Ad code

Latest

6/recent/ticker-posts

मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय खबरदारी घ्यावी -naadmarathi

मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय खबरदारी घ्यावी

पावसाळा चालू आहे त्यामुळे सगळीकडे सतत पाऊस पडत आहे, तरीही लोकांची कामे मात्र चालूच आहेत, लोक कामासाठी घरातून बाहेर जात आहेत, पावसाळ्यात बऱ्याचदा असे होते की, सोबत छत्री न नेल्यामुळे मुसळदार पावसामुळे आपण भिजून जातो. त्याबरोबरच आपल्या सोबत असणारे आपले सामान आपला मोबाईल पण पूर्ण पणे भिजून जातो. 

काही वेळा असे होते की चुकून आपला मोबाईल पाण्यात पडतो, व त्यात पाणी जाते व तो सरळ चालत नाही. अश्या वेळी आपल्याला काय करावे ते सुचत नाही, व आपण घाईगडबतीत मोबाईल व्यवस्थित कसा चालेल या साठी काही न काही करून पाहतो त्याने मोबाईल चे जास्त नुकसान आपण करून टाकतो.

Mobile Pavsat bhijlyabar kay karave  तर या पोस्ट मध्ये आपण पाहूयात की आपला mobile pavsat bhijala tar kay karave किंवा Mobile panyat padalya var kay karave व काय करू नये की आपला स्मार्टफोन जास्त खराब होणार नाही व त्याचे जास्त नुकसान होणार नाही.

1). Mobile भिजल्यावर किंवा पाण्यात पडल्यावर जर तुमचा मोबाइल on असेल तर त्याला switch off करा. व कोणत्याही स्थितीत त्याची बटणे दाबू नका व त्याला on करण्याची चूक करू नका. असे केल्याने त्या भिजलेल्या मोबाईल मध्ये short circuit होण्याची शक्यता नसते.

2). जर तुमच्याकडे जुना मोबाईल असेल, व त्याची बॅटरी बाहेर निघत असेल तर त्याची बॅटरी, सिमकार्ड, मेमरी कार्ड बाहेर काढून ठेवा. असे केल्याने यामध्ये शॉर्ट सर्किट होणार नाही. व मोबाईल चे जास्त नुकसान होणार नाही.


3). बीजलेल्या मोबाइलला सुक्या कपड्याने पुसा व त्याला पंख्याखाली किंवा हेअर ड्रायर ने सुखवा. पण लक्ष्यात ठेवा हेअर ड्रायर ने सुखावतात त्याची हीट जास्त नसावी. जर हेअर ड्रायर ची हीट जास्त असेल तर मोबाईल मधील जॉइन्ट विताळण्याची शक्यता असते.4). जर तुमच्या कडे हेअर ड्रायर नसेल तर तुम्ही जुना 60 watt च्या बल्ब शेजारी मोबाईल सुखावू शकता. 

5). तुम्ही तुमच्या मोबाईल ला जेवढे तुम्हाला शक्य असेल तेवढे खोलून त्यातील पाणी पुसू शकता, व त्याला कोरडा करण्याचा प्रयत्न करा.

6). भिजलेल्या मोबाईल ला खोलून त्याला 10 ते 12 तास तांडळामध्ये ठेवा. तांदूळ मोबाईल मध्ये असणार पाणी शोषून घेईल पण एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्या आत मध्ये म्हणजे हेडफोन जॅक मध्ये तांदूळ जाणार नाहीत याची काळजी घ्या.


7). तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ला साखरे सारखे दाणे असणाऱ्या सिलिकॉन च्या दाण्यासह एका प्लास्टिक च्या डब्यामध्ये 10 ते 12 तास ठेवू शकता सिलिकॉन ओलसर पणा लवकर शोषून घेते.

वर दिलेल्या उपाय करून तुमचा मोबाईल पुन्हा चालू होण्याचे 80 ते 90 टक्के चान्सेस आहेत. तर मित्रानो या पद्धतीचा वापर करून तुमचा mobile bhijala asel tar 90% सरळ करू शकता किंवा त्यासाठी प्रयत्न करू शकता. 

जर एवढं करूनही तुमचा मोबाईल on होत नसेल, तर त्याला रिपेअर शॉपमध्ये दाखवू शकता.

(Image credit :- freepik.com and social media)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site