Ad code

Latest

6/recent/ticker-posts

दुपारी जेवल्यानंतर झोप आणि आळस का येतो? याची कारणे आणि उपाय - Dupari jevlya nantar zop ka yete

दुपारी जेवल्यानंतर झोप आणि आळस का येतो? याची कारणे आणि उपाय - Dupari jevlya nantar zop ka yete


अनेकदा तुम्हीपण हे अनुभवले असेल की दुपारी जेवल्यानंतर काहीच वेळात सुस्ती येते झोप लागू लागते, पण असे का होते याचा कधी विचार केला आहे का? झोप मानवाच्या विकासासाठी, आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे पण तीच झोप अनियमित असेल तर त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. 


बहुतेक जणांना दुपारी जेवल्यानंतर झोप येते शरीराची वाढ होण्यासाठी ऊर्जा मिळण्यासाठी आपण अन्न खातो, कारण त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपण आपली सर्व महत्त्वाची कामे करू शकतो. पण काही लोक जेवल्यानंतर लगेच झोप लागल्याची तक्रार करतात, असे का होते? ते जाणून घेवूयात.


दुपारी जेवल्यानंतर झोप का येते ? Dupari jevlyanantar zop ka yete ?

दुपारचे अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा झोप येते, याचे कारण पचनाला जड असणारे पदार्थ खाल्यामुळे असू शकते, कारण जेवताना किंवा जेवल्यानंतर आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते आणि रक्तामध्ये असणाऱ्या साखरेची पातळी बदलते. 

स्वादुपिंड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन तयार करते. जेवण जितके जड असेल तितके जास्त इन्सुलिन तयार होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. आपले पोट भरल्यानंतर लगेच शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. यामुळेच अन्न खाल्ल्यानंतर काही जणांना थकवा जाणवतो आणि झोप येऊ लागते.

जेवल्यानंतर आपल्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यामुळे, आपले शरीर झोपेचे हार्मोन तयार करते, जे आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिनमध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे आपल्याला दुपारी जेवल्यानंतर झोप येते.


दुपारी जेवल्यानंतर झोप येण्याचे कारण - Dupari Jevlyanantar zop v aalas yenyache karan


दुपारी जेवल्यानंतर झोप येते याचे एक कारण जर तुम्हाला  मधुमेह, थायरॉईड किंवा अशक्तपणा असेल तर या परिस्थितीत देखील खूप थकल्यासारखे जाणवते आणि झोपेचे कारण असू शकते. अन्नामधून जर आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढले तरीहि आपल्याला झोप येते. कित्येकदा आपल्याला चालू असलेल्या औषधांमुळेही शरीरावर झोप आणि आळस वर्चस्व गाजवतो. औषधे खाल्यामुळे देखील झोप लवकर येऊ लागते.

मासे तसेच पोल्ट्री उत्पादने, अंडी, दूध, चीज इत्यादींमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. याशिवाय भात, पास्ता, ब्रेड, केक, गोड पदार्थ इत्यादींमध्ये कार्बन जास्त असते. म्हणूनच ते खाल्ल्यानंतर दुपारच्या वेळेला झोप येते.

रात्री पुरेशी झोप न लागणे हे देखील कारण आहे. जर तुम्हाला रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तुमची झोप अपुरी झाली, तरीही तुम्हाला दिवसा झोप येऊ शकते. बहुतेक वेळा रात्री झोप अपुरी राहल्याने दुसऱ्यादिवशी दुपारच्या वेळेला झोप येणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची दिनचर्याही बदलावी लागेल. चांगले खाण्यासोबतच तुम्हाला चांगली झोपही घेणे आवश्यक आहे.

याशिवाय शरीराध्ये आढळणारे व झोपेसाठी कारणीभूत एडिनोसिन नामक रसायन आहे. हे रसायन रात्री आणि दुपारी जास्त सक्रिय असते. यामुळे देखील, आपल्याला रात्री किंवा दुपारी जास्त झोप येते.


दुपारी जेवल्यानंतर येणारी झोप घालवण्याचे उपाय - Dupari jevlyanantar zop n yenyache upay


जेवणानंतर झोप किंवा थकवा जाणवत असेल तर आहाराकडे विशेष लक्ष द्या. पचनाला जड असणारे अन्न खाऊ नका. तुम्ही तुमच्या आहारात काय घेता याकडे लक्ष द्या. जास्त झोपेचे कारण तुमचे अन्न देखील असू शकते.

तसेच तुमच्या दैनंदिन व्यवहारात व्यायामाचा समावेश करा रोज व्यायाम केल्याने तुम्हाला थकवा आणि झोपेची समस्या उद्भवणार नाही.

पुरेशी झोप घ्या जेणेकरून तुमच्या शरीराला योग्य विश्रांती मिळेल. दररोज एकाच वेळी उठणे. यामुळे तुमच्या शरीराला त्याच वेळापत्रकाची सवय होईल आणि तुम्हाला अवेळी झोप येणार नाही. रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने देखील दुपारच्या जेवणानंतर झोप येते.

अस्वीकरण: ही माहिती एक सामान्य माहिती आहे. ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला म्हणून घेऊ नका. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site