Ad code

Latest

6/recent/ticker-posts

ऑनलाईन फोटो विकून पैसे कसे कमवायचे - make money from online photo selling

फोटो विकून पैसे कसे कमवायचे :- Sell photos and make money online


जर तुम्हाला पण मोबाईलवरून फोटो काढण्याची आवड असेल किंवा तुम्ही फोटोग्राफर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही mobile मध्ये काढलेले फोटो विकून पैसे कमवू शकता. पण कसे, त्याच्याबद्दलच आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला best photo selling  website and apps याबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही mobile व dslr मधून काढलेले फोटो विकून कमाई करू शकता.


होय हे खरे आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सहज फोटो विकून त्यांबदल्यात प्रत्येक फोटो मागे 100 डॉलर्स पर्यंत कमाई करू शकता.


फोटो विकून पैसे कसे कमवायचे – online photo kaise beche in marathi

आपण कुठे फिरायला गेल्यावर सोबत असलेल्या मोबाईल मधून आपल्याला फोटो काढण्याची सवय असते ते ठिकाण असुदेत किंवा कोणती वस्तू व अन्नपदार्थ आपण फोटो काढतच असतो जर फोटो चांगले आले तर ते आपण social media वर share करतो तेच फोटो तुम्ही या काही website वर व अँप्स वर share करून पैसे कमवू शकता. फोटो काढण्यासाठी तुमच्याकडे प्रोफाफेशनल कॅमेरा किंवा महागडा फोन असणे आवश्यक नाही.

सध्या सर्व स्मार्टफोन्समध्ये उत्तम कॅमेरा दिला जात आहे तुम्ही तुमच्या mobile phone चा वापर करून उत्तम फोटो काढून विकू शकता. फोटो ऑनलाइन कसे विकायचे, या बद्दल जाणून घेऊया;
ऑनलाईन फोटो विकण्यासाठी खूप अश्या websites व apps उपलब्ध आहेत. या वेबसाईट्स वर खाते तयार करून, तुम्ही तुमचे फोटो या मध्ये सबमिट करून, त्यांना विकून पैसे कमवू शकता.

हे कसे काम करते:

जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ते आपला फोटो कसे विकले जातात, जगभरात अनेक लोक ऑनलाइन काम व व्यवसाय करत असतात, त्यांना त्यांच्या website वर किंवा इतर कामासाठी फोटो लागत असतात. लाखो लोक या वेबसाइट्सवर दररोज त्यांच्या वेगवेगळ्या कामासाठी फोटो शोधण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी येतात. स्टॉक फोटोंसह वेबसाइटवरून ऑनलाइन फोटो खरेदी करण्यासाठी त्यांचा वापर करून, ते काही कामासाठी नवीन फोटो काढण्याचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचवतात.

म्हणूनच या प्रकारची स्टॉक फोटो विकणारी वेबसाइट लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या लाखो प्रेक्षकांचा फायदा घेऊन, तुम्ही या वेबसाइट्सवरील तुमचे फोटो जगभरातील लोकांना विकू शकता. फोटो विकला गेल्यावर त्या किमतीतला काही भाग या vebsites कमिशन म्हणून स्वतःकडे ठेवतात व बाकी रक्कम आपल्या खात्यात पाठवून देतात.

best photo selling websites-

खाली काही निवडक photo selling websites दिल्या आहेत जिथे तुम्ही अकाऊंट उघडून वेगवेगळे फोटो सेल करू शकता.


1. Adobe Stock 

 तुम्ही एक प्रोफेशनल Photographer असाल तर तुम्हाला Adobe हे नाव नक्कीच माहीत असेल. ऑनलाइन फोटो विकण्यासाठी Adobe Stock ही उत्तम वेबसाइट मानली जाते.

Adobe Stock वर तुम्ही तुमचे फोटो विकून पैसे कमवू शकता. जगभरातील लाखो लोक दररोज प्रीमियम स्टॉक फोटो ऑनलाइन खरेदी करण्यासाठी या वेबसाइटला भेट देतात. येथे तुम्ही तुमचे फोटो तसेच व्हिडिओ विकून पैसे कमवू शकता. या वेबसाइटवर मोफत Adobe Stock Contributor ID तयार करून तुमचे फोटोची विक्री करू शकता.


2) Alamy:

ही पण एक Adobe stock सारखी स्टॉक फोटोग्राफी वेबसाइट आहे. या वर देखील तुम्ही तुमचे फोटो share करून पैसे कमवू शकता. या साइटवर दररोज हजारो फोटो अपलोड केले जातात. येथे तुम्हाला तुमचे अकाउंट तयार करून तुम्ही काढलेले फोटो अपलोड करावे लागतील.

तुम्ही अपलोड केलेला फोटो कोणाला आवडला असेल, व तो फोटो कोणी डाउनलोड करत असतील, तर त्या बदल्यात तुम्हाला त्याची किंमत मिळेल. तुम्ही जितके जास्त व unique फोटो येथे अपलोड कराल तितके पैसे तुम्ही कमवू शकता.


3). Shetter Stock : 


Online photo Selling साठी ही पण एक best website आहे. या वेबसाइटवर तुम्ही काढलेले फोटो व विडिओ सहज विकू शकता, तुमचा फोटो कितीवेळा डाउनलोड केला गेला व तुमची रोजची कमाई किती झाली हे येथे earning आणि activity फीचरद्वारे सहज तपासू शकता. या website च खास वैशिष्ट्य म्हणजे तुमचा फोटो किती वेळा डाउनलोड झाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते.

4). Crestock - 


इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स आहेत जिथे तुम्ही photo upload karun paise kamavu शकता, परंतु crestock.com ही वेबसाइट त्या सर्वांपेक्षा चांगली आहे आणि ही वापरायला पण खूप सोपी आहे, येथे फोटो सेल करण्यासाठी प्रथम तुम्हाला या वेबसाइटवर तुमचे खाते तयार करावे लागेल. तुम्ही तुमच्या gmail वापरून तुमचे खाते तयार करू शकता. खाते तयार केल्यानंतर या वेबसाइटच्या डॅशबोर्डवर जाऊन अपलोड फोटोंवर क्लिक करून फोटो अपलोड करावे लागतील, येथे तुम्ही स्वतः काढलेले फोटो अपलोड करावे लागतील येथे तुम्ही आठवड्याला फक्त 10 फोटो अपलोड करू शकता.

जर एखाद्या खरेदीदाराला तुमचे फोटो आवडले असतील तर तो तुमचा फोटो विकत घेऊ शकतो.तुम्हाला एका फोटो च्या बदल्यात 1 ते 120 डॉलर्स पर्यंत कमवू शकता.

5). iStock वर फोटो विकून पैसे कमवा 

iStock ही एक लोकप्रिय फोटो विकणारी वेबसाइट आहे, जिथे तुम्ही ऑनलाइन फोटो विकून पैसे कमवू शकता आणि इथे तुम्ही निशुल्क नोंदणी करू शकता. येथे नोंदणी करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतर तुम्ही तुमचे फोटो iStock Photos च्या वेबसाइटवर share करू शकता.


तुमचे फोटो विकले गेल्यावर तुम्हाला येथे त्या किंमतीची काही टक्केवारी मिळेल, जी तुम्ही PayPal च्या मदतीने थेट तुमच्या बँक खात्यात पाठवू शकता.


6). Images Bazaar मध्ये फोटो विकून पैसे कसे कमवायचे?


इमेजेस बझार ही एक भारतीय फोटो सेल्लिंग वेबसाईट आहे आणि एक अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले फोटो सहज विकू शकतो.
Images Bazaar ही भारतीय छायाचित्रकारांसाठी अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म आहे.

जर तुम्हाला आपले फोटो भारतातच विकायचे असतील तर ही website तुमच्यासाठी उत्तम ठरेल यावरती भारतीय ग्राहक सर्वाधिक आढळतात. तुम्ही contributer account तयार करून तुम्ही तुमचे फोटो अपलोड करू शकता, व त्यांना विकून भरपूर पाऊस कमवू शकता.


7). Getty Images वर फोटो विकून पैसे कसे कमवायचे!


GettyImage.in वेबसाइटवर तुम्हाला उच्च दर्जाचे फोटो पाहायला मिळतील! इतर websites प्रमाणे gettyimage वरती तुम्ही खाते तयार करून आपले फोटो येथे share करू शकता.


येथे तुम्ही  उत्तम दर्जाचे फोटो अपलोड करा! ही website  कोणतेही फोटो विकण्यापूर्वी अपलोड केलेल्या फोटोंची तपासणी करते! की हे फोटो इतर कुठे उपलब्ध आहेत का याची पडताळणी करून ती लोकांपर्यंत share करते.


येथे दर 20 टक्के पासून कमिशन सुरू होते ! Getty Images वर तुम्ही फोटो विकू शकता तसेच फोटो डाउनलोड ही करू शकता.


8). Instagram वर फोटो विकून पैसे कमवा


जर तुम्हाला वर दिलेल्या कोणत्याही वेबसाइटवर फोटो विकायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट इन्स्टाग्रामवरून फोटो विकून पैसेही कमवू शकता. फोटो सेलिंग वेबसाइटवर, तुम्हाला तुम्ही अपलोड केलेल्या फोटो ऐवजी पैसे मिळतात ते सर्व पैसे तुम्हाला दिले जात नाहीत, त्याचा काही भाग या website स्वतःकडे ठेवतात व काही भाग तुम्हाला दिला जातो. पण इंस्टाग्राममुळे तुम्हाला तुमच्या फोटोंसाठी मिळणारे सर्व पैसे मिळू शकतात.

Instagram वर फोटो विकण्यासाठी, तुम्हाला एक पेज तयार करावे लागेल आणि उच्च दर्जाचे photos येथे नियमितपणे अपलोड कराव्या लागतील. जस जसे लोकांना तुम्ही काढलेले फोटो आवडतील तसे ते photos लोक विकत घेऊ लागतील. लोकांना हवे असलेले फोटो तुम्ही काढून त्यांना विकू शकता व पैसे कमवू शकता.

तर आता पासूनच आपल्या फोटोग्राफी च्या आवडीला आपल्या कमाईचे साधन बनवा. फोटोग्राफी साठी DSLR कॅमेराच पाहिजे असं काही नाही, तुम्ही तुमच्या मोबाईल मधून पण उत्तम फोटो काढू शकता. जर तुमच्या मोबाइल मध्ये जुने फोटो असतील तर ते तुम्ही इथे अपलोड करू शकता.

 तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही पोस्ट online Photo vikun paise kase kamvayche किंवा how to sell photos online in marathi  ही पोस्ट आवडली असेल, तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site