokes: 10

॥सात्विक नवरा॥
-----------------
रात्रीच्या वेळी स्कुटरवरून जात असताना समोरून कुत्रा आल्या मुळे गोंधळून जाउन  एका माणसांचा बॅलन्स जातो आणि तो बाजूच्या नाला सदृश  खड्ड्यात जाउन पडतो, 
मोठ्या मुश्किलीने कसं बस खड्ड्यातुन बाहेर येत असतानाच त्याला तशा अवस्थेत पाहून  एक सुंदर स्त्री  आपली  भली मोठी कार त्याच्याजवळ थांबवून विचारते

"  तुम्हाला लागलंय का "

नाही विशेष नाही "
तो उद्गगारतो

ती :
"माझे घरं जवळच आहे,  घरी चला  कपडे ठीक ठाक करा थोडा आराम करा, 
खरच जास्त लागलं नाही ना हे बघा "

तो :
"तुमचे खूप धन्यवाद पण,
माझी बायको नाराज होईल !

ती :
"टेन्शन घेऊ नका मी एक डॉक्टर आहे,  
चला बघूया जखम झालीय का? ! "

तो :
"नको हो 
माझी बायको नाराज होईल ! "

ती :
"फँक्चर तर नाही झालंय ना,
हे बघायला हवं ! "

तो :
"नको हो  मला  माहितेय,
माझी बायको नाराज होईल ! "

शेवटी हो  नाही  करता करता, 
तो तिच्याबरोबर  तिच्या गाडीत बसून तिच्या घरी जातो.

घरी गेल्यावर ती त्याला कपडे स्वच्छ  करायला सांगते गरम पाण्यानी हात पाय धुवून झाल्यावर  त्याला ज्युस प्यायला देते,
त्याचं चेकअप करते.

हा मध्ये मध्ये
"माझी बायको नाराज होईल"
असं पुटपुटत  असतोच !

शेवटी ती न रहावुन म्हणते
"अहो ती का नाराज होईल, 
तीला कळणारसुद्धा नाही,
तुम्ही नाल्यात पडल्याचे,
आता तर तुमचे कपडेही स्वच्छ झालेत
तुम्हांला मी first aid ही केलंय!

तो :
नाही हो,
ती नाराज होईल तरीही

ती :
आहो, ती  तर घरी आहे ना?

तो :
*नाही  हो ती अजूनही त्या  नाल्यातच पडलेली असेल !*

Marathi Jokes :- 11

तो:- अग.. इथे मी ५०० रुपयांचे बंडल ठेवले होते, लाल रंगाचे रबर होते बघ त्यावर

ती:- (रबर हातात देत)
हे घ्या! जीव चाललाय त्या रबरासाठी.. !"

Marathi Jokes :- 12

मुलगी : तू माझ्या भावना कधीच समजू शकणार नाही...

मुलगा : अग तु लिहिलेले अक्षर नाही समजू शकत मी,

तर भावना कुठून समजणार मला ...

Marathi Jokes :- 13

बायको :  मी तुमच्यासाठी किती काम करते तुम्हाला माहित आहे का ?  लग्नानंतर माझे हात छोटे झालेत .

नवरा : ते कसं काय! तू मोजून बघितलेस का?

बायको : आहो !! आधी मी एक्सरसाइज करताना हातांनी पायाचा अंगठा पकडायचे. लग्न होऊन 15 वर्षानंतर आता बघितलं तर हात फक्त गुडघ्या पर्यंतच जातात .

मराठी जोक्स Marathi jokes :- 14

दिनू - पप्पू जंगलात गेले होते.
समोरून अचानक वाघ आला.
दिनू प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली
आणि तो पप्पूला म्हणाला,
पळ पळ पप्पू !
.
पप्पू चिढून म्हणाला
मी का पळू?
माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत...
तूच पळ..

मराठी जोक्स Marathi jokes :- 15

साधू   : -   तुला आयुष्यात काय हवं आहे?
भाल्या   :-    दारू.....
साधू   : -    थोड्या वेळासाठी दारू बाजूला ठेव.
भाल्या   : -   बरं.
साधू    : -    आता सांग तुला आयुष्यात काय हवं आहे?
भाल्या    : -   ती  बाजूला ठेवलेली     दारू.... 

मराठी जोक्स Marathi jokes :- 16

आयुष्यात एवढी उंच भरारी घ्या ..,

की
आकाशातील सर्व पक्षी बोलले पाहिजेत,
च्यामायला
"कोण आलय आमच्या वर उडायला".

मराठी जोक्स Marathi jokes :- 17

ऑफिस एकाच सिद्धांतावर
चालतं.....

तुमचा बॉस तुम्हाला येडा समजतो
आणि तुम्ही त्याला....!!

Marathi jokes :- 18

बॉस ने सर्व कर्मचाऱ्यांसमोर एक दगड पाण्यात फेकला...
आणि विचारलं "दगड का बुडाला?"

सर्वांनी सांगितलं ...
दगड जड होता म्हणून ...

पण एकाने सुंदर उत्तर दिले ...
त्याने खूप सुंदर उत्तर दिलं
"सर, त्याने तुमचा हात सोडला, म्हणून तो बुडला ..."

जीवनात असेच चमचे खूप प्रगती करतात..

Marathi jokes :- 19

सासरा काय जावई बापु आज सकाळी-सकाळी
इकडे कसे काय?
जावई आज सकाळी-सकाळी तुमच्या मुली बरोबर  भांडण झाले,
ती म्हणाली नरकात जा ....!

Marathi jokes :- 20

एकदा शेजाऱ्याचा मोबाईल चोरीला जातो तेव्हा जोशी त्याला विचारायला जातात
जोशी: मी असं ऐकलं की तुमचा फोन कुणीतरी चोरला.

शेजारी: हो !

जोशी : मग त्याचा चार्जर मला द्याल का ?

Marathi jokes :- 21

पोरी पण कमाल आहेतं..
५३ वर्षांच्या सलमान खान ला
love you sweetheart बोलतात..
आणि
३० वर्षांच्या कंडक्टरला
अहो काका म्हणतातं.

एक तापलेला कंडकक्टर....

Marathi jokes :- 22

गण्याला एका मुलीचा मेसेज 
आला
.
मुलगी बोलली-Hi
गण्या- yes!
.
मुलगी बोलली- How r u??
गण्या- Fine
.
मुलगी बोलली- Where r u from?
गण्या- Mumbai
.
मुलगी बोलली- तूझ शिक्षन किती
झाल आहे??
गण्या- तुझ्या एवढ
.
मुलगी बोलली-माझ्या एवढ
म्हणजे??
गण्या- मी पन एवढच इंग्लिश
बोलून डायरेक्ट मराठीत सुरू
होतो...


कसे आहात सगळे, आणि हसताय ना हसायलाच पाहिजे कारण तुम्हाला हसवण्यासाठी घेऊन आलोय धमाकेदार मराठी जोक्स ज्यांना वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल. तर सर्व जोक्स वाचायला विसरू नका आवडले असतील तर मित्रांना नक्की share करा. व कंमेंट करायला विसरू नका.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site