Ad code

Latest

6/recent/ticker-posts

गावामध्ये जास्त नफा देणारे 20 व्यवसाय व गावात पैसे कमवण्याचे सोपे मार्ग business ideas in village

गावामध्ये जास्त नफा देणारे 20 व्यवसाय व गावात पैसे कमवण्याचे सोपे मार्ग business ideas in village


आपल्या देशातील बहुतेक लोक खेडे गावात राहतात, गावातील बहुतेक लोक मोलमजुरी करून आपला उदर निर्वाह करत असतात. बहुतेकांना गावात पैसे कमवण्याचे मार्ग काय आहेत ज्या बद्दल त्यांना माहित नाही. गावांमध्ये कमी नोकरीच्या संधी असल्याने गावातील अनेक लोक शहरात जाऊन नोकऱ्या करणे पसंत करतात. पण तेथेही चांगली नोकरी व पगार मिळत नाही, म्हणून खूप असे तरुण गावमध्येच राहून कामधंदा करत आहेत. नोकऱ्या करत आहेत किंवा काहीतरी उद्योग करायचा विचारात आहेत म्हणूनच आजच्या या लेखात, आम्ही गावात राहून पैसे कमवण्याच्या काही उत्तम मार्गांबद्दल तसेच कमी भांडवलात उद्योग करण्याचे मार्ग सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमचा गावामध्ये राहून पैसे कसे कमवायचे हा प्रश्न सुटेल.


मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पैसे कमवण्याचे बहुतेक मार्ग गावातच आहेत, तरीही लोकांना गावात राहून पैसे कमवण्याचे मार्ग का मिळत नाहीत, हा एक मोठा प्रश्न आहे.

गावी तुम्ही कोणताही व्यवसाय फुकटात व कमी खर्चात सुरू करू शकता व त्याद्वारे पैसे कमवू शकता. आजच्या काळात जर तुम्ही गावातुन पैसे कमवण्याचे मार्ग शोधत असाल तर या पोस्ट मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तुम्हाला गावी राहून पैसे कमवण्याचे मार्ग व बिजनेस आयडिया बद्दल सांगणार आहोत.


ज्याच्या मदतीने तुम्ही गावातून 20 ते 30 हजार रुपये सहज कमवू शकता, जर तुम्ही मेहनत केली तर, हे सर्व तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. हे पैसे कमावण्याचे मार्ग फक्त गावातच नाही तर शहरात ही खूप फायदेशीर आहेत.

Village Business Ideas in marathi गावांमध्ये पैसे कमवण्याचे सोपे मार्ग

1) किराणा दुकान

मित्रांनो, जर तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी थोडे फार पैसे असतील, तर गावात किराणा दुकान उघडून घरी बसून पैसे कमवण्याचे मार्ग तयार करू शकता. किराणा दुकान ही गावात चालणाऱ्या व्यवसायातील सर्वोत्तम व्यवसाय पद्धत आहे. अनेकजण आपल्या गरजेच्या छोट्या छोट्या वस्तू बाजारात न जाता जवळच्या किराणा दुकानातच विकत घेतात, कारण बाजार हा गावापासून बरेचदा लांब असतो आणि तो दूर नसला तरीही किराणा दुकानाचा धंदा चांगला चालेल.

2) हळद पावडरचा व्यवसाय


हळद ही आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आपल्याकडे भहुतेक खाद्यपदार्थांमध्ये हळद वापरली जाते. त्यामुळे हळद पावडरचा व्यवसाय हा पैसा मिळवण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो. हळदीची नेहमीच आपल्या स्वयंपाक घरात गरज भासणार असल्याने तुम्ही हळद पावडरचा व्यवसाय सुरू करू शकता. ज्यामुळे तुम्ही जास्त नफा मिळवू शकता. तुम्हाला एकतर कच्ची हळद विकत घेवु शकता किंवा आपल्या शेतात उगवू शकता, नंतर तीला गरम उन्हात वाळवावे लागते. त्यानंतर ही अख्खी हळद गिरणीमध्ये किंवा मशिनमध्ये बारीक दळल्यानंतर ते पॅकेटमध्ये भरून बाजारात विकु शकता. तुम्ही ही हळद दुकानांमध्ये किंवा घरोघरी विकू शकता. एक गोष्ट फायद्याची म्हणजे लोक रेडिमेड मिळणाऱ्या हळदी पेक्षा घरगुती हळद घेण्यास प्राधान्य देतात.

3) मिरची पावडरचा व्यवसाय

मिरची पावडरचा व्यवसायही गावात कमाईच्या मार्गाने खूप चालणारा उद्योग आहे. मसाले तयार विकणे हा देखील घरी बसून पैसे कमवन्याचा न संपणार व्यवसाय आहे जो तुम्ही तुमच्या परिवारा सोबत करू शकता.

यामध्ये आधी बाजारातून सुकी मिरची विकत घेऊन, ती उन्हात चांगली वाळवल्यानंतर मशीनमध्ये बारीक करायची. व त्या पावडरची पाकिटे बाजारात विकायची. बाजारात मिळणाऱ्या मिरची पावडर च्या तुलनेत घरगुती मिरची पावडर चवीला उत्तम असते.

4) लोणचे बनवणे


लोणचे म्हटल्यावर कस तोंडाला पाणी सुटते ना, जेवणाच्या ताटात लोणचे खूप महत्वाचे आहे. लोणच्याशिवाय ताटातील अन्न अपूर्ण वाटते. केवळ अन्नच नाही तर ते तुमच्या उत्पन्नातही भर घालू शकते. जर तुम्हाला उत्तम लोणचे तयार करता येत असेल तर तुम्ही यापासून चांगली कमाई करु शकता. लोणच्याचा व्यवसाय कोणत्याही हंगामात सुरू करता येतो.

तुम्ही गावात लोणचे बनवण्याचे काम करून पैसे कमवू शकता. काही पैसे खर्च करून तुम्ही हे काम सुरू करू शकता. तुम्ही आंबा,लिंबू, आवळा व मिक्स लोणचे तयार करून, त्याची पाकिटे किंवा बरण्या तयार करून बाजारात विकू शकता. तसेच मागणीनुसार हे काम केल्यास लोणच्यापासून 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.


हे पण वाचा :- गावातून online पैसे कसे कमवायचे


5) मिनी ऑइल मिलचा व्यवसाय

मिनी ऑइल मिलचा व्यवसाय हा खूप चांगला व्यवसाय आहे. तुम्ही मोहरी, तेलबिया, भुईमूग, खोबरे, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादीपासून तेल काढण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय गावात सुरू करणे खूप सोपे आहे आणि याद्वारे तुम्हाला खूप चांगला नफाही मिळू शकतो.

तेल काढल्यानंतर जो कचरा शिल्लक राहतो त्याला पेंड किंवा खल म्हणतात आणि ते खूप महत्वाचे आहे. कारण तेलंच नाही तर पेंड विकुनही तुम्ही गावात रोजगार निर्माण करू शकता. कारण तेल काढल्यावर जो कचरा राहतो तो जनावरांना चारा म्हणून दिला जातो, त्याची बाजारात मागणीही खूप असते त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल.

6) कुक्कुटपालन व्यवसाय करा आणि गावात पैसे कमवा


पोल्ट्री फार्म हा सर्वोत्तम व्यवसाय आहे जो खूप लोक करतात. कारण बाजारात चिकनला व अंड्यांना खूप मागणी असते, यावरूनच तुम्ही किती पैसे कमवू शकता याची तुम्ही कल्पना करू शकता. कुक्कुटपालन करताना तुम्हाला फक्त अंडी आणि चिकनचाच नाही तर, कोंबड्यांच्या विष्ठेचे कंपोस्टिंग करून तुम्ही त्याचे खत शेतकर्‍यांना विकले तर तुम्हाला त्यातही भरपूर उत्पन्न मिळेल.


गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय फार कमी लोक करतात, त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही तुमच्या गावात केलात तर तुम्हाला भरपूर नफा मिळेल. पोल्ट्री फार्म हा व्यवसाय थोडा महाग आहे पण हा व्यवसाय करणे खूप सोपे आहे. कोंबडीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त जमिनीची गरज लागत नाही, तुमच्याकडे थोडी जमीन असेल तर तुम्ही त्यात कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही बाजारात चिकन शॉप मध्ये कोंबड्या व त्यांची अंडी विकून उत्तम कमाई करू शकता.

7) चहा पावडर चा व्यवसाय

सद्या पाहिलात तर सगळीकढेच चहाची दुकाने पाहायला मिळतात. कारण हाच एक धंदा आहे जो दिवसेंदिवस वाढत आहे व त्याचा खप ही वाढत आहे. तसेच प्रत्येकाच्या घरी सकाळी व संध्याकाळी चहा न चुकता बनवला जातो. लहान किंवा मोठ्या शहरात फक्त चहाची पावडर विकण्यासाठी स्वतंत्र दुकान आहे. थोडंसं मन वळवलं तर गावात पैसे कमवण्याचा हा पण एक सोपा मार्ग बनवता येतो.

तुम्ही एकावेळी चहाची पावडर विकत घेऊन नंतर त्याची छोटी पॅकेट 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम चे पॅकेट घरीच बनवुन बाजारात विकू शकता. कारण आपल्याकडे चहा प्रेमींची कमी नाहीये.

8) खत आणि बियाणांचे दुकान

मित्रांनो, गावात वर्षभर काही ना काही पीक येतच असते. आणि आजच्या युगात शेतीला खत वापरल्याशिवाय पीकही नीट येत नाही, त्यामुळे शेतीमध्ये नेहमी खताची गरज भासते. तुम्ही गावी पैसे कमवण्यासाठी खत आणि बियाणांचा व्यवसाय करू शकता. तुम्ही सर्व भाजीपाल्याची बियाणे व कंपोस्ट खत किंवा रासायनिक खते विकून गावात पैसे कमवू शकता. तसेच शेतीला आवश्यक असणारी अवजारे विकुनही चांगली कमाई करू शकता.

9) नर्सरी फार्म


नर्सरी व्यवसाय करून तुम्ही महिन्याला उत्तम कमाई करू शकता. प्रत्येकजण आपल्या परिसरात फुलांंची किंवा फळांंची झाडे लावत असतो. तसेच घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी लोक सुंदर व शोभेच्या रोपांची खरेदी करतात. या शोभेच्या झाडांना आणि रोपांना बाजारात खूप मागणी आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही nursery business करण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्यासाठी गावी पैसे कमावण्याचा चांगला मार्ग ठरू शकतो.

10) गावात भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करून पैसे कमवा.

भाजीपाला बाजार भारतातील फार कमी गावांमध्ये आढळतो, व भाजी घेण्यासाठी लोक आठवडा बाजारातून भाजी खरेदी करतात. काहीवेळा लोकांना भाजी घेण्यासाठी दूरवर शहरात जावे लागते. तुम्ही आपल्या शेतात विविध प्रकारची पालेभाजी व फळभाजी पिकवू शकता व त्यांना बाजारात किंवा गावागावात घरोघरी भाजीपाला विकू शकता तर या व्यवसायातही खूप फायदा होईल.

11) पिठाच्या गिरणीचा व्यवसाय करून गावात पैसे कमवा.

भारतातील जवळपास सर्वच खेड्यांमध्ये शेती केली जाते, परंतु पिठाच्या गिरण्या खेड्यात क्वचितच आढळतात. जर तुम्ही पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू केला तर ते खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण गावात सकाळी नाश्त्याला व रात्री जेवणात भाकरी हमखास असतेच. व गावात लोक बाजारात पीठ विकत न घेता गिरणीवरच दळतात, म्हणून हा व्यवसाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.

जर तुम्ही पिठाच्या गिरणीचे मशीन घेतले तर त्याची किंमत 30 - 40 हजार आहे आणि वीज आणि परवाना आवश्यक आहे. तुम्ही पिठाच्या गिरणीने तांदूळ, नाचणी, बाजरी, गहू इ. चे पीठ तयार करू शकता, यामुळे तुम्हाला महिन्याला 20 ते 30 हजार रुपये सहज मिळतील.

12) फुलांचा व्यवसाय


आजकाल कोणताही सण, उत्सव, वाढदिवस, लग्न, पूजाविधी किंवा कोणत्याही कार्यक्रमात फुलांचा वापर केला जातो. फुलांचे उत्पादन शहरापेक्षा गावात जास्त होते. अशा परिस्थितीत गावातून फुलांचा व्यवसाय करायचा असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही फुलांची लागवड देखील करू शकता आणि नंतर शहरातील कोणत्याही विक्रेत्याला फुले विकू शकता. किंवा तुम्ही कोणत्याही शेतकरी किंवा फुल उत्पादकाकडून फुले खरेदी करू शकता आणि वेगवेगळ्या डिझाईनचे हार करून किंवा पुष्पगुच्छ बनवून त्यांची शहरात विक्री करू शकता. हा व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येतो, ज्यामध्ये जोखमीचे प्रमाणही खूप कमी असते व नफा जास्त असतो.

13) छोटे प्रॉडक्ट निर्माण करण्याचा व्यवसाय करून पैसे कमवा.

तुम्ही घरी कोणतेही छोटे प्रॉडक्ट तयार करून गावात पैसे कमवू शकता, या वस्तूमध्ये शोभेची वस्तू, खाद्यपदार्थ, सजावटीतीचे साहित्य, किंवा पत्रावळी, कप, पेपर बॅग असे खूप वस्तू आहेत ज्या दैनंदिन जीवनात वापरल्या जातात.


सद्या बाजारात डिस्पोज़ेबल उत्पादन खूप मागणीत आहेत, आणि हा व्यवसाय करण्यासाठी जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नसते. तुम्ही असा माल तयार करून बाजारात दुकानात विकू शकता.

14) गॅरेज उघडा.

आजकाल प्रत्येक गावातील प्रत्येक घरात एक ना एक मोटारसायकल नक्कीच आढळते. तसेच एक-दोन सायकली तुम्ही विचार करू शकता की तुमच्या गावात मोटारसायकलचे गॅरेज असेल किंवा कोणत्याही प्रकारचे गॅरेज उघडले तर ते किती टिकेल आणि त्यातून तुम्हाला किती कमाई होईल?

जर तुम्हाला हा व्यवसाय व्यवस्थित उघडायचा असेल तर तुम्हाला यासाठी 1 लाख पर्यंत खर्च येईल. जर तुम्ही हा व्यवसाय एकदा उघडलात तर तुम्ही यातून दीर्घकाळासाठी पैसे कमवू शकता.

15) गावात दूध डेअरी व्यवसाय करून गावात पैसे कसे कमवायचे


गावात पैसे मिळवण्यासाठी दूध डेअरी हा सर्वात सोपा आणि चालणारा व्यवसाय आहे. कारण गायी म्हशींना लागणारे खाद्य गावात सहज उपलब्ध असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 10-12 गायी आणि म्हशींची गरज आहे. जेणेकरून तुम्ही डेअरी उघडू शकता. या व्यवसायातून तुम्ही महिन्याला किमान 40 हजार रुपये सहज कमवू शकता.
दूध डेअरीचा खर्च सुमारे 20 ते 30 हजार रुपये येईल. (म्हैस खरेदी केली नाही तर )
मग तुम्ही दूध आणि तूप, दही, लोणी, चीज इत्यादी दुधापासून बनवलेले इतर पदार्थ शहरांमध्ये दुकानात विकू शकता, ज्यातून तुम्हाला भरपूर नफा मिळेल. या व्यवसायात तुम्ही सुरुवातीलाच महिन्याला 10 ते 20 हजार रुपये कमवू शकता.

16) तुमचे स्वतःचे ट्यूशन सेंटर किंवा कोचिंग सेंटर उघडून पैसे कमवा

आजकाल, सर्व पालकांना आपल्या मुलाने भविष्यात खूप मोठे व्हावे, त्याने खूप अभ्यास करावा शिकावे तसेच आपल्या मुलाने शक्य तितके अभ्यासात व्यस्त असावे असे वाटते, म्हणून ते सर्वजण आपल्या मुलांना शिकवण्यासाठी फक्त शाळेतच नाही तर कोचिंगला पण नक्कीच पाठवतात. ट्यूशन सुविधा शहरांमध्ये सहज उपलब्ध आहे, परंतु जेव्हा खेड्यांचा विचार केला तर तेथे शिकवणी किंवा कोचिंग सेंटर सापडणे फारच कमी आहे.

तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा 12वी पर्यंत शिक्षण घेतले असेल तर तुम्ही तुमच्या गावात एक कोचिंग सेंटर उघडू शकता व मुलांना शिकवू शकता, तुम्ही यातून खूप चांगले पैसे कमवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अभ्यासाचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.

17) सजावटीचा व्यवसाय

तुम्हाला ग्रामीण भागात चालणारा व्यवसाय करायचा असेल तर मंडप किंवा decoration चा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला राहील. शहरात लोक हॉलवर जाऊन कार्यक्रम, लग्न, बारसे करतात. पण आजही गावागावात घरोघरी लग्न होतात, आणि लग्न उरकण्यासाठी सजावटीची गरज असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही decoration चा व्यवसाय सुरू केला आणि लोकांच्या घरी जाऊन तंबू लावले सजावट केली तर तुम्हाला भरपूर नफा मिळेल.

मंडप लावण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज लागणार नाही, कारण तुम्ही मंडपाचे किंवा डेकोरेशन चे साहित्य एकदाच विकत घेतले तर ते तुम्हाला दीर्घकाळ पर्यंत टिकेल, तुम्ही यातून लाखो रुपयांहून अधिक कमाई करू शकता. मंडप चा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला 50 हजार ते 1 लाख रुपये ची आवश्यकता असेल.

18) amazon वर वस्तू विकून गावातून पैसे कमवा

मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का तुम्ही गावातून Amazon ला जॉईन करून खूप चांगले पैसे कमवू शकता.

गावातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोक ऑनलाइन खरेदी करतात जसे की फुलझाडे, दातून, गाईचे तूप आणि बरेच काही. तुम्ही ऍमेझॉन सेलर बनून तुम्ही या सर्व गोष्टी ऑनलाइन विकू शकता. जसे मातीच्या मुर्त्या, लाकडी साहित्य, सजावटीचे सामान इत्यादी ऑनलाईन विकून उत्तम कमाई करू शकता.

19) गावात मत्स्यपालन व्यवसाय करून पैसे कमवा


मत्स्यपालन व्यवसाय हा देखील गावातच नाही तर शहरात ही चांगला चालणारा आणि अधिक फायदेशीर व्यवसाय आहे. तुम्ही गोड्या पाण्यातील मासे किंवा खाऱ्या पाण्यातील मासे पकडून त्यांना विकू शकता. किंवा मत्स्यपालन करून बाजारात विकून पैसे कमवू शकता. मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला थोडी जमीन लागेल. या जमिनीत खोदून मोठा खड्डा तयार करून त्यात पाणी भरून एक चांगला तलाव बांधून तुम्ही मासे पाळू शकता. मासे मोठे झाल्यावर त्यांना गावात किंवा बाजारात विकू शकता. मत्स्यपालन सोबतच तुम्ही खेकडे व मोत्यांची शेती करून खूप कमाई करू शकता.

20) वाहतुकीचा चा व्यवसाय करून गावात पैसे कसे कमवायचे?

गावामध्ये वाहतुकीचा व्यवसाय ही तुमच्या जवळच्या ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एका बाजारपेठेतून दुसर्‍या बाजारपेठेत जाण्यासाठी एक उत्तम व्यवसाय कल्पना आहे. गावापासून बाजारपेठ दूर असते, तसेच मुलांची शाळा, दवाखाने, इतर सोयीच्या गोष्टी गावात उपलब्ध नसतात. वाहतुकीचा व्यवसाय गावातील कोणतीही व्यक्ती सुरू करू शकते तुम्ही रिक्षा, टमटम, टॅक्सी ने हा व्यवसाय सुरू करू शकता व गावामध्ये कमाईचे साधन निर्माण करू शकता.


हे पण वाचा :- ऑनलाईन पैसे कसे कमवायचे 

तर मित्रांनो, या पोस्ट मधून तुम्हाला  2022 मध्ये  Village business ideas in marathi व Gavamadhe paise kamavnyache marg माहित आहेत, मला आशा आहे की तुम्हाला आजचा लेख आवडला असेल. गावात कोणताही व्यवसाय सुरू केला तर आपला व्यवसाय फार काळ टिकणार नाही याची भीती लोकांना वाटते.

पण असे नाही, कोणताही व्यवसाय योग्य प्रक्रियेने सुरू केला तर तो नक्कीच यशस्वी होतो. व्यवसायात शिस्त आणि संयम असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या स्मरणात दोन्ही गोष्टी असतील तर तुम्हाला व्यवसायात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

गावात पैसे कमवण्याचा या सोप्या मार्गांपैकी कोणता मार्ग तुम्हाला सर्वात जास्त आवडतो, खाली कमेंट करून आम्हाला सांगा. तथापि, आम्ही तुम्हाला येथील लोकप्रिय Gavat paise kamavnyache marg सांगितले आहेत, ज्याद्वारे तुम्ही मोठी कमाई करू शकता. तुम्ही वर नमूद केलेल्या पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत निवडल्यास तुमच्यासाठी gavat paise kamavnyasathi  हा सर्वोत्तम मार्ग असेल.


(Image credit :- Freepic.com)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site