Ad code

Latest

6/recent/ticker-posts

अशोक चक्रावर असणाऱ्या 24 आऱ्यांचा आपल्या जीवनात किती महत्व आहे जाणून घ्या Ashok chakra in marathi

Meaning of 24 spokes of Ashok Chakra in marathi

जय हिंद मित्रांनो, तुम्ही अनेकदा आपल्या तिरंग्यावर अशोक चक्र पाहिलं असेल, अशोक चक्राला भारताचे प्रतीक मानले जाते. पण या अशोक चक्रामध्ये असणाऱ्या 24 आऱ्यांचे काय महत्त्व आहे? हे तुम्हाला नाहीत आहे का तर आजच्या पोस्टमध्ये आपण याबद्दल बोलणार आहोत. आपल्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजावर तिरंग्यावर एक चक्र आहे, ज्याला आपण अशोक चक्र म्हणतो. आपल्या मानवी जीवनात 24 आऱ्यांचे किती महत्त्व आहे, ते सविस्तर जाणून घेवुया.

तुम्हाला महान बौद्ध सम्राट अशोक बद्दल माहित असेलच, त्याच्या अनेक शिलालेखांवर एक चाक बनवलेले आहे, त्याला अशोक चक्र म्हणतात. हे चक्र धर्मचक्र आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. अशोक स्तंभावर अशोक चक्र आहे, तसेच अशोक चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर देखील आहे. 22 जुलै 1947 ला संविधान सभेने तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार केला, आणि जेव्हा त्याचे फायनल रुप सिलेक्ट केले तेव्हा वरती असणारा चरखा काढून अशोक चक्र ला यावरती स्थापित केले गेले. 

राष्ट्रीय ध्वजावर अशोक चक्र स्थापित करण्याचे पूर्ण श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. या अशोक चक्रावर असणाऱ्या 24 आऱ्या मनुष्याचे 24 गुण दर्शवितात, सोबतच यांना मानव साठी असलेल्या 24 धर्म मार्ग पण सांगतात. अशोक चक्रावर अश्या सर्व गुणांचा उल्लेख केलेला आहे ज्याच्या मदतीने कोणत्याही देशाची सहज प्रगती केली जाऊ शकते.

 अशोक चक्रावरील 24 aaryanche काय महत्त्व आहे ते आता जाणून घेऊया. ashok chakra var kiti lines astat in marathi
1). पाहिले आरे - संयम :- हे मानवाला संयमाने जीवन जगण्याची प्रेरणा देते.
2). दुसरे आरे - आरोग्य :- यातून निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.
3). तिसरे आरे - शांती :- देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सल्ला देते.
4). चौथे आरे - त्याग :- देश आणि समाजासाठी त्यागाची भावना विकसित करणे.
५). पाचवे आरे - शिल :- वैयक्तिक स्वभावासाठी नम्रतेचे शिक्षण.
६). सहावे आरे - सेवा :- देश आणि समाज सेवेचे शिक्षण.
७) सातवे आरे - क्षमा :- मानव आणि प्राणी यांच्याबद्दल क्षमेची भावना.
8). आठवे आरे - प्रेम :- देश आणि समाजाप्रती प्रेमाची भावना.
9). नववे आरे - मैत्री :- समाजात मैत्रीची भावना.
10) दहावे आरे - बंधुत्व :- देशभक्ती आणि बंधुभावाची भावना.
11) अकरावे आरे - संघठन :- राष्ट्राला एकात्मता आणि अखंडतेने मजबूत ठेवण्यासाठी.
१२). बारावे आरे - कल्याण :- देश आणि समाजाच्या कल्याणात सहभागी व्हा
13). तेरावे आरे - समृद्धी :- देश आणि समाजाच्या समृद्धीसाठी हातभार लावणे.
14). चौदावे आरे - उद्योग :- देशाच्या औद्योगिक प्रगतीला मदत करणे.
१५). पंधरावे आरे - सुरक्षा :- देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहा.
१६). सोळावे आरे - नियम :- वैयक्तिक जीवनात संयतपणे वागण्याचे नियम.
17). सातरावे आरे - समता:- समतावादी समाजाची स्थापना करणे.
18). आठरावे आरे - अर्थ :- पैशाचा सदुपयोग करणे.
19). एकोणीसावे आरे - निती :- देशाच्या धोरणावर निष्ठा ठेवणे.
20). विसावे आरे - न्याय :- सर्वांसाठी न्यायाचे बोलणे.
21). एकविसावे आरे - सहकार्य :- एकमेकांसोबत एकत्र काम करणे.
22). बावीसवे आरे - कर्तव्ये :- कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे.
23). तेविसावे आरे - हक्क:- तुमच्या अधिकारांचा गैरवापर करू नका.
24). चोविसावे आरे - बुद्धिमत्ता :- देशाच्या भरभराटीसाठी स्वतःची बौद्धिक क्षमता विकसित करणे.

तर अशोक चक्रात दिलेल्या 24 वाक्‍यांचे हे अर्थ होते. प्रत्येक आऱ्यांचा अर्थ आपल्या मानवी विकासासाठी खूप महत्वाचे आहे. सर्व आऱ्यां देशाच्या आणि समाजाच्या समृद्धी बद्दल बोलतात. तमाम देशवासीयांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये यांचा स्पष्ट संदेश देण्याबरोबरच रंग, रूप, जात, धर्म हे भेद विसरून संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधून देशाला समृद्ध बनवायला हवे, असेही ते सांगतात. तसेच देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे असे ही सांगतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site