Ad code

Latest

6/recent/ticker-posts

हेडफोन वापरत असाल तर हे नक्की वाचा - side effects of headphones in marathi

सावधान! तुम्हीही हेडफोन वापरत असाल तर होऊ शकतात हे जीवघेणे आजार

आजकाल हेडफोन प्रत्येकजण वापरतो. सर्वत्र हेडफोन 
वापरणे ही सवयच झाली आहे. पण गरजेपेक्षा हेडफोन चा वापर केल्याने तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही हेडफोन वापरण्याची सवय स्वतःपासून दूर केली नाही तर तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकता. अभ्यासात असे दिसून आले आहे की हेडफोनचा वापर प्रमाणापेक्षा अधिक केल्याने ऐकण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. कधीकधी हा आजार इतका वाढतो की लोकांना डॉक्टरांकडे जावे लागते. हे सर्व ऐकून तूमच्या मनात हे नक्कीच येइल की हेडफोन आपल्या आयुष्यासाठी किती मोठा धोका निर्माण करू शकतो. तर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, तुमचा हा हेडफोन तुमच्या आरोग्याचा शत्रू कसा बनत आहे.


 हेडफोनचा अतिरेकी वापर करणाऱ्याना हे 4 गंभीर आजार होऊ शकतात. आजकाल मूवी पाहताना, सॉंग ऐकताना, किंवा ऑटो, बस, किंवा मेट्रो मध्ये प्रवास करताना प्रत्येक व्यक्ती कानात इअरफोन किंवा हेडफोन घालताना आढळून येते, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. इअरफोन लावल्याने तुमच्या कानावर वाईट परिणाम होतोच, पण तुमच्या आरोग्यालाही त्रास सहन करावा लागतो.

 हेडफोनच्या अतिवापरामुळे श्रवणशक्ती कमी होणे, बहिरेपणा, निद्रानाश, डोकेदुखी या प्रमुख समस्या आपल्याला होतात. याशिवाय काही वेळा ते जीवघेणे अपघातांचे कारणही ठरते.

हेडफोन वापरण्याचे तोटे Headphone Ne Honare tote

बहिरेपणा - Earphones Side Effects in marathi
हेडफोनच्या अतिवापरामुळे आपल्याला कमी ऐकू येऊ शकते, आपली ऐकण्याची क्षमता कमी होते. जास्त वेळ इअरफोन लावून मोठया आवाजात गाणी ऐकल्याने कानात बधीरपणा येऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, इयरफोनच्या जास्त वापरामुळे चक्कर येणे, झोप न लागणे, डोकेदुखी आणि कान दुखणे हे आजार होऊ शकतात. आपल्या कानांची ऐकण्याची क्षमता फक्त 90 डेसिबल असते, जी हळूहळू 40-50 डेसिबलपर्यंत कमी होते, त्यामुळे बहिरेपण सुरू होते. त्यामुळे अनेकवेळा मोठ्या हॉर्नच्या आवाजातही लोकांना ऐकू येत नाही आणि अपघाताला बळी पडतात.


हृदयरोग
हेडफोनवर सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने केवळ कानांवरच नाही तर आपल्या हृदयावरही वाईट परिणाम होतो. इतकेच नाही तर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाही वाढत्या वयासोबत वाढतो. म्हणूनच डॉक्टर हेडफोनवर कमी आवाजात संगीत ऐकण्याची शिफारस करतात.


कान संसर्ग
हेडफोनमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक ऐकायला खूप बरं वाटत, परंतु ही मजा तुम्हाला शिक्षा देऊ शकते. तुम्हीही ऑफिसमध्ये किंवा घरात गाणी ऐकण्यासाठी एकमेकांचा इअरफोन्सचा वापर करत असाल तर असे करणे आजच टाळा. असे केल्याने दुसऱ्याच्या कानातील बॅक्टरियामुळे तुमच्या कानात इंफेकशन होईल व तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो. जर तुम्हाला कानाचे संक्रमण टाळायचे असेल तर नेहमी इतर कोणाचे हेडफोन वापरण्यापूर्वी ते स्वच्छ करून वापर, किंवा स्वतःचे हेडफोन वापरा. 

डोकेदुखीचा धोका
दररोज हेडफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने तुमची श्रवण यंत्रणा खराब होऊ शकते तुमच्या कानाचा पडदा खराब होऊ शकतो. याशिवाय, मोठ्या आवाजात सॉंग ऐकल्याने मेंदूचेही खूप नुकसान होते, कारण संगीताच्या तीव्र वायब्रेशन मुळे आपल्याला मानसिक आजार होतात. यासोबतच काही वेळा मेंदूसोबतच दोन गोष्टींकडे लक्ष देण्याची क्षमताही कमी होते. यासोबतच डोकेदुखी, निद्रानाश यांसारखे आजारही होऊ लागतात.


हे टाळण्यासाठी काय करावे?
तुम्हालाही कानाच्या समस्या टाळायच्या असतील तर गरज असेल तेव्हाच इअरफोन वापरा.
स्वस्त इअरफोन्सऐवजी चांगल्या दर्जाचे इअरफोन वापरा.
एअरफोन चा आवाज कमी ठेवा.
 दिवसात ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ इअरफोन वापरू नका.
नेहमी हेडफोन स्वच्छ ठेवा.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site