Ad code

Latest

6/recent/ticker-posts

७/१२ उतारा म्हणजे काय? कसे तपासायचे आणि डाउनलोड करायचे


७/१२ उतारा ऑनलाईन कसे पहायचे आणि डाउनलोड करायचे. How to download 7/12 in marathi.

बहुतेक जणांना 7/12 म्हणजे आपल्या जमिनीचा कागद एवढंच माहीत असत. पण प्रत्येकाकडे याची पूर्ण माहिती नसते की, मुळात सात बारा काय असतो कसा वाचला जातो, याची पूर्ण माहिती नसते. तर या लेखात आम्ही तुम्हाला 7/12 काय असतो, ऑनलाईन सात बारा कसा तपासावा व डाउनलोड कसा करावा याची पूर्ण माहिती यामध्ये देणार आहोत, तर हा लेख पूर्ण वाचा व आपल्या जनिमीचा 7/12 कसा बघावा ची पूर्ण माहिती घ्या.


सातबारा उतारा म्हणजे काय? - What is 7/12 in marathi - 7/12 utara in marathi online


7/12 उतारा हे माहितीने भरलेले एक दस्तऐवज आहे, ज्यामध्ये जमिनीचा तपशील जसे की सर्व्हे नंबर, क्षेत्रफळ, तारीख आणि सध्याच्या मालकाचे तपशील म्हणजेच पूर्ण माहिती असते. सातबारा जरी एकत्र बोललं जात असलं तरी त्याची दोन रूपे आहेत. फॉर्म 7 मध्ये जमीन मालकाची माहिती आणि अधिकारांचा पूर्ण उल्लेख असतो. तर फॉर्म 12 मध्ये जमीन आणि तिच्या वापराविषयी सर्व माहिती फॉर्म 12 मध्ये असते. महाराष्ट्रात 7/12 उतारा दस्तऐवजाला स्थानिक भाषेत 'सात-बारा-उतारा' म्हणतात. या दस्तऐवजाची नोंद राज्याच्या महसूल विभागाकडून कर वसुलीच्या उद्देशाने ठेवली जाते. हा उतारा तहसीलदार किंवा संबंधित जमीन प्राधिकरणाकडून जारी केला जातो. 7/12 उतारा तुम्हाला तलाठी कार्यालयात भेटू शकतो. ७/१२ साठी लागणारी अधिकृत फी भरल्यावर किंवा माहिती कायद्यांतर्गत अर्ज दाखल केल्यावर ग्राहकाला ७/१२  दस्तऐवजाची प्रत मिळते.

येथे आपण जाणून घेणार आहोत की bhulekh maharashtra 7/12 utara online कसे तपासायचे? महसूल विभागाने महाराष्ट्र भूमी अभिलेख 7/12 ऑनलाइन काढण्याची उत्तम आणि सोपी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भुलेख महाभूमी च्या अधिकृत वेब पोर्टलवर तुम्ही घरबसल्या तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा डाउनलोड आणि प्रिंट करू शकता. संपूर्ण माहितीसाठी हा लेख पूर्णपणे आणि काळजीपूर्वक वाचा.

आपल्या महाराष्ट्रातील अनेकांना माहिती नसल्यामुळे जमिनीच्या नोंदी काढता येत नाहीत. पण हा लेख वाचल्यानंतर तुम्ही फक्त पाच मिनिटांत Mahabhumi Bhulekh Online 7/12 मिळवू शकाल. भुलेख महाराष्ट्र महाभूमीचे नवीन वेब पोर्टल 7/12 आणि 8A रेकॉर्ड कसे काढायचे याची संपूर्ण माहिती पुढील लेखात सांगितली आहे. संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

महाराष्ट्रातील जमिनीच्या ऑनलाइन नोंदी 7/12 आणि 8A  सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा महाभूलेख सातबारा उतारा घरबसल्या तपासु आणि डाउनलोड करू शकता.


भुलेख महाराष्ट्र ७/१२ उतारा कसे तपासायचे आणि डाउनलोड करायचे 2022


महाभूमी भुलेख ऑनलाइन 7/12 उतारा ऑनलाइन कसा मिळवावा याबद्दल आम्ही खाली स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. ज्याचा उपयोग करून तुम्हाला ७/१२ रेकॉर्ड काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

1. ७/१२ उतारा काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला भुलेख महाभूमीच्या अधिकृत वेब पोर्टलवर जावे लागेल. यासाठी आपल्याला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in हे सर्च करावे लागेल व तुम्ही भुलेख महाभूमीच्या वेब पोर्टलवर जाऊ शकता.

2. विभाग निवडा.

भुलेख महाभूमी वेब पोर्टल उघडताच उजव्या बाजूला विभाग निवडण्याचा पर्याय असेल. सर्व प्रथम तुमचा विभाग निवडा या मध्ये अमरावती, औरंगाबाद कोंकण, नागपूर, नाशिक पुणे असे विभाग पर्याय येथे दिसतील तुमचा यापैकी कोणता विभाग येतो हे निवड करा आणि Go पर्यायावर क्लिक करा.


3. 7/12 रेकॉर्ड निवडा.

विभाग निवडल्यानंतर, येथे स्क्रीनवर 7/12 आणि 8A आणि मालमत्ता पत्रक असे पर्याय दिसेल. त्यात 7/12 निवडून यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावा लागेल.4. सर्वेक्षण क्रमांक / गट क्रमांक निवडा.

यानंतर तुम्हाला 7-12 रेकॉर्ड शोधण्यासाठी वेगवेगळे पर्याय मिळतील. या सर्व पर्यायांद्वारे, आपण सातबारा रेकॉर्ड मिळवू शकता. त्यातील सर्व्हे नंबर/गट नंबरचा पर्याय निवडून किंवा तुमचे नाव लिहून find ( शोधा ) पर्यायावर क्लिक करा.


5. 7/12 view पर्याय निवडा.

आता सर्वप्रथम तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका. त्यानंतर 7/12 Pah पर्यायावर क्लिक करा.


6. कॅप्चा कोड वेरीफाय करा.

कॅप्चा कोड वेरीफाय करण्यासाठी स्क्रीनवर दिलेला कोड दिलेल्या बॉक्समध्ये भरा. त्यानंतर Verify Captcha To View 7/12 पर्याय निवडा.


7. गाव नमुना सात पहा.

तुम्ही कॅप्चा कोड टाकल्या नंतर, 7/12 रेकॉर्ड स्क्रीनवर उघडेल. या तुम्ही 7/12 मध्ये दिलेले तपशील तुम्ही तपासू शकता.


8.  गाव नमुना बारा पहा

गाव नमुना नमुना सात रेकॉर्ड च्या खाली गाव नमुना बारा  देखील उपलब्ध असेल. त्यात दिलेले रेकॉर्डही तुम्ही तपासू शकता. तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदींचे संपूर्ण तपशील मिळतील.


9. भूमी अभिलेख  7/12 डाउनलोड करा.

तुम्ही तुमच्या जमिनीचे 7-12 उतारा रेकॉर्ड डाउनलोड व प्रिंट देखील करू शकता. यासाठी ब्राउझर मेनूमधील प्रिंट पर्याय निवडा. त्यानंतर तुम्ही ते डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.

अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रहिवासी त्यांच्या जमिनीच्या ७-१२ नोंदी ऑनलाईन मिळवू शकतात. सर्व्हे नंबर/ग्रुप नंबर व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या नावावर सात बार रेकॉर्ड देखील मिळवू शकता.या मध्ये आम्ही तुम्हाला online 7 12 kasa pahava याची पूर्ण माहिती दिलेली आहे. ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जमिनीचा ऑनलाईन 7/12 पाहू शकता व डाउनलोड करू शकता. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच आपल्या social media प्लॅटफॉर्म वर शेअर करा.
धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site