Ad code

Latest

6/recent/ticker-posts

उन्हाळ्यात स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी काही टिप्स

उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी काही टिप्स


उन्हाळ्यात केवळ वातावरण उष्ण असते त्याबरोबरच आपल्या शरीराचे तापमानही वाढते. या उन्हाळ्यामध्ये सामान्यतः अस्वस्थता, आळस, पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. पण या पासून वाचण्यासाठी आहारामध्ये छोटे-मोठे बदल करून आणि नियमित व्यायाम केल्यास या समस्या टाळता येऊ शकतात.


उन्हाळा सुरू झाला की अनेक समस्या उद्भवू लागतात. पोटदुखी, अन्नातून विषबाधा, उष्माघात, अशक्तपणा, डिहायड्रेशन अशा समस्या उद्भवतात. अति उष्णतेमुळे आपल्याला भूकही कमी लागते आणि थकवाही जाणवतो. अशा परिस्थितीत स्वतःला तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी उन्हाळ्यात काही गोष्टींची विशेष काळजी घेणे खूपच आवश्यक आहे. तरच उन्हाळ्यात तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकाल. आज आम्‍ही तुम्‍हाला उन्हाळ्यात स्‍वत:ला हेल्दी आणि अ‍ॅक्टिव्ह ठेवण्‍यासाठी व तंदुरुस्त राहण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात.  ( unhalyat swatala healthy thevnyasathi kay karave )

● आहारतज्ज्ञ  सांगतात की, उन्हाळ्यात हलका आहार करणे आरोग्यासाठी खूपच उत्तम असते. उन्हाळ्यामध्ये हंगामी फळांचे सेवन केल्याने पोट भरलेले राहीलच आणि कॅलरीजही कमी होतील.

● उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण जास्त उष्णतेमुळे जास्त घाम येतो आणि शरीरात पाण्याची कमतरता असते. अशा स्थितीत दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुम्हाला जास्त पाणी पिणे शक्य नसेल तर पाणचट फळांशिवाय फळांचा रस, लिंबूपाणी, शरबत, शिकंजी घ्या. अशा आरोग्यदायी गोष्टींचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि तुम्ही स्वतःला सक्रिय अनुभवू शकाल. उन्हाळ्यामध्ये कुठेही बाहेर जाताना स्वतःसोबत एक पाण्याची बाटली ठेवा व खूप प्रमाणात पाणी प्या.

● मांसाहारी पदार्थांव्यतिरिक्त गरम मसाले, लाल मिरच्या आणि तळलेले पदार्थ खाने टाळा. या ऋतूत जवाच्या पिठाचे जास्त सेवन करा. पुदिन्याची चटणी, कैरीचा पन्ना, दही, फळांचा रस, नारळ पाणी, उसाचा रस, ताक आणि सत्तू यांचा नियमित आहारात समावेश करा.

● उन्हाळ्यामध्ये ताजे अन्न खा आणि निरोगी रहा. उन्हाळ्यात शिजवलेले अन्न लवकर खावे, कारण या हंगामात भाज्या (विशेषतः टोमॅटो-बटाट्याच्या रसाळ भाज्या), डाळी लवकर खराब होतात. चांगले पचणारे अन्न खा आणि पचनाला जड असणाऱ्या अन्नापासून दूर रहा.

हे पण वाचा :- उन्हाळ्यात आहार कसा असावा


● उन्हाळ्यात सकाळी उठल्यावर दीड तासाच्या आत काहीतरी खाणे किंवा ग्रीन टी पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात बराच वेळ उपाशीपोटी राहल्याने शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमतरता भासते. कमी वेळात खाल्ल्याने अति खाणे देखील टाळता येते. नेहमी दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिल्याने शरीराला ऊर्जा ही मिळते व चरबी कमी करण्यास मदत होते.

● उन्हाळ्यात चहा-कॉफीचे सेवन कमी करा जमल्यास चहा कॉफी पिणे टाळा. यामध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे शरीरातील निर्जलीकरण वाढते. त्याऐवजी ज्यूस, आइस-टी, दही, लस्सी, ताक, सत्तू, लिंबू-पाणी, आंब्याचा पन्ना, सरबत, नारळ पाणी, उसाचा रस यांचा आहारात समावेश करा.

● बाहेरून आल्यावर लगेच फ्रीजचे थंड पाणी पिऊ नका. त्याऐवजी, भांडे किंवा घागरीतील पाणी प्या.

हे वाचा :- माठातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

● उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशामुळे तापमान उष्ण राहते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा सूर्याच्या तीव्र किरणांचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका, गरज पडल्यास चेहरा व डोके झाकूनच घराबाहेर पडा. याशिवाय डोळ्यांवर सनग्लासेस नक्कीच लावा, ज्यामुळे डोळ्यांचे रक्षण होईल. त्याच वेळी, जर तुम्हाला फिरायला जायचे असेल तर संध्याकाळी किंवा सकाळी सूर्यप्रकाश उष्ण होण्यापूर्वीच बाहेर जा.

● उन्हाळ्यात आरामदायक कपडे घाला. उन्हाळ्यात सैल आणि आरामदायी कपडे घालावेत. यामुळे तुम्हाला उष्णता कमी जाणवेल आणि तुम्हाला आराम वाटेल. सुती किंवा सैल कपडे परिधान केल्याने शरीरात हवेचे परिसंचरण सुरळीत राहते. सैल कापड्यामुळे आतमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत मिळेल. ( Garami madhye swasth kase rahave ) 

● नियमित व्यायाम करा अनेकदा उन्हाळा सुरू झाला की लोक व्यायामाबाबत बेफिकीर होऊन व्यायाम करणे सोडून देतात. खरं तर, उन्हाळ्यात व्यायामामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि अशक्तपणा येतो. म्हणूनच डॉक्टरांनीही व्यायाम करताना मधेच पाणी प्यावे असा सल्ला दिला आहे. व्यायाम केल्याने तुम्ही फिट राहतात. उन्हाळ्यात व्यायाम केल्यानेही शरीरातून घाम निघतो, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा ऋतू सर्वात फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यात जास्त व्यायाम करू नका हे लक्षात ठेवा.

● आहाराबाबत बेफिकीर राहू नका
उन्हाळ्यात लोकांना भूक कमी लागते. काही लोक खाण्याबाबत बेफिकीर होतात त्यामुळे त्यांना अशक्तपणा व अनेक समस्या जाणवू लागतात. म्हणूनच दररोज अन्न खाणे आवश्यक आहे. नियमित अन्न खाल्ल्याने शरीराला उष्णतेशी लढण्याची क्षमता मिळते. उन्हाळ्यात शक्यतो हलके अन्न खावेत. हलके अन्न म्हणून तुम्ही अधिकाधिक भाज्या आणि फळे खावू शकता. यामध्ये तुम्ही काकडी, लौकी, टरबूज, खरबूज, आंबा इत्यादींचा समावेश करू शकता.


हे पण वाचा :- उन्हाळ्यात आहार कसा असावा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site