Ad code

Latest

6/recent/ticker-posts

हे आहेत तांब्याचे कडे व अंगठी घालण्याचे आयोग्यदायी फायदे copper ring benefits

तुम्ही अनेक जणांना पायामध्ये तांब्याचे वाळे किंवा कडे तसेच हातामध्ये तांब्याची अंगठी व कडे घातलेले पाहिले असेल कदाचित तुम्ही पण घातले असणारच, पण त्याच्यापासून आपल्या शरीराला होणारे नक्की फायदे कोणते हे बऱ्याच जणांना माहीत नसते. तर याची माहिती आजच्या या पोस्ट मध्ये पाहू या.


तांब्याची अंगठी किंवा वाळे घातल्यामुळे आपल्या शरीराला खूपच आरोग्यदायी फायदे मिळतात. तांब्याची वस्तू परिधान केल्यामुळे अंगातील उष्णता कमी होते हा फायदा तर सर्वच जणांना माहिती आहे. तांब्याच्या अंगठीमुळे आपल्या शरीरास इतर अनेक आरोग्यदायी फायदे होतात. त्यामुळे आयुर्वेदात पण तांब्याची वस्तू घातल्याने होणाऱ्या फायद्यांबद्दल सांगितले आहे. तांब्याचा वापर खूप वर्षा पासून केला जात आहे.
इंग्रजी मध्ये तांब्याला कॉपर म्हणतात. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने तांबे पाण्यातील विषाणूंना दूर करते ही एक खास गुणवत्ता तांब्यामध्ये आहे, म्हणूनच आयुर्वेदात सांगितले आहे की तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी हे आरोग्यासाठी खुप हितकारक असल्याने, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी पिल्याने वात, पित्त, कफ या समस्या दूर होतात. तांब्यात ठेवलेल्या पाणीला ‘तांब्र जल’ म्हणूनही ओळखले जाते. तांब्याच्या भांड्याप्रमाणेच तांब्याची अंगठी घालण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
चला जाणून घेऊया तांब्याचे वाळे, कडे व अंगठी घालण्याचे फायदे काय आहेत.

1) तांब्याचे ब्रेसलेट किंवा अंगठी घातल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. तांबे परिधान केल्याने हिवाळ्यात होणारा वात कमी होतो. हे ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये देखील खूप प्रभावी आहे.

2) असे म्हणतात की तांबे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचेही काम करते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊ शकतो.

3) तांब्याची अंगठी रक्त दाबाला नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते. कमी रक्त दाब ने ग्रासलेल्या लोकांसाठी तांबे परिधान करणे भरपूर फायदेशीर ठरते.

4). तांब्याची वस्तू धारण केल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.  तांबे हे त्वचेची काळजी घेते. ते skin care असते.

5). तांब्याची अंगठी किंवा कडा हातात घातल्याने ते तुमच्या रागावर नियंत्रण ठेवते. तणाव असल्यामुळे व्यक्ती प्रत्येक मिनिटा मिनिटाला चिडत असतात. त्यामुळे राग येतो तांबे आपल्याला रक्तदाब सुरळीत ठेवते व तणाव मुक्त राहण्यास मदतगार ठरते याशिवाय हातात कडा धारण केल्याने अनेक आजारांपासून रक्षण होते.

6). पितळ आणि तांब्याच्या मिश्र धातुपासून बनवलेले ब्रेसलेट धारण केल्याने नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण होते.

7). तांब्याची अंगठी घातल्याने रक्तातील अशुद्धता दूर होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते. तांबे शरीरातील इतर टॉक्सिन्स कमी करण्याचे काम करते.

8). तांब्याच्या अंगठीमुळे रक्तदाब नियंत्रित होतो. त्याचबरोबर  शरीरातील सूज देखील कमी करू शकता. असे म्हणतात की तांबे हे शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते.

9). तांब्याची अंगठी पोटासंबंधी सर्व समस्यावर उपयुक्त ठरते. ही पोटदुखी, पचन न होणे, आणि एसिडिटी सारख्या समस्येवर फायदेशीर ठरते.

10). तांब्याची अंगठी घातल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तसेच शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. व शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते

तांब्याच्या अंगठीचे हे सर्व फायदे शुद्ध तांब्यापासून बनविलेल्या अंगठी पासुनच होतात.

तांब्याची अंगठी घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ज्योतिष आणि आयुर्वेदात तांब्याच्या अंगठ्या आणि वस्तू धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. ज्योतिषशास्त्रात तांब्याला सर्वात पवित्र आणि शुद्ध म्हटले जाते. तांब्याला सूर्य आणि मंगळाचा धातू मानला जात असल्याने तो धारण केल्याने सूर्य आणि मंगळ शांत राहतात. यासोबतच उन्हामुळे होणारे आजारही टाळता येतात.

तर हे होते तांब्याची वस्तू परिधान केल्यामुळे होणारे फायदे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा, व आपल्या www.naadmarathi.in या ब्लॉग ला social media network वर share करायला विसरू नका.


धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site