Ad code

Latest

6/recent/ticker-posts

एकदा नवरा बायकोला म्हणतो marathi jokes

मराठी फणी जोक्स वाचून हसत रहाल Marathi jokes 


आजच्या धावपळीच्या जीवनात लोक हसायला विसरले आहेत. अशा लोकांना हसवण्यासाठी आज आम्ही काही मजेदार मराठी जोक्स घेऊन आलो आहोत. हे जोक्स वाचून तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही. त्यामुळे आताच हे विनोद वाचायला सुरुवात करा व दिवसभरातील सर्व ताण, टेन्शन दूर करून जीवनात नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचे आवडते विनोद तुमच्या मित्रांसह शेअर करा. तुमच्या Facebook वर पोस्ट करा आणि इतर लोकांना हसवा. आणि हो हे जोक्स तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी जोक्स Marathi Jokes: 1

गण्या : माझ्या गर्लफ्रेंडसाठी अंगठी हवीय..
सेल्सगर्ल : अंगठीवर काय नाव टाकू..???
गण्या : नाव नको. “फक्त तुझ्याच साठी" असे लिहा..
सेल्सगर्ल : वॉव! किती रोमँटिक... !!!!
गण्या : त्यात काय रोमँटिक ?
भविष्यात “गर्लफ्रेंड” बदलली तर अंगठी परत कामी येईल ना...
🤪😁😂😱

मराठी जोक्स Marathi Jokes: 2

पुरूषांच आपलं एक भारी असते
स्वतःच्या बायकोच मन कधी कळेल, न कळेल,
पण दुसऱ्याच्या बायकोचे मन कळावे यासाठी भारी धडपड असते बाप्यांची
😂😂😂😂😜😂😂😂😂

मराठी जोक्स Marathi Jokes: 3

वजन कमी करण्यासाठी कोणीतरी मला पहाटे सायकलवर फिरण्याचा सल्ला दिला...

तीन महिने दररोज ८ ते १० किमी सायकलवर फिरले तरी वजन कमी झाले नाही...!

आता मला वाटत...

मागे बसुन वजन कमी होणार नाही...!
सायकल मला स्वत:च 🚴🏼‍♂️चालवावी लागेल...!!

😄😄😄 🙄🙄

मराठी जोक्स Marathi Jokes: 4

आइसक्रीम खरेदी करायची पद्धत...😂😅🤣
अमेरिका 🕵️‍♂️: Give me 1 Magnum, and a Cornetto🍦, one Chocolate Chip Cookie🍯 Dough, and one buttered peacan. 🙂

आपल्याकडे 👶🏻 : एक 5 वालं द्या, आणि एक 10 वालं ,
दोन वाटीतले द्या आणि एक परवा दिलेलं ते द्या,
अन , बाजुचा खातोय .. ते पण एक द्या 🤷🏻‍♂️
🤣😆😃😅🥲

मराठी जोक्स Marathi Jokes: 5

एक दाढीवाला टीसीला म्हणाला ' "औरंगाबाद जेव्हा  येईल, तेंव्हा मला उठव, नाही उठलो तर जबरदस्तीने उतरव."

सकाळी ७ वाजता दाढीवाल्याला जाग आली. औरंगाबाद मागे पडून मुंबईत ट्रेन पोचली होती. दाढीवाल्याने रागारागाने टीसीला शिव्या द्यायला सुरुवात केली‌.

प्रवासी म्हणाले, 'तो एवढ्या शिव्या देतोय. तुम्ही शांत राहून का ऐकताय🤔 ?'

*🕺🏼टीसी म्हणाला,'🙆‍♂️ विचार करतोय... मी ज्या दाढीवाल्याला २ वाजता जबरदस्तीने औरंगाबादला उतरवलं, तो किती शिव्या देत असेल...'* 
🙄

मराठी जोक्स Marathi Jokes: 6
नवरा:- आपल्याला उगाचच मुलगी झाली मुलगा व्हायला हवा होता
बायको :- तुम्ही तर गप्पच बसा
तुमच्या भरवश्यावर राहिले असते तर मुलगी पण नसती झाली

😜😆😂🤣😜😜😂🤣

मराठी जोक्स Marathi Jokes: 7

गण्या :- तुझ्या घरी गेलो होतो,
मला नाही वाटत की आपलं
लग्न होईल..

रमा :- का ? पप्पाना भेटलास का.
गण्या :- नाही तुझ्या बहिणीला..
🥶🙄🤪😜😆😂🤣😅

मराठी जोक्स Marathi Jokes: 8

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती.

मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा.
मग काय !  गाडी सुसाट !!

🚗...

आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.

गीताने कर्ररररकचू्न ब्रेक दाबला.

वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !!

गीता ने डोळे घट्ट मिटून घेतले..

आणि....

हुश्श.....!!
:
:
:
:
:....
गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. अपघात होता होता गीता  वाचली व अशाप्रकारे,

*" गाढवा पुढे वाचली गीता."*
ही म्हण प्रसिद्ध झाली.

😄_______😃

नंतर घाबरलेली गीता घरी आली
आणि घडलेली कथा आपला नवरा हरीला सांगितली.
तिने नवऱ्याकडे हट्टच धरला की ज्या गाढवामुळे माझे प्राण वाचले त्याला पाहुणचारासाठी घरी घेऊनच या.
मग बिचारा हरी गाढवाकडे गेला.
पण गाढवही हट्टी.
ते काही तयार होईना.
शेवटी..
अडलेल्या हरीने गाढवाचे पाय धरले. आणि

*" अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी.."*

ही म्हण तेव्हापासून प्रसिद्ध झाली.

😄_______😃

शेवटी कसाबसा हरी गाढवाला घरी घेवुन आला.

उन्हातून आल्यामुळे गीता ने गाढवास बसायला खुर्ची दिली आणि पाणी व गुळाचा तुकडा खावयास दिला ..

गाढव पाणी गटागटा प्यायला आणि मग गूळ खावयास लागला.

पण अचानक काय झाले कळलेच नाही.
गाढव पाण्याच्या गुळण्या करू लागले.

हरीला आणि गीताला हे कोडे आज पर्यंत सुटले नाही.
..
..
*" गाढवाला गुळाची चव काय "*

ही म्हण यामुळे सगळीकडे व्हायरल झाली.

😃😁

मराठी जोक्स Marathi Jokes: 9

दीपा : "जिथे असशील तिथेच थांब. कुठेही बाहेर पडू नको. पावसामुळे परिस्थिती खूप बेकार आहे. काळजी वाटते. सांगितलेलं ऐक यावेळी तरी!"

आकाश : "बरं, बरं!"

दीपा : "बरं, नक्की कुठे आहेस तू आता?"

आकाश : "माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी. अचानक भेटली. तिने चहाला बोलवलं."

*एकदम सन्नाटा*

दुसऱ्या सेकंदाला दीपा : "जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब. पावसाचे कारण मला सांगु नकोस, समजलं ना."

🙆🏻‍♂️😜😜

मराठी जोक्स Marathi Jokes: 10

लॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या.
असाच एक BA झालेला मुलगा बेरोजगार झाला.
पडेल ते काम करायचं म्हणून तो नोकरी शोधू लागला.
सगळीकडे त्याला नकारच मिळत होता.

एकेदिवशी तो सर्कस पाहायला गेला.
सर्कस पाहून त्याच्या डोक्यावरचा ताण थोडासा हलका झाला.
त्यातच त्याला सूचलं की, इथे एखादी तरी नोकरी नक्कीच असेल.

तो सर्कस अरेंज करणाऱ्या मुख्य मालकापर्यंत जाऊन पोहोचला आणि नोकरीसाठी विचारणा केली.
त्या मालकानेही जवळपास नकारच कळवला.
फक्त एक माकडाचा गणवेश घालून लोकांना हसवण्याचं काम आहे असं त्याने सांगितलं
बेरोजगार मुलगा एका पायावर तयार झाला.

दुसऱ्या दिवशी नोकरी सुरू झाली.
माकडाचे हावभाव करत लोकांना हसवण्याचं कामही छान जमायला लागलं.
एकेदिवशी माकडाचा गणवेश घालून उड्या मारणारा मुलगा वरून चुकून वाघाच्या पिंजऱ्यात पडला.

लोकही आश्चर्यचकित होऊन केवळ पाहत राहिले.

आपला शेवट जवळ आलाय हे समजल्यावर तो तसाच बसून राहिला आणि या बेरोजगारीने आपला कसा बळी घेतला याचा विचार करू लागला.

तेवढ्यात दुसऱ्या टोकाला असलेला वाघ हळूहळू जवळ यायला लागला...

लोक आता स्तब्ध होऊन पाहू लागले...

शेवटी वाघ 🐯जवळ आला आणि हळूच त्या माकडाच्या🐵 कानात पुटपुटला,

*"शिंदे, घाबरू नको. मी, पळशीकर, २०१९ ITI बॅच !"*
😂😂😂😂😂😂😂

तर मित्रांनो हे जोक्स कसे वाटले, जोक्स वाचून हसू आलेच असेल, तुम्ही हे जोक्स तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणे करून त्यांच्या पर्यंत हे पोहचतील. मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात टेंशन सर्वांनाच आहे, पण टेंशन घेऊन काय होणार आहे का, म्हणूनच सांगतो कधीही टेंशन आले की आपले मराठी जोक्स आणि गमती जमती वाचताच राहा व आपले जीवन आनंदी बनवा.

धन्यवाद


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site