Ad code

Latest

6/recent/ticker-posts

निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी काही टिप्स Health tips in marathi

या 20 टिप्सचा उपयोग करून दिवसभर active रहा


दररोज ताजे तवाने व ऍक्टिव्ह राहायचे असेल व अतिरिक्त वजन कमी करायचे असेल आणि निरोगी राहायचे असेल, तर नेहमीच या 20 गोष्टी लक्षात ठेवा. खरं तर, आपण आहाराशी संबंधित अनेक छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि अशा अनेक गोष्टी खातो ज्याचा आपल्या शरीराला फायदा न होता नुकसान होते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्याचा रोजच्या जीवनात उपयोग करून तुम्ही दिवसभर ताजे टवटवीत राहाल. 
चला, आम्ही तुम्हाला काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, ज्यांची काळजी घेतल्यास, कोणत्याही वयात तुम्ही चांगले आरोग्य राखू शकता. तर चला माहीत करून घेऊयात या काही खास व सोप्या टिप्स बद्दल.

1. दररोज भरपूर पाणी प्या आणि कमी कॅलरी असलेले अन्न  किंवा कॅलरी मुक्त पदार्थ खा.

2. सकाळी लवकर नाश्ता करा. सकाळी नाश्ता न केल्याने व उपाशी राहल्याने अनेक आजार होऊ शकतात.

3. रात्रीचे जेवण घेताना थोडे निवडक व्हा. झोपायच्या आधी दोन तास आगोदर जेवण करा.

4. दिवसभर काहीतरी खात राहा, जेवणामध्ये जास्त अंतर ठेवू नका. दिवसातून चार वेळा जेवण केलेले कधीही उत्तम.

5. अन्नामध्ये प्रोटीन युक्त पदार्थ असण्याचा प्रयत्न करा.

6. जेवणात मसालेदार गोष्टी कमी करा. कमी तिखट असलेले पदार्थाचे सेवन करा.

7. जेवताना लाल, हिरव्या केशरी रंगाच्या गोष्टी घ्या. या रंगांचे खाद्यपदार्थ जसे की गाजर, संत्री आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. फास्ट फूड खान्यापासून थोडे लांबच रहा.

8. वजन कमी करायचे असेल तर जेवणात मीठाचे प्रमाण कमी करा. जास्त खारट व तेलकट पदार्थ खाणे टाळा.

9. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही दररोज जेवण करण्यापूर्वी सलाड खा किंवा कमी कॅलरी असलेले भाज्यांचे सूप घ्या, त्यामुळे 20 टक्के कॅलरीज कमी सेवन केली जाईल आणि तुमचे पोट भरेलल राहील.

10. कॅलरी वगळता, फक्त पोषक तत्व असणारा आहार घ्यावा.

11. तुम्ही घेतलेल्या रोजच्या जेवणाची नोंद ठेवा, जसे की तुम्ही किती अन्न खाल्ले आणि किती पाणी प्यायलात.

12. आरामात अन्न खा. संशोधनानुसार जे लोक लवकर लवकर अन्न खातात त्या लोकांना लठ्ठपणा होण्याची श्यक्यता जास्त असते. त्यामुळे जेवण आरामात खा व चावून चावून खा.

13. रात्रीचे जेवण वेळेवर करा आणि दिवसभर फळे आणि भाज्या खा.

14. दिवसभरात डाएट सोडा सारख्या गोष्टी पिणे टाळा.


15. अन्न तयार करताना चरबीची काळजी घ्या. जेवणात तेल, लोणी, चीड, क्रीम यांचा वापर कमीत कमी करा.

16. रात्रीच्या जेवणाच्या वेळी स्नॅक्स खाणे टाळा.

17. रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट घेऊ नका. खरं तर, कार्बोहायड्रेट सकाळी लवकर खाल्ले तर ते एक प्रकारे आपल्या शरीरासाठी इंधन म्हणून काम करते ते आपल्या शरीरासाठी ऊर्जा देत असते. पण रात्री कार्बोहायड्रेट पदार्थ घेऊ नका हे लक्षात ठेवा.
 
18. रात्रीच्या जेवणानंतर काही इतर गोष्टी खाऊ नका. व रात्री  जेवण कमी करण्याचा प्रयत्न करा. गरजेपेक्षा जास्त खाऊ नका.

19. रात्री पूर्ण झोप घ्या. कमीत कमी 8 तास झोप घेणे गरजेचे आहे.

20). फास्ट फूड आणि पॉकेट फूड हृदयासाठी खूप हानिकारक असते ते खाणे टाळा.

तर या होत्या काही निवडक टिप्स ज्याचा वापर करून तुम्ही दिवसभर active रहाल त्यासोबतच निरोगी जीवन जगाल. 
प्रत्येकाला निरोगी राहायचे असते, पण त्यासाठी रोजच्या जीवनात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही नक्कीच निरोगी राहू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site