Ad code

Latest

6/recent/ticker-posts

मध्यरात्री घसा कोरडा पडत असेल तर तुम्हाला हे 5 आजार असण्याची शक्यता आहे.

"जल ही जीवन है" हे तुम्हाला माहीतच असेल, पाणी आपले जीवन संतुलित बनवते पण त्याच पाण्याचे प्रमाण शरीरात असंतुलित झाल्यास तुम्ही संकटात येऊ शकता. तहान लागणे ही शरीराची सामान्य प्रक्रिया आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होताच तहान लागते. ठराविक प्रमाणात पाणी प्यायल्याने तहान भागते, परंतु पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला तहान लागत असेल व घसा कोरडा पडत असेल आणि तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त तहान लागली असेल तर हे आरोग्याशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते.जास्त तहान तेव्हा लागते जेव्हा लोक जास्त प्रमाणात लघवी करतात, अतिसार होतो, उलट्या होणे आणि घाम येणे याद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी गमावतात त्यामुळे जास्त तहान लागते. कधीकधी काही लोकांना खूप तहान लागते किंवा ते वारंवार पाणी पिण्यास सुरवात करतात. खरं तर, खूप तहान लागणे हे आजाराचे ही लक्षण असू शकते.

अनेक डॉक्टरांनी व चिकित्सकानी असे सुचवले आहे की निरोगी व्यक्तीसाठी दररोज सरासरी 2 ते 3 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरासाठी पाण्याची ही गरज काही परिस्थितींमध्ये वाढू किंवा कमी होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला जास्त पाण्याची गरज असते. परंतु काही वेळा विशिष्ट प्रकारच्या आजारांमध्ये लोकांना वारंवार तहान लागते किंवा ते आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिण्यास सुरुवात करतात.

चला जाणून घेऊयात जास्त तहान लागण्याची काय कारणे आहेत व मध्यरात्री घसा कोरडा का पडतो याची कारणे

या 5 कारणामुळे खूप तहान लागते

पॉलीडिप्सिया :- Polydipsia
या परिस्थितीत, आपल्याला असे भासते की आपल्याला खूप तहान लागलेली आहे आणि खूप पाणी पिण्याची गरज आहे. जास्त पाणी प्यायची भावना जाणवली आणि तुम्ही खूप पाणी पिलात म्हणजे तुमची तहान भागेल असे नाही. असे जाणवल्या नंतर ही तुम्हाला तुमचे तोंड कोरडे पडल्यासारखे वाटू शकते.

तोंड कोरडे पडणे
तोंड कोरडे पडल्याने देखील आपल्याला तहान लागते, तोंड कोरडे पडण्याचे कारण जेव्हा तुमची लाळ ग्रंथी तोंडामध्ये पुरेशी लाळ तयार करत नाही आणि तुमचे तोंड व्यवस्थित ओले होत नाही तेव्हा आपले तोंड कोरडे होते. तोंडामध्ये लाळ कमी पडल्यामुळे तुमचे तोंड, घसा आणि जीभ अधिक कोरडी होऊ शकते. या स्थितीत तुमचे ओठ फुटू शकतात आणि तुम्हाला खाल्यानंतर गिळण्यामध्ये त्रास होऊ शकतो. कोरड्या तोंडाने तुमचा घसाही कोरडा होऊ शकतो आणि हे तहानचे लक्षण असू शकते.

हे वाचा :- माठातील पाणी पिण्याचे फायदे

मधुमेह :- डायबिटीज (Diabetes)

जास्त तहान लागण्याचे एक सामान्य कारण म्हणजे तुमच्या रक्तात जास्त साखर असणे. मधुमेह मुळेही तुम्हाला अधिक तहान लागू शकते जेव्हा तुमच्या किडन्याना तुमच्या रक्तातून अतिरिक्त साखर मिळते, तेव्हा ग्लुकोज तुमच्या लघवीवाटे  बाहेर जाण्यास सुरुवात होते, ज्यामुळे तुमच्या टिश्यू मधून द्रव बाहेर पडतो. या कारणामुळे तुम्हाला खूप लघवी करावी लागते, त्यानंतर तुमचे शरीर डिहाइड्रेट होते आणि तुम्हाला खूप तहान लागते.

सिस्टिक फायब्रोसिस
हे केवळ तुमच्या श्वसन प्रणालीवरच नाही तर तुमच्या GI ट्रॅक्टवरही परिणाम करते. हे हाई ब्लड शुगर सारखी लक्षणे देखील दर्शवते, जसे की खूप तहान लागणे. इतर लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता, वजन कमी होणे, वाढ खुंटणे यांचा समावेश होतो.

एनीमिया (Anemia)
जेव्हा तुमच्या शरीरातील लाल रक्त पेशींची कमतरता येते, किंवा तुमचे शरीर पुरेशा लाल रक्तपेशी तयार करू शकत नाही व लाल रक्त पेशी कमी होऊ लागतात तेव्हा तुम्हाला एनीमिया होऊ शकतो. यामुळे ही तुम्हाला खूप तहान लागु शकते, ज्यामुळे तुम्हाला थकवा येणे, नाडी जास्त चालणे किंवा स्नायू मध्ये लचक येणे असे होऊ शकतात.

अस्वीकरण टीप: हा लेख विविध वैद्यकीय वेबसाइटवरून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तयार केला गेला आहे. लेखात समाविष्ट केलेली माहिती आणि तथ्ये तुमची जागरूकता आणि ज्ञान वाढवण्यासाठी सामायिक केली गेली आहेत. संबंधित विषयाबद्दल अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site