Ad code

Latest

6/recent/ticker-posts

चुकूनही Google वर Search करू नका या गोष्टी. Never search these things on Google

Google वर काय search करू नये? 


नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मधील माहिती खूपच उपयोगी ठरणार आहे ज्याच्या मदतीने भविष्यात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. गूगल चा उपयोग खूप लोक करतात. येथे आम्ही तुम्हाला google var kay search karu naye  याची माहिती देणार आहोत, तर ही माहिती शेवट पर्यंत संपूर्ण वाचा.Google हे एक खूप मोठे व सर्वाधिक वापरले जाणारे search engine आहे. Google वर आपण खूप काही शोधत असतो या वर आपल्याला हवी ती माहिती सहज मिळू शकते. पण या वरती search करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे असे न केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. गूगल वर अश्या काही गोष्टी तुम्ही search केलात तर तुम्हाला ते भारी पडू शकते. तर त्या कोणत्या ते येथे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत, ज्याला तुम्ही चुकूनही google वर search करू नका.

स्वतःला कधीही Google वर शोधू नका (तुमचे नाव व माहिती कधीही Google वर search करू नका)

सहजपणे का होईना पण गुगलवर सर्च करताना तुमची ओळख जाणून घेण्यासाठी कधीही स्वतःची माहिती Google वर सर्च करू नका. खरं तर, गुगलकडे तुमच्या Search history चा संपूर्ण डेटाबेस असतो आणि वारंवार search करत असल्याने तो डेटा लीक होण्याचा धोका असतो. हॅकर्स काय सहजपणे हॅक करता येईल याचा शोधात नेहमीच असतात, जर चुकूनही तुमची माहिती त्यांना मिळाली तर त्याचा ते दुरुपयोग करू शकतात ज्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

अत्याचार पीडितेचे नाव व फोटो

जर कोणावर अतिप्रसंग, छेडछाड किंवा अत्याचार झाला असेल तर त्या पीडित व्यक्तीचे नाव फोटो व त्या व्यक्तीची माहिती शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार, जर तुम्ही अशी माहिती तुमच्या सोशल मीडिया वर share केलीत किंवा त्या पीडित व्यक्ती बद्दल खुलासा केला तर तो बेकायदेशीर आहे असे केल्यास तुम्हाला शिक्षा होऊ.


चाइल्ड पॉर्न सर्च करणे आणि पाहणे


भारतातच नव्हे तर इतर देशातही चाईल्ड पॉर्न बनवणे व पाहणे दोन्हीही बेकायदेशीर आहे. असे केल्याने तुम्ही जेल मध्ये पण जाऊ शकता. गुगलवर मुलांशी संबंधित कोणतेही चुकीचे साहित्य किंवा व्हिडिओ सर्च केलात आणि तुमच्या ip adress ने तुमची ओळख झाली तुम्ही अडचणीत येऊ शकता, तुरुंगवास भोगावा लागू शकतो. कारण असे करणे भारतीय दंड संहिता आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात आहे.


तुमचा ई-मेल आयडी google वर search करू नका (never search your e-mail id on google )
अनेक वेळा खूप जण गुगलवर आपला ई-मेल आयडी शोधु लागतात. पण याचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो. जर तुम्हीही अशी चूक केलात तर तुमचे गूगल खाते लीक होऊन हॅकर्स द्वारा होऊ शकते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या स्पॅममध्ये अडकण्याचा धोका होऊ शकतो.


आजारावरील औषधासाठी विचारू नका (औषधासाठी कधीही गुगल करू नका)

जेव्हा घरातील व्यक्ती आजारी असतो किंवा स्वतःसाठी लोक गुगलवर त्या आजारावर औषध किंवा उपचार शोधू लागतात. अशी माहिती गूगल वर search न करणेच योग्य राहील, असे केल्याने त्या व्यक्तीचा किंवा तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो.  कारण Google वर योग्य माहिती मिळेलच याची शाश्वती नसते. अशा परिस्थितीत कोणत्याही आजारावरील औषध साठी व उपचारासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.


बॉम्ब बनवण्याबद्दल Google वर search करू नका


आजकाल दहशतवादी घटना खूप वाढत आहेत, त्यामुळे गुगलनेही या बाबतीत कडक कायदे केले आहेत. जर तुम्ही गमतीमध्ये पण बॉम्ब कसा बनवायचा हे गुगलवर सर्च केलात व अशा गोष्टींचा शोध घेतल्यानंतर अलर्ट मोडमध्ये येणाऱ्या सायबर सेलच्या नजरेतून तुम्ही सुटू शकत नाही. यासाठी तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.

कस्टमर केअर नंबर 
आजकाल डिजिटल पेमेंटमध्ये तेजी आली आहे आणि त्यासोबतच सायबर क्राईम च्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सायबर फसवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे Customer care म्हणून लोकांना सांगणे. हे ठग गुगलवर बँकांचे चुकीचे कस्टमर केअर नंबर टाकतात आणि त्याच्या मदतीने ते लोकांना आपला शिकार बनवतात. जर तुम्हीही असे करत असाल तर वेळेतच सावध रहा, जर तुम्हाला खरच त्याचा नंबर पाहिजे असेल तर, Google वर बँकेचा किंवा इतर पेमेंट सेवेचा कस्टमर केअर नंबर शोधण्याऐवजी, तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन त्यांचा अधिकृत नंबर घ्या.

तर ही होती माहिती google var kay search karu naye  वरील दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आवडली असेल तर आपल्या फेसबुक किंवा व्हाट्सअप्प वर आपल्या मित्रांना नक्की share करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती  What not to search on Google in marathi कळेल.
धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site