Ad code

Latest

6/recent/ticker-posts

द्राक्ष खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे - benefits of grapes in marathi

द्राक्ष खाण्याचे आरोग्यदायी फायदे benefits of grapes


मित्रानो द्राक्ष कोणाला नाही आवडत, कोल्ह्याला पण द्राक्ष गोड लागली असती जर त्याच्या हाताला लागली असती. द्राक्ष ही हिरवी व काळी असतात. तसेच ती गोड व आंबट दोन्ही रुपात मिळतात, तुम्हाला माहीत नसेल पण द्राक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात calories, fiber आणि vitamin C आणि vitamin E पुष्कळ प्रमाणात असते. द्राक्ष आपणा सर्वांना आवडतात ती दिसायला पण सुंदर असतात, एवढेच आपल्याला माहीत आहे. पण ते आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?, 


द्राक्ष खाल्ल्यामुळे होणारे फायदे खूप कमी लोकांना माहिती आहे. द्राक्षे हे असे फळ आहे जे तुम्ही शाबूत खाऊ शकता. इतर फळांप्रमाणे त्याची साल किंवा आतील बी काढण्याची गरज नसते. आरोग्याचा विचार केला तर द्राक्ष खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते आपण येथे जाणून घेऊयात .

द्राक्षे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे Draksh khanyache fayde 

1). दररोज किंवा आठवड्यातून 3 वेळा जेवल्यानंतर अर्ध्या तासाने द्राक्षाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, द्राक्षाचा रस सेवन केल्याने अपचन व पोट फुगणे या सारख्या आजारांपासून मुक्ती मिळते.


2) मायग्रेनपासून मुक्ती मिळते.
द्राक्ष खाल्ल्याने किंवा द्राक्षांचा रस सेवन केल्याने मायग्रेनपासून मुक्ती मिळते. इतकंच नाही तर द्राक्षांचा पल्प चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा घट्ट होते या सोबतच चेहऱ्यावर तेज येतो.

3). डोळ्यांसाठी फायदेशीर
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ज्या लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्या आहेत ते त्यांच्या आहारात द्राक्षांचा समावेश करू शकतात.

4). उष्णता कमी करते.
पोटाची उष्णता थंड करण्यासाठी सकाळी द्राक्षाचा रसात साखर मिसळून सेवन केल्याने पोटातील उष्णता कमी होते.


5). मधुमेहावर गुणकारी
मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी द्राक्षांचे सेवन करावे. हे शरीरातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम करते. याशिवाय, द्राक्षमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते.

6). अशक्तपणा दूर करते.
अशक्तपणावर द्राक्षांपेक्षा चांगले औषध नाही. उलट्या आणि मळमळ झाल्यास द्राक्षांवर थोडे मीठ आणि काळी मिरी टाकून सेवन करावी.

7). ऍलर्जी काढून टाकते
काही लोकांना त्वचेच्या ऍलर्जीचा सामना करावा लागतो. अश्या लोकांनी द्राक्षाचे सेवन करावे द्राक्षांमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात, जे त्वचेशी संबंधित ऍलर्जी दूर करण्यास मदत करतात.

8). कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त
ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिडसारखे अनेक घटक द्राक्षांमध्ये आढळतात. द्राक्ष मुख्यत्वे क्षयरोग, कर्करोग आणि रक्त-संसर्ग यांसारख्या रोगांवर फायदेशीर आहे. कॅन्सर सारख्या धोकादायक आजारापासून बचाव करण्यासाठी द्राक्षे उपयुक्त आहेत.

9). हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी उपयुक्त
काळ्या द्राक्षाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी मदत होते काळ्या द्राक्षामध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे तत्व असते, जे शरीरातील रक्त गोठू देत नाही.

10). हाडे मजबूत बनवतात.
द्राक्षांमध्ये आढळणारे विविध पोषक तत्व हाडांचे पोषण करतात आणि त्यांना मजबूत व निरोगी बनवतात. तांबे, लोह, मॅंगनीज यासारखे पोषक घटक हाडांच्या निर्मितीसाठी आणि त्यांना मजबूत बनवण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.

11). कोलेस्ट्रॉल कमी करते
द्राक्षांमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करतात.

12). मेंदू स्वस्थ ठेवते
काळ्या द्राक्षाचा रस सेवन केल्याने माणसाचा मेंदू सक्रिय होतो. काळ्या द्राक्षमध्ये आढळणारे रेसवेरेट्रॉल मेंदू स्वस्थ ठेवण्यास मदत करते, तसेच वाढत्या वयासोबत स्मृती कमी होण्याची समस्या कमी करते.

13). सूज कमी करते.
काळ्या द्राक्षमध्ये एंटीऑक्सीडेंट आणि एंटीइंफ्लेमेटरी गुण आढळतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. कारण यामध्ये एंथोसाइनेंस तत्वामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे सूज कमी करण्यास फायदेमंद असतात.

14). वजन कमी करते.
वजन कमी करू इच्छित असण्याऱ्या व्यक्तींसाठी काळ्या द्राक्षाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. काळ्या द्राक्षा मध्ये रेस्वेराट्रोल मुबलक प्रमाणात असते, जे फॅटी ऍसिडचे ऑक्सिडेशन सक्रिय करून शरीरातील चरबी वाढण्यास प्रतिबंध करण्यासाठी रेस्वेराट्रोल फायदेशीर ठरू शकते. तसेच यामध्ये एंटी-ओबेसिटी प्रभाव देखील आढळतो.

15). उत्तम झोपेसाठी.
जर तुम्हाला झोप लागत नसेल तर द्राक्ष खाणे तुमच्या समस्येवर उपाय होऊ शकतो. द्राक्षमध्ये मेलाटॉनिन आढळते जे झोप वाढवण्याचे काम करते.

द्राक्षे विकत घेताना नेहमी लक्षात ठेवा की द्राक्षे ताजी व हिरवी असावीत. नरम झालेली व वास येणारी द्राक्ष घेऊ नका, विकत घेतल्यावर त्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन खावित. द्राक्षे धुतल्यानंतर खाणे खूप महत्वाचे आहे, कारण आजकाल फळे आणि भाज्या लवकर पिकवण्यासाठी त्यावर औषध फवारणी केली जाते, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. म्हणूनच कोणतीही फळे घेतल्यावर त्यांना घरी आणून धुऊन खाणे चांगले.

अस्वीकरण टीप: हा लेख विविध वैद्यकीय वेबसाइटवरून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तयार केला गेला आहे. तुमची जागरूकता आणि ज्ञान वाढवण्यासाठी लेखात समाविष्ट केलेली माहिती आणि तथ्ये सामायिक केली गेली आहेत. Naadmarathi.in लेखात दिलेल्या माहिती आणि माहितीसाठी दावा करत नाही किंवा कोणतीही जबाबदारी घेत नाही. संबंधित विषयावर अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


(Image credit :- freepic.com)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site