Ad code

Latest

6/recent/ticker-posts

कडुलिंबाचे फायदे आणि नुकसान | Neem Benefits In Marathi

कडुलिंबाचे खाण्याचे फायदे आणि नुकसान | Neem Benefits In Marathi


आपल्या भारतामध्ये आयुर्वेदिक औषधांच्या खजिनांचा भांडार आहे, भारतामध्ये प्रत्येक रोगावर औषध मिळते मग तो झाडाच्या स्वरूपात असो, वनस्पतीच्या स्वरूपात असो किंवा कोणत्याही औषधी वनस्पतीच्या स्वरूपात. आयुर्वेदामध्ये असे खूप उपाय होते व त्यांना प्रत्येक झाडाचे वैशिष्ट्य माहीत होते ज्याचा उपयोग करून ते वनस्पती चा उपयोग करून त्याचे औषधीय गुनांचा वापर करत होते.


कडुलिंब हे एक असेच झाड आहे त्याचे औषधीय गुण खूप आहेत. कडुलिंबाच्या झाडाची प्रत्येक गोष्ट फायदेशीर असते कडुलिंबाची पाने, फळ, त्याचे तेल, मूळ आणि साल या सर्व गोष्टी खूप फायदेशीर मानल्या जातात. कडुलिंब बहुपयोगी असल्याने कडुलिंबाचा उपयोग केवळ आयुर्वेदातच नाही तर याचा उपयोग विविध औषधातही केला जातो. परंतु कडुलिंबाच्या सेवनाबाबत काही सावधगिरी बाळगणे देखील खूप महत्वाचे आहे, जी गोष्ट जितके जास्त फायदे देते तेवढेच त्याचा जास्त उपयोग केल्याने नुकसान पण देऊ शकते. विशेषतः रिकाम्या पोटी कडुलिंबाचे जास्त सेवन केल्याने फायदे कमी आणि नुकसान जास्त होऊ शकत.

या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला कडुलिंब खाण्याचे फायदे व नुकसान याबद्दल सांगणार आहोत तसेच कडुलिंबाचा वापर कसा करावा, कधी आणि किती करावा, या संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात.

कडुनिंबाचे फायदे आणि उपयोग ( Neem ke fayde our upyog in marathi )


आयुर्वेद नुसार कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन करण्याबद्दल विशेष सांगण्यात आले आहे. कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. विविध रोगांवर कडुलिंब वापरण्याची पद्धत खाली दिली आहे.


पोटाच्या आरोग्यासाठी कडुलिंब ( Neem Benefits In Marathi )
कडुनिंबाचा उपयोग अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जात आहे. कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने अल्सर आणि इतर प्रकारच्या जठरासंबंधी समस्या दूर होतात. कडुलिंब आपल्या शरीरातील विषारी आणि हानिकारक जीवाणू बाहेर टाकू शकते. कडुनिंबाचे सेवन निरोगी पचनसंस्था सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. शिवाय पोट निरोगी ठेवण्यासही मदत होते.


रक्त शुद्धीकरणासाठी कडुलिंब :- ( कडुलिंबाचे फायदे आणि नुकसान )

कडुलिंबच्या सेवनाने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करते. हे रक्तातील हानिकारक विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करते आणि रक्त शुद्धीकरनासोबतच शरीराच्या सर्व भागांमध्ये आवश्यक असणाऱ्या पोषक तत्व आणि ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. त्यामुळे मूत्रपिंड व यकृत यांचे कार्य सुधारते, शिवाय रक्ताभिसरण, पचन, श्वसन आणि मूत्र प्रणाली निरोगी ठेवण्यासही मदत करते.


दातांसाठी उपयोगी - (Kadulimba Che Fayde In Marathi)
कडुलिंबाच्या ढिऱ्या कोवळी काठी म्हणजेच दातून चा वापर केल्याने दातातील किडे मारतात व दात मजबूत होतात, म्हणूनच पहिल्या काळात लोक कडुलिंबाच्या कोवळ्या फांद्यांचा वापर दात घसण्यासाठी करत होते.


चेहरा टवटवीत ठेवते -
कडूलिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, चेहऱ्यावर नियमित कडुलिंबाच्या लेप किंवा तेल लावल्याने चेहरा तरुण दिसतो व चेहरा टवटवीत होतो.


मधुमेहासाठी कडुलिंबाचे फायदे -  (कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे)

कडुनिंबाच्या पानांचा अर्क मधुमेहावर प्रभावी उपचार म्हणून वापरला जात आहे. मधुमेह सुधारण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचा एक चमचा रस घ्यावा तसेच डॉक्टर च्या सल्ल्यानुसार घ्यावा, यामुळे मधुमेहाची समस्या सुधारू शकते. तसेच जर तुम्ही कडुलिंबाच्या ताज्या पानाचे सेवन केलेत तरी चालेल. काही अध्ययनातून असे दिसून आले आहे की कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्याने मधुमेह असणाऱ्या रुग्णाची इन्सुलिनची पातळी 30 ते 50 टक्क्यांनी कमी करण्यास मदत करते.


कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते
कडुलिंबाच्या पानांचा उपयोग शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. सकाळी उपाशीपोटी कडुनिंबाची पाने खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. सद्या असंतुलित आहारामुळे आपल्या शारीरात कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढत आहे, त्यामुळे ही कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी काही दिवस कडुलिंबाच्या पानांचे सेवन करून ही पातळी नियंत्रित होऊ शकते.


डार्क सर्कल कमी करा
अपुरी झोप, अशक्तपणा व शरीरातील पोषकतत्वाची कमतरतेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात काळे डाग येतात. तर अश्यावेळी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून ती पेस्ट काळ्या डागावर व वर्तुळावर लावुन ठेवल्याने, हे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून तीन वेळा लावा व काही वेळानंतर, स्वच्छ पाण्याने धुवा असे केल्याने डार्क सर्कल लवकर कमी होतील लवकर कमी होतील.


पिंपल्सच्या समस्येवर फायदेशीर-
वयात आल्यावत चेहऱ्यावर पिंपल्स येणे साहजिकच आहे, पण हे पिंपल्स खुप वेळ होऊनही जात नसतील तर त्याचे डाग चेहऱ्यावर दिसू शकतात. ज्या लोकांच्या चेहऱयावर खूप प्रमाणात पिंपल्स येत असतील अश्या लोकांनी कडुलिंबाची पाने किंवा त्याचा रस खाण्यास सुरवात करावी, कडुलिंबाचा रस रक्त शुद्ध करते, त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कमी होतील. पण लक्षात ठेवा की त्याचा रस खूप कडू असतो, म्हणून तुम्ही त्याचा रस कमी प्रमाणातच घ्या.


प्रतिकारशक्ती वाढवते
कडुलिंबाच्या नियमित सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते कडुलिंबाची पाने किंवा मेडिकल मध्ये मिळणारी कडुलिंबाची कॅप्सूल खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत केली जाऊ शकते.

विषाचा प्रभाव कमी करा

जर कोणाला विषारी कीटक चावला असेल तर त्या जागी कडुलिंबाची पाने वाटून किंवा कुस्करून त्याचा रस काढून त्या चावलेल्या जागी लावल्यास त्या कीटकांच्या विषाचा प्रभाव कमी होतो. पानांऐवजी तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचाही उपयोग त्या ठिकाणी करू शकता.


केसांसाठी कडुलिंबाच्या पानांचे फायदे –
जसे आयोग्यासाठी कडुलिंबाचे खूप फायदे आहेत, तसेच केसांच्या आरोग्यासाठी ही याचे बरेच फायदे मिळतात.
कोरड्या व कमकुवत केसांवर कडुलिंबाची पेस्ट लावल्यास केसांना चमक येते व केस मजबूत बनतात. तसेच कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसातील उवा पण दूर होतात.

हे होते कडुलिंब खाल्याने होणारे फायदे याबद्दल कडुलिंबाचे अजून बरेच फायदे आहेत, तसेच त्याचे दुष्परिणाम ही आहेत. चला जाणून घेऊयात Kadulimbamule honare Nuksan


कडुनिंबाचे दुष्परिणाम Kadulimbamule honare nuksan tote


वर आपण कडूलिंबापासून मिळणारे फायदे बघितले कडुलिंबाचे अनेक फायदे आहेत हे खरे आहे, पण त्याचे जास्त सेवन केल्याने आपल्याला अनेक तोटे होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया याचे काय तोटे आहेत.

1. जर तुम्ही उपवास करत असाल तर या वेळी कडुलिंब खाणे टाळा कारण कडुलिंब शरीरातील साखरेची पातळी कमी करते, उपवासमुळे तुम्ही रिकाम्यपोटी असता अश्यावेळी शरीरातील साखर कमी झाली तर तुम्हाला अशक्तपणा जाणवेल चक्कर येण्याचीही शक्यता असते त्यामुळे जर तुम्ही उपवास करत असाल तर कडुलिंबाचे सेवन करू नये.

2. स्त्रिया गरोदर असतील किंवा स्तनपान करत असतील तरी त्यांनी कडुलिंबाचे सेवन टाळावे. कारण कडुलिंबाच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढेल, जर शरीरातील उष्मा जास्त वाढला असेल तर ती गर्भ गमावू शकते.

3. केस धुन्यासाठी कडुलिंबाच्या रसाचा वापर करत असाल तर, कडुलिंबाचा रस तुमच्या डोळ्यात येणार नाही याची काळजी घ्या, कारण ते तुमच्या डोळ्यांना त्रास देऊ शकते. डोळ्यात जळजळ होउ शकते.

4. कडुलिंबाच्या अतिसेवनाने तोंडाची चव संपू शकते, तोंड बेचव होऊ शकते

5. कडुलिंबाचे जास्त सेवन केल्याने शुक्राणूंची कमतरता भासू शकते. कडुलिंबाच्या अतिसेवनाने धातू पातळ व कमकुवत होऊ शकतो.

6. जर तुम्ही कडुलिंबाचे जास्त सेवन करत असाल, तर तुम्हाला किडनीच्या समस्या होऊ शकतात. मात्र, अशी कोणतीही मोठी प्रकरणे समोर आलेली नाहीत. पण हेल्थ एक्स्पर्ट सांगतात की याचे अतिसेवन करू नये.

7. कडुलिंबाचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन पोटात जळजळ निर्माण करू शकते, पण यावर कोणताही पुरावा नाहीये, पण तरीही काही अद्यायनातून हे समजले आहे की याचे जास्त सेवन पोटातील समस्या वाढवू शकतात.

8. जर तुम्हाला ब्लुड शुगर ची समस्या असेल तर डॉक्टर कडुलिंबाची पाने खाण्याचे सुचवतात जर कडुलिंबाच्या पानांचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त झाले तर लो ब्लुड शुगर ची समस्या होऊ शकते ज्यामुळे अशक्तपणा व चक्कर येऊ शकते.

कडुलिंब किती  प्रमाणात घ्यावे?

कडुनिंबाच्या पानांचा नियमित सेवन करू नका त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही दिवसाला 1 किंवा 2 पाने खाऊ शकता.

कडुलिंबाच्या पानांचा अर्क दातांना आणि हिरड्यांवर महिनाभर वापरु शकता.

हेल्थ एक्सपर्ट च्या मते दररोज 2 मिलिग्राम पेक्षा कमि कडूलिंबाचा रस घेऊ शकता. या आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

ब्रश केल्यानंतर 30 सेकंद माऊथवॉश म्हणून फक्त 15 मिली कडुनिंब वापरा.

केसांमध्ये उवा असल्यास, 100 मिली कडुनिंबाचा रस केसांवर 10 मिनिटे लावा आणि उवा गेल्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.

अस्वीकरण टीप: हा लेख विविध वैद्यकीय वेबसाइटवरून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तयार केला गेला आहे. तुमची जागरूकता आणि ज्ञान वाढवण्यासाठी लेखात समाविष्ट केलेली माहिती आणि तथ्ये सामायिक केली गेली आहेत. नादमराठी लेखात दिलेल्या माहितीचा दावा करत नाही किंवा कोणतीही जबाबदारी घेत नाही. संबंधित विषयावर अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site