Ad code

Latest

6/recent/ticker-posts

राग का येतो? रागावर नियंत्रण कसे करावे - How to control Anger

राग कंट्रोल कसा करायचा how to control anger in marathi.


राग सर्वांनाच येतो. रागात असताना आपले स्वतःवर नियंत्रण राहत नाही. काहींना तर अगदी लगेच राग येतो तर काहींना उशिरा येतो. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमके काय करावे ते समजत नाही. तर रागावर नियंत्रण ठेवण्याचे हे काही सोपे मार्ग या पोस्ट मध्ये सांगितले आहेत ते शेवट पर्यंत नक्की वाचा.

Source

राग येणे हा मानवाच्या स्वभावातच असतो ही एक नैसर्गिक व सामान्य मानवी भावना आहे. राग हा प्रत्येकालाच येतो पण तो व्यक्त करणे कुठे व्यक्त करणे किंवा राग आल्यावर शांत कसे राहणे हे प्रत्येकालाच नाही जमत. तुम्हाला राग आला तर आलेला राग कसा सांभाळणे ही देखील एक कला आहे. ही कला शिकून कोणत्याही नात्यातील संबंध टिकवता येतात आणि परिपक्वता वाढवता येते.


या लेखात आपण आपल्या रागावर कसे नियंत्रण ठेवता येईल हे पाहणार आहोत. ज्याचा उपयोग करून तुम्ही जेव्हा कधी रागाला बळी पडत असाल तेव्हा त्याचा वापर करून तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकता, पण त्या आधी आपण हे पाहुयात की आपल्याला राग का येतो.


जास्त राग का येतो?

राग येणे हा मानवी स्वभावात जन्मापासूनच असतो, त्यामुळे तो अधूनमधून येणे स्वाभाविकच आहे, परंतु जर तुम्हाला खूप राग येत असेल तर त्यामुळे आपल्या शरीराचे आणि मानसिकतेचे नुकसान होऊ शकते. हा राग तुमच्या जवळच्या माणसाचे आणि तुमचे नाते तुटण्याचे कारण बनू शकते त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा.

रागाचा स्वभाव अनुवांशिक असू शकतो, अनुवांशिक म्हणजे जर तुमच्या पालकांना किंवा आजी आजोबांना किंवा कुटुंबातील सदस्य जास्त रागवत असतील तर तुम्हालाही जास्त राग येऊ शकतो.

कधी कधी जन्मजात शारीरिक किंवा मानसिक बनावटीमुळे राग येऊ शकतो. या कारणास्तव काही मुले जन्मापासूनच जास्त चिडखोर, भावनिक आणि रागावलेली असतात.

आजकाल लोकांना अधिक राग येतो व सारखी चिडचिड करत असतात याचे कारण आजकाल लोकांचा संयम सुटला आहे, आता लोक जास्त विचार करत नाहीत ते कोणत्याही घटनेवर पटकन प्रतिक्रिया देतात.

आपण रागाच्या भरात कोणालाही काहीही बोलतो, मनात येईल ते बोलत जातो. पण तेच बोलणे समोरच्या व्यक्तीच्या मनाला लागते, व आपले नाते मैत्री तुटते. काही वेळाने आपला राग शांत झाल्यावर त्याचा पश्चाताप होतो, पण त्याचा नंतर काहीच उपयोग होणार नसतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला रागावर नियंत्रण कसे ठेवायचे ते सांगणार आहोत


राग शांत कसा करायचा
जर तुम्हाला पण खूप राग येत असेल आणि त्याला कसे शांत करायचे हे समजत नसेल तर जास्त विचार करत बसू नका. असे खूप काही उपाय आणि टिप्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या रागाला नियंत्रणात ठेवू शकता

1) शांत रहा आणि दीर्घ श्वास घ्या

जेव्हा कधी तुम्हाला खूप राग येईल व राग नियंत्रनाच्या बाहेर जात असेल तर या परिस्थितीत तुम्हाला शांत व गप्प राहायचंय आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. असे केल्याने रागावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल, व राग शांत होण्यास मदत होईल.

2) ध्यान ( meditation ) करा


ध्यान मेडिटेशन केल्यामुळे रागावरच नाही तर इतर गोष्टींवर ही तुम्ही नियंत्रण ठेवू शकता. रोज सकाळी मेडिटेशन केल्यामुळे मानुस नेहमी सकारात्मक राहतो. जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर त्या रागापासून मुक्त होण्यासाठी रोज सकाळी मेडिटेशन करणे का हा एक चांगला मार्ग तुमच्यां साठी ठरू शकतो. जर तुम्ही रोज सकाळी उठून ध्यान किंवा योगासने केल्याने तुमच्या वाईट सवयी सोडवण्यास खूप मदत होईल.

3) बोलण्याआधी विचार कर

बहुतेक लोक रागाच्या भरात काहीही बोलतात, त्यामुळे त्यांना नंतर पश्चाताप होतो. जर तुम्हाला राग आला, आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीशी बोलण्यास सुरुवात केली, तर बोलण्यापूर्वी विचार करा की तुम्ही काही चुकीचे बोलणार नाही आहात ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल. तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही बोलू शकता. जर तुम्ही शांतपणे बोललात तर समोरच्या व्यक्तीशी तुमचे नाते बिघडणार नाही.

4) नेहमी चांगला विचार करा

आपल्या जीवनात नेहमी सकारात्मक बोलणे विचार करणे आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. सकारात्मक विचाराने आपण नेहमी पोसिटीव्ह राहतो, नेहमी चांगले विचार आपल्या मनात येत राहतात. आपण पोसिटीव्ह फील करतो त्यामुळे निगेटिव्ह विचार आपल्या मनात येत नाही, व त्यामुळे आपल्याला रागही कमी येतो. जे लोक दिवसभर नकारात्मक विचार करत राहतात त्यांना राग लवकर येतो ते नेहमी चिडचिड करत राहतात.

5) वाईट सवयी सोडून द्या

जर तुम्ही नशा करत असाल म्हणजे दारू, सिगारेट, तंबाखू किंवा ड्रग्ज इत्यादीचा नशा करत तरीही नशेमुळे तुम्हाला जास्त राग येऊ शकतो करण या गोष्ट राग वाढवण्याचे काम करतात. त्या सोबतच नशा केल्यामुळेआपल्या शरीरावरही वाईट परिणाम होतात.

नशेत असताना जर आपल्याला कोणती गोष्ट आवडली नाही तर लगेच राग येतो, नशेत असणाऱ्या व्यक्तीला कुठलेच भान राहत नाही. नशेमध्ये रागाच्या भरात तो काहीही बोलतो व काहीही करत असतो. जर तुम्ही पण नशा करत असाल तर तर ते बंद करा, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास सोपे होईल.

6) व्यायाम करा


मित्रांनो, व्यायामाशिवाय आपण निरोगी आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे हे आपण सर्वच जाणतो, परंतु व्यायामामुळे आपल्या शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात हे फार कमी लोकांना माहिती आहे.

व्यायामामुळे आपला मूड सुधारतो. व्यायाम हा आपल्या शारिरीक आरोग्यासाठी तर चांगला असतोच पण तो आपल्या मानसिक आरोग्यासाठीही चांगला असतो.

7) संख्या मोजा

काही लोक रागाला शांत करण्यासाठी 1 ते 10 पर्यंत किंवा त्याहून जास्त पर्यंत आकडे मोजतात, असे केल्याने आकडे मोजेपर्यंत त्यांचे लक्ष रागाकडून आकडे मोजण्याकडे जते व त्यांचा राग शांत होतो. तुम्ही पण जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा हा प्रयोग करून पाहू शकता.

वरती दिलेल्या मार्गाने तुम्ही तुमच्या रागाला आवरू शकता, व सुखी जीवन जगू शकता. जर तुमच्याकडे अजून काही HOW TO CONTROL ANGER IMMEDIATELY IN Marathi या साठी काही उपाय असतील ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा राग कंट्रोल करत असाल तर आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.

निष्कर्ष:

मित्रांनो राग येणे माणसाच्या स्वभावात जरी असला तरी त्यावर नियंत्रण कसे ठेवावे हे आपल्या हातात आहे. Ragavar niyantran kase thevave याचे उपाय आम्ही येथे दिलेले आहेत. ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचा राग कंट्रोल करू शकता, तुम्हाला जास्त राग येण्याने तुमचेच नुकसान होईल, तुम्ही सतत अस्वस्थ होऊ लागाल, त्यामुळे आजपासूनच रागावर नियंत्रण ठेवायला शिका.

जर तुम्हाला आमची "Rag control kase karave" ची ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मला खात्री आहे की या टिप्स तुमच्या उपयोगी येतील.

तुम्हाला आमचा लेख कसा वाटला? मानसिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येबाबत तुम्ही तुमचे मत, सल्ला आणि सूचना आमच्याशी कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site