Ad code

Latest

6/recent/ticker-posts

मोबाईल गरम होण्यापासून कसा वाचवायचा Mobile Heating Problem In Marathi


फोन गरम होत असेल तर हा उपाय करा How to Fixed Mobile Phone Heating problem in marathi


नमस्कार वाचक परिवार आजच्या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत, की आपला स्मार्ट फोन वारंवार गरम का होतो त्याची कारणे. मोबाईल गरम होण्यापासून कसे वाचवावे याचे काही उपाय येथे पाहणार आहोत.


आताच्या युगातील स्मार्टफोन्समध्ये प्रोसेसिंग पॉवरमध्ये झालेली वाढ आणि फास्ट चार्जिंग व जास्त बॅटरी पॉवर यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांना धोका वाढला आहे. अश्या बदलावांमुळे स्मार्टफोन गरम होणे सामान्य झाले आहे.

तुमचा मोबाईल फोन का गरम होतो? मोबाईलचे तापमान कमी कसे करावे? जेव्हा तुम्ही चार्जिंग करताना, व्हिडिओ गेम खेळताना आणि हेवी अँप्स वापरताना, स्मार्टफोन लवकर व जास्त गरम होतात. तसेच तुम्ही कॅमेरा वापरता किंवा वायफाय वापरता किंवा फक्त अँप वापरत असताना तुमचा फोन गरम होतो, हे सामान्य वापरातही घडते.

फोन गरम होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, बर्‍याच प्रकरणांमध्ये, आपला मोबाईल जास्त गरम होणे ही त्याच्या हार्डवेअरची समस्या आहे. परंतु तुम्ही यासाठी काही उपाय करून तुमचा मोबाइल पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकता. जाणुन घ्या मोबाईल गरम होण्यापासून कसा वाचवायचा.

फोन का गरम होतो? (why mobile phone overheats? in marathi)

मोबाईल कसा गरम होतो? फोन गरम होण्याचे अनेक कारणे असू शकतात, जर फोन ठराविक वेळी गरम झाला तर त्याला गरम म्हटले जाणार नाही. स्मार्टफोन हे एक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ज्यामध्ये वीज ( electricity ) वापरली जाते, त्यामुळे फोन गरम होणे स्वाभाविक आहे.
छोट्या छोट्या कारणांमुळे स्मार्टफोन जास्त गरम होऊ शकतात जसे की.


  • मोबाईल ची brightness खूप जास्त असणे
  • वायफाय ( wifi ) चा जास्त वापर
  • एकाच वेळी जास्त अँप्स वापरल्याने


स्मार्टफोन गरम होण्यामागे ही कारणे पुरेशी नाहीत आणि या कारणांमुळे आताचे नवीन स्मार्टफोन गरम होत नाहीत.


सर्वप्रथम, तुम्ही हे जाणून घ्या की जर तुम्ही सतत 20-30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेम खेळलात तर फोन गरम होऊ लागतो, हे स्वाभाविक आहे. तसेच उन्हाळ्यात आणि बाहेर गरम वातावरणात फोन वापरल्याने मोबाइल गरम झाल्यास  आपण ओव्हरहाटिंग (overheating) म्हणता येणार नाही. याला उष्ण व गरम वातावरणामुळे मोबाईल गरम झाला असे म्हणत येईल.


चला आता जाणून घेऊया मोबाईल गरम होण्याची कारणे कोणती आहेत?


मोबाईल कसा गरम होतो? फोन गरम होण्याची कारणे कोणती? (Mobile Phone Heating Problem In Marathi )


तर मित्रांनो स्मार्टफोन गरम होण्याची ही काही कारणे खाली दिलेली आहेत, ज्यामुळे तुमचा मोबाईल गरम होत आहे.


1. कॅमेराचा अतिवापर केल्याने.

जर तुम्हाला मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा शौक असेल तेही एचडीमध्ये, तर यामुळे देखील तुमचा फोन जास्त गरम होऊ शकतो.

जेव्हा आपण कॅमेरा वापरतो तेव्हा स्मार्टफोनच्या प्रोसेसरला खूप वेगाने काम करावे लागते. जेव्हा तुम्ही तुमच्या फोनवरून high quality  फोटो आणि व्हिडिओ शूट करता तेव्हा कॅमेरा भरपूर प्रोसेसर आणि रॅम वापरतो.

कॅमेरा वापरताना फोन गरम होणे हे तुमच्या फोनच्या ब्राइटनेसवरही अवलंबून असते. कधी कधी काही ठराविक मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी केल्याने देखील तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होऊ शकतो.


2. खराब बॅटरी किंवा चार्जर वापरल्याने मोबाईल गरम होऊ शकतो.


जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल आणि तो अनेक वेळा ओव्हरचार्ज म्हणजे मोबाईल फुल चार्ज झाल्यावर देखील चार्जिंग ला लावून ठेवला असेल तर अशा परिस्थितीत मोबाईल जास्त गरम होऊ शकतो.

चार्जिंग करताना मोबाईल जास्त गरम होत असेल, तर यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर खराब होऊ शकते. जर तुमचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत नसेल आणि फोन जास्त गरम होत असेल तर तुम्हाला मोबाईल चार्जर किंवा चार्जर वायर खराब झाले आहे का हे तपासून बदलणे आवश्यक आहे.


तसेच आपल्या स्मार्टफोन ची बॅटरी खराब झाली आहे का हे देखील तपासून पाहू शकता.


3. जाड आणि हेव्ही मोबाईल कव्हर्सचा वापर केल्याने देखील स्मार्टफोन गरम होऊ शकतो.

जर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये काही फॅन्सी आणि जाड मोबाईल कव्हरचा वापर करत असाल तर फोनची उष्णता थोडीशी वाढलेली दिसते.


आपण गेम खेळत असताना किंवा फोन चार्जिंग ला लावलेला असताना स्मार्टफोन बॅक साईड ने गरम होउ लागतो. अश्या परिस्थितीत जाड व हेव्ही कव्हर मोबाईल ला असल्याने, मोबाईल ची उष्णता बाहेर जाण्यास अडथळा होतो व आपला स्मार्टफोन जास्त गरम होतो.


4. वायफायचा अधिक वापर केल्याने मोबाईल गरम होऊ शकतो.

वायफायचा वापर केल्यामुळे फोन गरम होतो असे नाही, पण  वायफायच्या अतिवापरामुळे अनेक वेळा मोबाईल गरम होतात.

जेव्हा तुम्ही वायफाय वापरता तेव्हा  बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अँप्सची संख्या वाढते आणि बॅकग्राउंडमध्ये जास्त अॅप्स चालत असल्यामुळे स्मार्टफोन गरम होत राहतो.

तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन फोनची बॅकग्राउंड अ‍ॅक्टिव्हिटी बंद करू शकता जेणेकरून वायफाय चालू असताना मोबाईल मधील अॅप बॅकग्राउंडमध्ये डेटा आणि बॅटरी वापरणार नाहीत आणि फोन गरम होणार नाही.

5. व्हायरस किंवा मालवेअर

जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये एखादे मालवेअर अॅप किंवा व्हायरस इन्स्टॉल केले असेल किंवा ते इन्स्टॉल झाले असेल तर अशा परिस्थितीत तुमचा फोन गरम होऊ शकतो कारण मालवेअर ऍप्स बॅकग्राउंडमधील डेटा ऍक्सेस करून इतर अॅप इंस्टॉल करत राहतो. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी जास्त वापरली जाते आणि फोन हँग व जास्त गरम होत राहतो.


मोबाईल फोन ओव्हरहाटिंग कसे थांबवायचे (how to stop phone overheating)


येथे आम्ही तुम्हाला मोबाईल गरम होत असल्यास काय करावे व मोबाईल गरम होण्यापासून कसे वाचवावे याबद्दल सांगणार आहोत, बहुतेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की कमकुवत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमुळे मोबाईल गरम होतात, अशा परिस्थितीत तुम्ही स्मार्टफोनचे हार्डवेअर बदलू शकत नाही परंतु तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. तुम्ही पुढील काही उपाय करू शकता जेणेकरून तुमचा मोबाईल गरम होणार नाही.

1. फोन योग्य प्रकारे चार्ज करा

मोबाईल नेहमी त्याच्या ओरिजनल चार्जरने चार्ज करा आणि मोबाईल फोन चार्ज करताना त्यावर गेम वगैरे खेळत राहू नका.


मोबाईल सफाट पृष्ठभागावर ठेवून चार्ज करावा त्याला कधीही उशी किंवा गादीवर ठेवून चार्ज करू नका, असे केल्याने चार्जिंगच्या वेळी निर्माण होणारी उष्णता मोबाईलमध्येच राहते आणि मोबाईल गरम होण्यास सुरुवात होते तसेच बॅटरी खराब होण्याची भीती वाढते.
आपला मोबाईल फोन कधीही १००% चार्ज करू नका.


2. न वापरलेले अॅप्स बंद करा किंवा डिलिट करा

जेव्हा तुम्ही अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये उघडे ठेवता तेव्हा ते अँप चालूच राहतात व बॅटरी पावर संपवत राहतात. परिणामी मोबाईल गरम होत राहतो,  तुम्ही कोणते अँप वापरत नसाल तर ते अॅप बॅकग्राउंड मधून क्लिअर करा. जे अँप वापरत नाहीत ते तुम्ही बंद करा जेणेकरून मोबाईल ची बॅटरी संपणार नाही व मोबाईल गरम होणार नाही.

3. कडक उन्हामध्ये मोबाईलचे संरक्षण करा

जेव्हा तुम्ही घराबाहेर फोन वापरता तेव्हा उन्हाच्या कडकडाटात फोन गरम होने साहजिकच आहे, शक्य असल्यास मोबाईलमध्ये दिलेले ऑटो ब्राइटनेस फीचर वापरा आणि उन्हाळ्याच्या हंगामात शक्यतो बाहेर उन्हामध्ये मोबाईलचा वापर कमी करा.

4. मोबाईल कव्हर काढा

जर तुमचा मोबाईल गरम होत असेल, तर अशा स्थितीत मोबाईलचे कव्हर काढणे चांगले ठरेल. मोबाईल च्या कव्हर मुळे मोबाईल ची उष्णता वाढते, जेव्हा जेव्हा फोन गरम होइल, तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलचे कव्हर काढु शकता जेणेकरून मोबाईलची उष्णता बाहेर पडू शकेल. व मोबाईल लवकर थंड होण्यास मदत मिळेल.

5. मोबाईल मधील ऍप्स अपडेट ठेवा

आपल्या स्मार्टफोन मधील Applications वेळोवेळी अपडेट करत रहा. असे केल्याने Apps Bugs फ्री राहतो. तसेच फोनचे सॉफ्टवेयर अपडेट केल्याने देखील फोन गरम होण्याची समस्या दूर होऊ शकते.

6. Flight मोड चालू करा

जर तुमचा मोबाईल गरम होत असेल आणि तुम्हाला काय करावे हे समजत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही Flight mode सुरू करू शकता, यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये बॅकग्राऊंड मध्ये चालणारे apps बंद होतील व बॅटरी पावर कमी खर्च होईल व आपला स्मार्टफोन गरम होण्यापासून वाचेल.

7. सतत गेम खेळत राहू नका.

सध्या विडिओ गेम चे खूळ सगळ्यांना लागलं आहे. जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये सतत गेम खेळत राहता, तेव्हा साहजिकच तुमचा मोबाईल गरम होत राहतो, अशा परिस्थितीत तुम्ही मोबाईलमध्ये गेम खेळण्यापासून थोडा ब्रेक घ्या.

जेव्हा तुम्ही काही काळा साठी मोबाइल बंद ठेवता, तेव्हा फोन त्याच्या सामान्य तापमानापर्यंत पोहोचतो, ज्यामुळे मोबाईलची उष्णता कमी होते.

8. मोबाईल रीस्टार्ट करा

जर तुमच्या मोबाईलची उष्णता वाढली असेल  तर तुमच्या फोनला रीस्टार्ट करु शकता, मोबाईल रिस्टार्ट केल्याने फोनमध्ये येणाऱ्या अनेक समस्या दूर होतात आणि शक्य असल्यास काही वेळासाठी आपला मोबाईल फोन बंदच ठेवा. असे केल्याने मोबाईल लगेच थंड होईल.

Conclusion : (निष्कर्ष)

आज या आर्टिकल च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की Mobile garam ka hoto या लेखाद्वारे तुम्हाला समजले असेल की जर तुमचा मोबाइल गरम असेल तर तुम्ही तुमच्या फोनचे तापमान कसे कमी करू शकता. फोन गरम होण्याची अनेक कारणे असू शकतात, आम्ही तुम्हाला वर सांगितलेली काही कारणे जसे की जास्त वेळ गेम खेळणे, फोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करणे, कडक उन्हात मोबाईलचा वापर करणे, चार्जिंग करताना फोन वापरणे अश्या काही चुकांमुळे mobile garam hoto. तसेच येथे mobile garam zala ki kay karave याची देखील पूर्ण माहिती दिलेली आहे. ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन ला थंड करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला येथे दिलेली माहिती आवडली असेल.
धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site