Ad code

Latest

6/recent/ticker-posts

गाडीच्या चावी सोबत एक अल्युमिनियम ची एक छोटी सी चीप का येते? aluminium chip with vehicle key

गाडी घेतल्यावर चावी सोबत एक अल्युमिनियम ची एक छोटी सी चीप येते ती काय असते?बहुतेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की गाडीच्या चावी सोबत एक छोटीशी चिप येते पट्टी म्हणा हवतर ते नेमकं काय असत हा प्रश्न तुमच्या पण मनात आलाच असेल. की ही पट्टी कशाची असते याच नेमकं काय काम असत. तर आजच्या या पोस्ट मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की Gadichya chavi sobat yenari aluminium chi chip ka yete v kashasathi dileli asate. तर ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.
गाडीच्या चावी सोबत जो अल्युमिनिअम चा टॅग दिलेला असतो व त्यावर जो क्रमांक असतो, हा त्या गाडीच्या किल्लीचा अनुक्रमांक असतो, चावी बनवताना जे गाळे बनवतात त्यातील असलेल्या फरकांमुळेच एक चावी दुसर्‍या कुलुपाला लागत नाही. जर तुमच्या गाडीची चावी हरवली तर  duplicate चावी बनवणाऱ्या कडून बनावट चावी बनवून घेण्या ऐवजी तुम्ही त्या चिप वरील code चा वापर करून गाडीची ओरिजिनल चावी घेऊ शकता, तुम्ही हा ऍल्युमिनियम टॅग जवळच्या authorised dealer सर्व्हिस सेंटर ला दिल्यास ते आपल्याला त्या गाडीची ओरिजिनल चावी बनवून देतात.

कारच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक चावी असल्याने या टॅग चा  उपयोग जास्त होतो. आणि हा दुचाकी, चारचाकी, बस ट्रक सगळ्या नव्या गाड्यांच्या चाव्यांना हा टॅग लावलेला असतो.


गाड्यांसाठी कुलुप आणी किल्ल्यांची संख्या प्रचंड असते परंतु प्रत्येक सेट गाडीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळा असावा लागतो , यासाठी काॅम्प्युटर प्रोग्राम असतात , आणी त्याला ओळखण्यासाठी अनुक्रमांक दिलेला असतो

जर तुमच्या गाडीची किल्ली हरवली , तुटली तर या क्रमांकावरुन नवीन किल्ली बनवता येते म्हणुन ही चीप जपुन ठेवणे चांगले

यातला क्रमांक कितीही आकडी असु शकतो , उदाहरणार्थ पाच आकडी क्रमांकाचे साधारण 80000 combinations बनवतात , त्यानंतर हा क्रमांक परत येवु शकतोग्राहकाच्या सोयीसाठी एका गाडीतील सर्व प्रकारच्या कुलपांसाठी एकच समान किल्ली ( Common Key ) दिली जाते , दुचाकी वहानात हा विषय मोठा नसतो परंतु त्यापुढच्या वहानात सात आठ लाॅक आणी एकच समान किल्ली दिली जाते

जसे स्टेअरिंग , इग्निशियन , बॅटरी , डिकी , स्टेपनी इत्यादी , या सगळ्या लाॅकसाठी एकच चावी असते

आत्ताच्या काळात वहानाच्या सुरक्षिततेसाठी याच्या किल्लीबरोबर चिप न देता बारकोड दिला जातो

कंपनीत गाडी जेंव्हा Offline होते तेंव्हा हा बारकोड स्कॅन करुन सिस्टिममधे सेव्ह केला जातो , तो बिलावर पण लिहीला जातो

किल्ली हरवली तरी या क्रमांकावरुन परत त्याच गाडीची किल्ली सहजपणे बनवुन मिळु शकते , अनुक्रमांक माहित नसेल - स्टिकर / चिप हरवली तरी चॅसि च्या नंबरवरुन त्या गाडीला कुठल्या अनुक्रमांकाची चावी लागेल हे पण सहज समजु शकते

गाडीच्या इन्शुरन्स क्लेम करताना, चोरी इत्यादी महत्वाच्या प्रसंगी हे रेकाॅर्ड कंपनीकडुन मागवता येते

ही अनुक्रमांक असलेली चिप संभाळुन ठेवणे ग्राहकाच्या हिताचेच असते

तर आशा करतो तुम्हाला समजले असेल की  Chavi Sobat Aluminum tag ka dila jato. जर माहिती आवडली असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच www.naadmarathi.in या ब्लॉग ला शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site