Ad code

Latest

6/recent/ticker-posts

न'र्स ने बाळाला बापाच्या हातात दिले Marathi jokes naad marathi

न'र्स ने बाळाला बापाच्या हातात दिले


कसे आहात सगळे, आणि हसताय ना हसायलाच पाहिजे कारण तुम्हाला हसवण्यासाठी घेऊन आलोय धमाकेदार मराठी जोक्स ज्यांना वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल. तर सर्व जोक्स वाचायला विसरू नका आवडले असतील तर मित्रांना नक्की share करा. व कंमेंट करायला विसरू नका.

मराठी जोक्स Marathi Jokes: 1


नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि विचारले
नवरा :- मी कसा दिसतो ते सांग बरं ....!!

बायको :- मेघनाद अरि तात वधी ज्या नराला ।
ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला।
त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी।
तैसे तुम्ही दिसता मजला मनी।

नवर्‍याला याचा अर्थ काही कळेना की बायकोने काय म्हटले..? म्हणून त्याने एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यांनी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.

मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ?
तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ.

दशरथाच्या हातून अजाणतेपणी कोण मारला गेला ?
तर श्रावणबाळ ( मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण ) श्रावण महिन्याच्या अमावस्येला ( संहिता म्हणजे अमावस्या ) कोणता सण असतो ?

तर पोळा . पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची .त्या दिवशी बैलाला सजवतात 
त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात.
आता बोला ....

ती बायको मराठीची प्राध्यापिका असावी ! 

मराठी जोक्स Marathi Jokes: 2


बाजारात आपली पर्स कुठेतरी पडली, हे लक्षात आल्यावर शेवंताबाई पिसाटल्या होत्या. त्यांची पर्स सांभाळणं हे दामोदररावांचं काम असल्याप्रमाणे त्यांच्यावर रागवत होत्या. तेवढ्यात गण्या त्यांची पर्स घेऊन पुढे आला आणि म्हणाला, आजी, ही तुमची पर्स आहे का? 

आजी का रे म्हणतोस, गधड्या?  मावशी किंवा काकू तरी म्हणायचंस ना? इतकी म्हातारी झालेय का मी? असं म्हणत त्यांनी पर्स हातात घेतली आणि म्हणाल्या, हो हो, माझीच पर्स आहे ही. तुला कुठे सापडली?


गन्या म्हणाला, मघाशी तुम्ही माशेवालीला दोन हजाराचे पापलेट दोनशे रुपयांत मागत होता ना, तेव्हा पडली ती ताई.

ताई? शहाणा मुलगा आहेस रे अगदी, असं म्हणत त्याचा गालगुच्चा घेऊन शेवंताबाईंनी पर्स उघडली आणि त्या चक्रावल्या... म्हणाल्या, अरे, या पर्समध्ये दोन हजार रुपये होते...

गन्या म्हणाला, पण, दोन हजारच आहेत की.

शेवंताबाई म्हणाल्या, अरे, पण दोन हजाराची नोट होती... इथे तर शंभराच्या वीस नोटा दिसतायत. हे पैसे सुटे कुणी केले?,

गन्या म्हणाला, मीच केले.

शेवंताबाई म्हणाल्या, अरे पण का?

गन्या म्हणाला, गेल्या आठवड्यात मी पार्वतीबाईंची पडलेली पर्स नेऊन दिली, तर त्या म्हणाल्या, तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तुुला काहीतरी द्यायचं होतं रे, पण पर्समध्ये दोन हजाराची नोट आहे, सुटे पैसेच नाहीत... तुम्हाला तसा प्रॉब्लेम यायला नको ना, म्हणून.

मराठी जोक्स Marathi Jokes: 3


एक महिला डॉक्टर कडे गेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते त्यामुळे तीचा डोळा काळा निळा पडला होता…..डॉक्टर ने विचारले काय झाले?

महिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजत नाही की मी काय करू? माझा नवरा रोज दा'रू पिऊन येतो आणि मला मारतो.

डॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारच चांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दा'रू पिऊन येईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करत जा आणि दातच घासत जा.

तीन आठवड्या नंतर महिला परत आली. ती आता व्यवस्थित दिसत होती आणि आनंदी वाटत होती. महिलेने डॉक्टरांना सांगितले तुम्ही सांगितलेला उपाय मी केला…

त्याचा फारच चांगला परिणाम दिसून आला. आता माझा नवरा मला मारत नाही , दा'रु पण पीत नाही आणि भांडण सुध्दा करत नाही.

डॉक्टर म्हणाले “पाहिलेस, जरा तोंड बंद ठेवलेस, तर किती फरक पडतो.”

मराठी जोक्स Marathi Jokes: 4


डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ?

गण्या : बजरंगाचा लींबाचा साबण…..

डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ?

गण्या : बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट….

डॉक्टर : शॅम्पू ?

गण्या : बजरगाचा हर्बल शैम्पू..

डॉक्टर : हेयर ऑईल ?

गण्या : बजरंगाच आवळ्याच तेल…

डॉक्टर : हे बजरंग मल्टी नॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ?
गण्या : नाही….बजरंग माझा रूम पार्टनर आहे…….

मराठी जोक्स Marathi Jokes: 5


लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी नवरा नवीन नवरीशी भांडायला लागला.आजूबाजूचे लोक जमा झाले,आणि भांडण सोडवून त्याला विचारलं, ‘का रे का भांडत आहेस ?’
नवरा रागाने लालबूंद होऊन सांगू लागला, हि भवानी माझ्या चहा मध्ये तांत्रिक बाबा ने दिलेले ‘तावीज’ टाकून मला वश मध्ये करत होती. माझ्या आई पासून मला वेगळा करण्याचा डाव होता तिचा .

तेवढ्यात बायको ओरडून म्हणाली, तावीज नाही रे नरसाळ्या, Tea Bag आहे ती! गावठी कुठला.

मराठी जोक्स Marathi Jokes: 6


न'र्स ने बाळाला बापाच्या हातात दिले…..बाप आनंदात ओरडला
अरे वाह ! मुलगा झाला… नर्स ने जोरात कानात वाजवली
नर्स- साल्या आधी चष्मा लाव मुलगी झालीय… आणि ते माझं बोट सोड…

मराठी जोक्स Marathi Jokes: 7


बॉसने उमेदवाराला सांगितलं, आम्ही दोन मूल्यं अगदी काटेकोरपणे पाळतो. त्यातलं दुसरं मूल्य आहे, स्वच्छता! ऑफिसच्या दारातल्या मॅटला बूट नीट पुसून आत आलायस ना?

उमेदवार म्हणाला, अर्थातच, सर!

बॉस म्हणाला, आमच्याकडे पहिलं आणि सर्वोच्च मूल्य आहे प्रामाणिकपणाचं. ऑफिसच्या दारात मॅट नाहीये. नाऊ गेट लॉस्ट!

मराठी जोक्स Marathi Jokes: 8


एका नविन जॉईन केलेल्या स'रदार टिचरने ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहा'ले.

तेवढ्यात सरदार टिचर"चं लक्ष एका बाजुला एक'टंच उभं असलेल्या एका मुलाकडे गेलं. त्याला त्या मुलाची किव आली आणि त्याने त्याच्यापाशी जावून त्या"ला विचारले,

” सगळं ठिक आहे ना?’ ‘हो’ त्या मुलाने उत्तर दिले. ‘ मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस?’ त्याने विचारले.

‘नाही मी तिकडे नाही जाणार… मी इकडेच ठिक आहे’ त्या मुलाने उत्तर दिले. ‘ पण का?” स’र’दार टिचरने विचारले.

‘ कारण मी गोलकिपर आहे’ त्या मुलाने चिडून उत्तर दिले.

मराठी जोक्स Marathi Jokes: 9


 दोन सास'वांचा संवाद…… पहिली सासु :- माझी सुन सारखी व्हॉट्स'अप डीपी बदलते ग…..
नाश्त्यानंतर एक….लंचनंतर एक…. डिनर नंतर एक…. सारखं आपलं मॉडेलींग…..छे!!!!
मला अजिबात आव'डत नाही…… आमच्यावेळी नव्हतं हो असं.
दुसरी सासु :- अग पण तू कशाला नाश्त्या'नंतर, लंच नंतर आणि डिनर नंतर लोकांचे डीपी बघत बसते ?
जपाची माळ ओढत बस की मुकाट !!

मराठी जोक्स Marathi Jokes: 10


(नवरा बायकोच भांडण होतं)
बायको: मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच रहा.
नवरा: मी चाललो देवळात…
बायको: मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केले तरी.
नवरा: अग वेडे मी नवस फेडायला चाललो….

Marathi Jokes :- 11


पक्या :- ए मन्या चल आपण दुकान-दुकान खेळू”. मन्या :- ठीक आहे चल खेळू, पण मी दुकानदार बनील तू ग्राहक बन.

पक्या :- ठीक आहे.. थोड्या वेळात पक्या येतो आणि म्हणतो :- काका या बॉटल मध्ये १ kg तांदूळ द्या.

मन्या :- ए पागल बॉटल मध्ये कधी तांदूळ मागतो का ?? जा परत जा.. 

पक्या थोड्या वेळात येतो :- काका या बॉटल मध्ये १ kg गहू द्या..

मन्या :- ए पागल बॉटल मध्ये गहू पण नाही मिळत..जा परत जा मूर्ख….. 

पक्या थोड्या वेळात परत :- काका काका या बॉटल मध्ये १ kg ज्वारी द्या.

मन्या :- अरे किती मूर्ख आहेस तू..काही अक्कल नाही तुला. ठीक आहे तू दुकानदार बन. मी ग्राहक बनून येतो…

थोड्या वेळात मन्या ग्राहक बनून पक्या कडे येतो :- काका काका मला जरा ५ kg तांदूळ, १ kg गहू द्या बरं… 

पक्या :- बॉटल नाही आणली का सोबत????

Marathi Jokes :- 12


मामाकडे जायचं की आत्याकडे

एक सेमिनार मध्ये पोलिटिकल सायन्सचा एक माजी विद्यार्थी किस्सा सांगत होता:

झालं असं की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत एका सायंकाळी वडील त्यांच्या चार मुलांशी बोलत होते,

" उद्या आपण बाहेरगावी जायचं आहे. दोन ऑप्शन्स आहेत. तुमच्या आत्याकड जायचं किंवा तुमच्या मामाकडे जायचं. बहुमताने जे ठरेल तिथं उद्या जाऊया."


मुलांची आई म्हणाली,

"मुलांच्या मामाकडे जायचं आहे."


मुलं एकसूरात म्हणाली,

"आत्याकड जायचं..!"


बाबा म्हणाले,

"ठीक . बहुमत झालं. तुमच्या आत्याकडे जाऊ."

मुलांनी स्वप्न पाहण्यास सुरु केली...

आत्याकडे जायची, तिथं काय काय मज्जा करायची यांची स्वप्नं रंगवत मुलं झोपी गेली.

सकाळी उठून पटापट तयार झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांची आई न्हाणीघरातून स्वतःचे लांब'सडक ओले केस टॉवेलने झाडत, गालातल्या गालात हंसत बाहेर आली आणि म्हणाली,

"बाळांनो, पटापट नाष्टा करून घ्या. आपल्याला मामाकडे जायचं आहे..!"

मुलांनी अविश्वसनीय नजरे'नं बाबांकडे पाहिलं. ते गपचूप आणि लक्षपूर्वक वर्तमानपत्र वाचण्याचा अभिनय करत होते..!

बास...! त्यादिवशी उमजलं की लोकतंत्रात बहुमताचा आदर, मताचा मान वगैरे सगळं बकवास आहे..! खरा निर्णय तर बंद खोलीत त्यावेळेस होतो ज्यावेळेस गरीब' निःसहाय आणि निष्ठावंत जनता झोपी गेलेली असते...!!!

बरोबर कि नाही...!

Marathi Jokes :- 13


शाळेच्या मागील नदीमध्ये गुरूजी बुडत होते.
परश्याने बघितलं,
त्याच्या अंगात विज संचारली, अंगात
जोश आला, रक्त नसा नसात जोरानं
वाहू लागलं, त्याणी आपलं दप्तर खाली
टाकलं, अंगातला शर्ट काढला,
आणि शर्ट हवेत फिरवत ओरडत पळत सुटला,

उद्या सुट्टी आहे, 'उद्या सुट्टी आहे..

मराठी जोक्स Marathi jokes :- 14


एक ढोलवाला लग्नात ढोल वाजवत असतो...

त्याच्या ढोल च्या दोन्ही बाजूला स्त्रीयांची छायाचित्रे असतात हे बघुन...

एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारते: “तु सुंदरतेचा पुजारी दिसतोस.”

ढोल वाला: पुजारी वैगैरे काही नाही, एका बाजुला माझ्या सासुचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजुला बायकोचा. घरात हिंमत होत नाही म्हणून इथे बडवतो.....

दे दनादन !

मराठी जोक्स Marathi jokes :- 15


दोन मित्र होते

एका मित्रा जवळ BMW कार होती तर दुसऱ्याजवळ TATA NANO कार होती. 

एक वेळेस रात्री NANO वाला मित्र BMW मित्राला फोन करतो,

माझ्या गाडीचे पेट्रोल संपले आहे यार, मला घ्यायला ये ना.

तू इथे ये आपण तुझ्या गाडीला माझी गाडी बांधू व पेट्रोल पंपा पर्यंत माझी गाडी घेऊन जाऊ.

BMW वाला मित्र येतो व NANO कार आपल्या कारला बांधतो व म्हणतो,
" जर तुला वाटले की माझी कार जलद जात आहे तर तू मला अप्पर डीप्पर दे , मी कारचा वेळ कमी करेल

रस्त्याने जात असताना मधेच एक Audi कार वाईट पद्धतीने BMW ला ओव्हरटेक करून जाते.

हे पाहून BMW वाला आपण NANO कार ला बांधून सोबत नेत आहोत हे विसरून जातो व दोघांची रेस सुरू होते.

मग काय AUDI आणि BMW ची जबरदस्त रेस सुरू होते.

हे दृश्य रस्त्यावरील एक पोलीस हवालदार पहातो आणि आपल्या अधिकाऱ्याला फोन करतो व सविस्तर माहिती देतो.

अधिकारी विचारतो " कोणकोणत्या गाड्या आहेत."

हवालदार सांगतो AUDI आणि BMW यांच्यात रेस चालू आहे. 
पण गमतीची गोष्ट अशी आहे ,
एक NANO कार BMW आणि AUDI ला ओव्हरटेक साठी सतत अप्पर डीप्पर देत आहे.

कसे आहात सगळे, आणि हसताय ना हसायलाच पाहिजे कारण तुम्हाला हसवण्यासाठी घेऊन आलोय धमाकेदार मराठी जोक्स ज्यांना वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल. तर सर्व जोक्स वाचायला विसरू नका आवडले असतील तर मित्रांना नक्की share करा. व कंमेंट करायला विसरू नका.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site