Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Diploma course म्हणजे काय, कालावधी, फी, फायदे याची संपूर्ण माहिती What is Diploma

डिप्लोमा म्हणजे काय? कधी करावा, फायदे व नोकरीच्या संधी


डिप्लोमा हे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेलच. बहुतेक जणांच्या तोंडून तुम्ही ऐकले असेल की 10 वि नंतर मी Diploma करणार आहे, 12 वि नंतर Diploma करणार हे खूप जण सांगतात. पण बहुतेकांना Diploma mhanje kay याची पूर्ण माहिती नसते. तर या लेखात आम्ही तुम्हाला डिप्लोमा बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत, जसे की Diploma kay asato, Diploma kasa karaycha? 12 vi nantar konta Diploma karava? Diploma fee kiti asate, नोकरीच्या संधी, पगार इ.


डिप्लोमा हा अनेक क्षेत्रात केला जातो जसे की musical, engineering किंवा iti या संबंधित सर्व गोष्टी आणि काम जो डिप्लोमा कोर्स निवडणार, त्यात यासंबंधीचे सर्व शिक्षण शिकवले जाते. भारतात अनेक प्रकारचे डिप्लोमा कोर्स चालवले जातात, जे आठवीनंतर सुरू होतात आणि पदवीपर्यंत किंवा पदवीनंतरही करता येतात.

हा लेख वाचल्यानंतर, तुमच्या मनात डिप्लोमा कोर्सच्या संबंधित कोणतेही प्रश्न राहणार नाहीत.

डिप्लोमा काय असतो (What is Diploma in marathi)

डिप्लोमा हे असे प्रमाणपत्र आहे जे शैक्षणिक संस्थेद्वारे तेथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला दिले जाते. तुम्हाला कोणत्याही विषयाशी संबंधित डिप्लोमा करायचा असेल तर तुम्ही Polytechnic, Computer, CCC, IT किंवा ITI मधून डिप्लोमा करू शकता. वेगवेगळ्या विषयांमध्ये डिप्लोमाचा कालावधी वेगळा असतो. जर तुम्ही पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा करत असाल तर, त्याचा कालावधी 3 वर्ष असतो. आणि जर तुम्ही iti मधून डिप्लोमा केला तर तुम्हाला 1 वर्षात किंवा 2 वर्षात डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल. हे तुम्ही कोणता diploma घेताय यावर अवलंबून असते.

डिप्लोमा करण्यासाठी किती वेळ लागतो?

Diploma sathi kiti vel lagto याबद्दल बोलायचे तर यासाठी खूप वर्षे लागत नाही, काही डिप्लोमा 1 किंवा 2 वर्षात पूर्ण होतो, Engineering विषयात डिप्लोमा करण्यासाठी 3 वर्षे लागतात. बरेच डिप्लोमा कोर्सेस 1 वर्षाच्या आत म्हणजे 6 महिन्यांत पूर्ण केले जातात, ते तुम्ही निवडलेल्या विषयावर व त्या कॉलेज किंवा विद्यापीठावर अवलंबून असतात.

Diploma कोर्स fees

डिप्लोमा कोर्स च्या फी बद्दल बोलायचे तर ते कमीतकमी 10000 पासून 5 लाख पर्यंत असू शकते. ही फी तुम्ही निवडलेल्या कोर्स व विद्यापीठ यावर अवलंबून असेल. जेवढी त्या कोर्स ची फी असेल, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने नोकरी लागल्यावर तुम्ही त्यातून कमवू शकता. त्यामुळे डिप्लोमा कोर्सेस खूप फायदेशीर ठरतात.


डिप्लोमाचे किती प्रकार आहेत? Best diploma course in india


खरं तर पालकांना व विद्यार्थ्यांना तसेच खूप लोकांना 10 वि नंतर व  बारावीनंतर बहुतांश अभ्यासक्रमांची माहिती नसते. बहुतेक विद्यार्थी digree, graduation, Engineering, Medical, Marketing आणि law या क्षेत्रांशीच परिचित आहेत, जे पूर्ण करण्यासाठी बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. असे अनेक कोर्सेस आहेत जे कमी वेळेत आणि कमी पैशात करता येतात, आणि तुम्हाला त्या संबंधीत चांगली नोकरीही मिळते.

डिप्लोमा कोर्सची खास गोष्ट म्हणजे तुम्ही  8 वी नंतरही ITI diploma कोर्स शिकू शकता. 8वि नंतरच्या ITI डिप्लोमा कोर्स मध्ये हे कोर्स तुम्ही करू शकता.

 • Book Binder
 • Carpenter Engineering
 • Cutting and Sewing
 • Embroidery and Needle Worker
 • Mechanic Tractor
 • Plumber Engineering
 • Pattern Maker Engineering
 • Welder (Electric & Gas) Engineering
 • Weaving of Fancy Fabric
 • Wireman Engineering
इ. तुमच्या आवडीनुसार संबंधित विषयात ITI डिप्लोमा कोर्स करू शकता. जेणेकरून तुम्हाला उत्तम नोकरी मिळेल.

त्याचप्रमाणे 10 वी नंतर डिप्लोमा करण्यासाठी तुम्ही हे कोर्स करू शकता.

 1. Diploma in Fine Arts
 2. Diploma in Engineering
 3. Diploma in Stenography
 4. Diploma in Architecture
 5. Diploma in Business Administration
 6. Diesel Mechanical
 7. Electronics
 8. Tool and Die Maker
 9. Computer Operator and Programming
असे diploma कोर्स तुम्ही 10 वि नंतर करू शकता.

या व्यतिरिक्त विविध शैक्षणिक स्तरानुसार म्हणजेच 12 वि नंतर किंवा पदवी नंतर डिप्लोमा कोर्स देखील करता येतो. उदाहरणार्थ,

 1. Diploma in Journalism
 2. Diploma in Nursing
 3. Diploma in Foreign Language
 4. Teaching Diploma
 5. Diploma in Designing
 6. Diploma in Electrical Engineering
 7. Diploma in Mechanical Engineering
 8. Diploma in Computer Science
 9. Diploma in Nutrition and Health Education
 10. Diploma in Yoga Science
 11. Diploma in Visual Communication and Digital Design

अशा अनेक विषयांमध्ये तुम्ही डिप्लोमा कोर्स करू शकता.

तसेच असे अजून खूप diploma कोर्स करायचा असेल तर हे कोर्स उत्तम आहे.

 • Advanced Electronics
 • Baker And Confectioner
 • Desktop
 • Publishing
 • Operator
 • Electrology
 • Instrument Mechanic
 • Metrology and Engineering
 • Mechanic
 • Computer Hardware

डिप्लोमा कोर्स करण्याचे फायदे

 • Diploma course हा digree course पेक्षा कमी खर्चात पूर्ण होतो. व तुम्हाला सहजपणे नोकरी मिळते.
 • Diploma केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीपासून चांगल्या पगाराची नोकरी मिळते.
 • पदवीच्या तुलनेत डिप्लोमा कोर्स करण्यासाठी तुम्हाला कमी वेळ लागतो. तुम्ही तुमचा डिप्लोमा कोर्स तुमच्या फील्डनुसार 6 महिने, 1 किंवा दोन वर्षात पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला आणखी वर्षे वाया घालवण्याची गरज नाही.
 • खूप कॉलेजेस ऑनलाईन Diploma कोर्स पण करतात.
 • बहुतेक डिप्लोमा कोर्सेसमध्ये वर्षातून दोनदा प्रवेश घेण्याची संधी मिळते. अशा प्रकारे, आपण आपले वर्ष वाया जाण्यापासून वाचवू शकता. आणि कोणत्याही डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेऊन तुम्ही तुमचा डिप्लोमा कोर्स करू शकता.
 • तुम्ही पार्ट टाइम कोणत्याही कॉलेजमधून डिप्लोमा कोर्स करू शकता.
 • नोकरीनुसार, काही क्षेत्रात पदवीपेक्षा डिप्लोमाला अधिक मान्यता दिली जाते. कारण इथे तुम्हाला प्रॅक्टिकलही शिकवले जाते.
 • डिप्लोमा कोर्स केल्यानंतर संबंधित क्षेत्रात तुम्ही नोकरीशिवाय सरकारी नोकरी, स्वत:ची कार्यशाळा, स्वत:चा व्यवसायही तुम्हाला करता येतो.

डिप्लोमा कोर्स नंतर नोकरी

Diploma course पूर्ण केल्यानंतर संबंधित विषयातील नोकरीसाठी सहज अर्ज करता येतो. तुम्ही कॉम्प्युटरमध्ये डिप्लोमा केला असला तर तुम्ही कॉम्प्युटर संबंधित नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही डिप्लोमा इन इंजिनीअरिंग कोर्स केला असेल तर तुम्ही तुमच्या engineering क्षेत्राशी संबंधित नोकरीसाठी अर्ज करू शकता. याचा अर्थ कोणत्याही एका विषयाचा डिप्लोमा कोर्स करून नोकरी मिळवता येते. काही क्षेत्रात पदवीपेक्षा डिप्लोमाला अधिक महत्त्व दिले जात आहे. याचे कारण की, डिप्लोमा कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना थिअरीपेक्षा जास्त प्रॅक्टिकल केले जाते. जेणेकरून त्यांना अधिक कामाचा अनुभव मिळेल.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख Diploma mhanje kay, diploma karnyache fayde खूप आवडला असेल, यामध्ये आम्ही तुम्हाला डिप्लोमा कोर्स काय आहे, त्याची फी किती आहे, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळू शकतो याची माहिती दिली आहे.
तुम्हाला ही (डिप्लोमा कोर्स काय आहे) माहिती कशी वाटली, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना हा कोर्स करायचा आहे त्यांच्याशी शेअर करा.

(Image credit :- freepic.com)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site