Ad code

Latest

6/recent/ticker-posts

घरात माश्या येतात मग हे 10 उपाय करून माशांना पळवून लावा How to get rid of house flies outside in marathi

घरातील माश्या पळवून लावण्याचे 10 अचुक उपाय


सध्या पावसाळा सुरू आहे आणि अशा वातावरणात घरामध्ये माश्या येणं सामान्य गोष्ट आहे. पावसाळ्यात माश्या खूप त्रासदायक असतात, त्यांच्यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाला या माशांना त्यांच्या घरापासून दूर ठेवायचे असते. मात्र सर्व प्रयत्न करूनही या माशा येतच राहतात. त्यामुळे घरांमध्येही संकटाची परिस्थिती निर्माण होते, कारण यामुळे रोगराई पसरू शकते.या माश्या घरभर उडत राहतात आणि बहुतेक वेळा अन्नपदार्थांवर येऊन बसतात. अनेक वेळा माश्या घाणेरड्या जागी बसतात आणि नंतर स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थांवर येऊन बसतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरातील अन्न दूषित होते. माश्या घरात जीवाणू आणि जंतूंना जन्म देतात आणि अनेक प्रकारचे संक्रमण पसरवतात. जर तुम्हालाही पावसात माशांचा त्रास होत असेल तर या घरगुती उपायांनी तुम्ही माशांना दूर करू शकता.

या माशांना हाकलण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो, पण योग्य फळ त्यांच्याकडून मिळत नाही. जर तुम्हाला या हट्टी माश्यापासून तुमचे घर मुक्त करायचे असेल तर अनेक नैसर्गिक गोष्टीं व घरगुती उपाय आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही त्यांना तुमच्या घरातून कायमचे हाकलून देऊ शकता.

माशांना घरापासून दूर ठेवण्यासाठी हे उपाय करा:

1) कापूरचा वापर करून माशांना दूर ठेवा

कापूरचा वास खूप तीव्र असतो. त्यामुळे माशा या वासाने लगेच पळून जातात. कापूर वापरून तुम्ही घरच्या घरी स्प्रे बनवू शकता. कापूरचा स्प्रे बवण्यासाठी 8-10 कापूरचे गोळे बारीक करून पावडर बनवा. आता या पावडरमध्ये एक ग्लास पाणी घालून स्प्रे बाटलीत भरा. जिथे जास्त माशा दिसतील तिथे या स्प्रे ने फवारणी करा. त्यामुळे घरातील माश्या पळून जातील. या शिवाय तुम्ही थोडा कापूर जाळा आणि खोलीभोवती फिरवा, त्याच्या वासाने माश्या पळून जातील.2) काही खास तेलांचा वापर करून घरातून माशा घालावा
माशी दूर ठेवण्यासाठी लॅव्हेंडर, निलगिरी, पुदीना आणि लेमनग्रास यांची तेल वापरली जातात. हे तेल त्यांच्या सुगंधासाठीच नव्हे तर माशांना दूर करण्यासाठी देखील वापरले जातात. या तेलाचे तुमच्या बेडरूममध्ये आणि किचनमध्ये शिंपडल्याने येथे माश्या येणार नाहीत.
लवंगाच्या तेलाच्या वासाने डास आणि माश्या पळून जातात हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. तसेच लवंगाचे तेल खोबरेल तेलात मिसळून त्वचेवर लावल्यास ते ओडोमॉससारखे काम करते.

3) तुळशीची पाने माशा घालवण्यासाठी उपाय
तुळशीच्या पानांचा सुगंध आल्याने माश्या घरात येत नाहीत. प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप आढळते. अशा परिस्थितीत तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करून घरगुती स्प्रे बनवू शकता यामुळे माश्या पळून जातील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजारातून तुळशीचे स्प्रेही विकत घेऊ शकता. घरच्या घरी तुळशीचा स्प्रे बनवण्यासाठी सुमारे 15 ते 20 पाने गरम पाण्यात उकळा किंवा भिजवा. आता हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा व जिथे माशा जास्त बसतात तिथे तुम्ही याची फवारणी करू शकता.

4) नैसर्गिक स्प्रे घरातील माशा पळवून लावण्याचे उपाय
हानिकारक रासायनिक कीटक नियंत्रण फवारण्या वापरण्याऐवजी, आपण नैसर्गिक फवारण्याचा वापर करू शकता जे खूप प्रभावी आहेत. घरी बनवलेले हे नैसर्गिक स्प्रे, बनवायला खूप सोपे आणि सुरक्षित आहेत. हे स्प्रे बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन चमचे मीठ मिसळा आणि यात लिंबाचा रस घाला. मग हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत घ्या आणि तुमच्या घराच्या खिडकी आणि दरवाजाजवळ फवारणी करा. या स्प्रेला सुगंधी बनवण्यासाठी तुम्ही तुळस, लेमनग्रास किंवा लॅव्हेंडरचे किंवा यांच्या तेलाचे काही थेंब टाकू शकता.

5) फ्लाय पेपरचा वापराने घरातील माशा पळून जातील
माश्या दूर ठेवण्यासाठी तुम्ही फ्लाय पेपर देखील वापरू शकता. फ्लाय पेपर तयार करण्यासाठी साखर आणि कॉर्न स्टार्चचे द्रावण तयार करा आणि जाड तपकिरी कागदावर पसरवा. ते तुमच्या घराच्या दाराला टांगून ठेवा म्हणजे माश्या त्याला चिकटतील व घरात येणार नाहीत. फ्लाय पेपर बाजारात सहज उपलब्ध असतो, तो घेऊन तुम्ही दाराशेजारी किंवा खिडकीपाशी टांगून ठेवू शकता.

6) आल्याचा स्प्रे घरातील माशा जाण्यासाठी घरगुती उपायआल्याच्या फवारणीपासून माश्या व किटक पळून जातात. हा स्प्रे तुम्ही घरी बनवू शकता. यासाठी सुमारे 1 ग्लास पाणी घ्या आणि त्यात कच्चे आले किसून घालुन किंवा बारीक करून घाला त्याला चांगले मिसळून घ्या. आता हे मिश्रण गाळून स्प्रे बाटलीत भरा व स्वयंपाकघर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी स्प्रे करू शकता.


7) ऍपल सायडर व्हिनेगर घरातील माशा घालवण्यासाठी उपाय
तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर देखील वापरू शकता. यासाठी 1/4 कप सफरचंद साइड व्हिनेगर घ्या आणि त्यात निलगिरी तेलाचे 50 थेंब घाला. आता ते एका स्प्रे बाटलीत टाकून मिक्स करा आणि माश्या बसण्याच्या जागेवर याची फवारणी करा.

8 दालचिनी च्या वापराने घरातील माशा घालवा
घराच्या त्या भागात दालचिनी ठेवा जिथून माश्या घरात येतात, माशांना दालचिनी चा तीव्र वास सहन होत नाही. म्हणून त्या त्यापासून पळून जातात.

9) दूध आणि मिरपूड
यासाठी एका कप दुधात एक चमचे काळी मिरी आणि 2 चमचे साखर मिसळून, जिथे माश्या जास्त फिरतात तिथे हे दूध ठेवा. माश्या त्याकडे आकर्षित होतील व यावर बसतील व लवकरच ते त्याला चिकतील.

10) व्हीनस फ्लायट्रॅप 


ही एक मांसाहारी वनस्पती आहे जी कीटक खातात. व्हीनस फ्लायट्रॅप प्लांट घराच्या बाहेर किंवा आत 1-2 कोपऱ्यांवर ठेवा. या वनस्पतींचे तोंड उघडेच राहते आणि माशी येऊन त्यांच्यावर बसते तेव्हा ते त्यांना पकडुन ठेवते.

माश्यापासून कोणता धोका असतो

जर माश्या घरात असतील तर ते आपल्या आरोग्यासाठी एक गंभीर धोका आहे. या माश्या  तुमच्या कल्पनेपेक्षा तुमचे जास्त नुकसान करू शकतात. विशेष म्हणजे, सामान्य घरमाशी आमांश, विषमज्वर, कॉलरा आणि आंत्रदाह यांसारख्या 60 हून अधिक विविध रोगांचा प्रसार करण्यास सक्षम आहे.

माशांपासून सुटका करण्याचे इतर मार्ग:-

  • माशी घालवन्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि तुम्हाला माहीतच असेल. तुम्हाला फक्त तुमच्या खोलीचा पंखा चालू करायचा आहे आणि सर्व माशा हवेतून उडून जातील.
  • हिरवे सफरचंद साबनाच्या पाण्यात मिसळून बरणीत ठेवा, त्याच्या सुगंधामुळे माश्या त्याच्या जवळ येतील आणि त्याचा सुगंध आल्यावर मरतील.
  • ओव्याचे पावडर वापरून किंवा त्याचे तेल घरात फवारल्याने माश्या पळून जातात.
  • घराभोवती झेंडूची फुलझाडे लावा यापासून माशा दूर राहतात.
  • घरातील वस्तू विशेषत: खाद्यपदार्थ, गोड पदार्थ उघडे ठेवू नका, याचयकडे माशा जास्त आकर्षित होतात आणि घरात येतात.
  • घरातील खिडक्या शक्यतो पडद्याने झाकून ठेवा, तसेच घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या, घरात घाण ठेवल्यास माश्या घाणीकडे आकर्षित होतात, त्यामुळे घर स्वच्छ ठेवा जेणेकरून माश्या घरात येणार नाहीत.
तर हे होते काही घरातील माशा जाण्यासाठी घरगुती उपाय, ज्याचा उपयोग करून तुम्ही घरात येणाऱ्या माशा घालवू शकता. 

मला आशा आहे तुम्हला तुमच्या प्रश्नाचे घरातील माशा जाण्यासाठी काय करावे? याचे उत्तर मिळाले असेल. माहिती आवडली असेल तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा, तसेच आपल्या मित्रांना share करायला विसरू नका.
धन्यवाद


(Image credit :- Freepic.com)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site