Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Facebook चा वापर करून पैसे कसे कमवायचे How to earn money from facebook in marathi

How to make money from facebook marathi - फेसबुकवरून पैसे कसे कमवायचे

आजच्या काळात प्रत्येकाजवळ स्मार्टफोन असल्याने बहुतेक लोक फेसबुक वापरतात. तुम्ही पण वापरत असणारच. काही लोक फेसबुकचा वापर नवीन मित्र शोधायला, तर काही जण फक्त टाईमपास किंवा मनोरंजनासाठी करतात. पण तुम्हाला माहीत आहे का कित्येक लोक फेसबुक चा वापर फेसबुकवरून लाखो रुपये कमवण्यासाठी वापरतात. तुम्हालाही Facebook वापरून लाखो नाही तर त्याच्या जवळपास पैसे कमवायचे आहेत, तर ही पोस्ट पूर्ण वाचा आणि फेसबुक चा वापर करून पैसे कसे कमवायचे ( Facebook varun paise kase kamavayche )  याचे काही मार्ग आणि टिप्स जाणून घ्या.

फेसबुक वापरणे सर्वात सोपे आहे परंतु पैसे कमविण्यासाठी फेसबुक पेज चा वापर करणे थोडे कठीण आहे कारण त्यासाठी योग्य पद्धत आणि खूप सहनशीलतेचा आवश्यकता असते. Facebook वापरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील.

Facebook Page किंवा Facebook group तयार करून पैसे कमवा.

जर तुम्हाला Facebook चा वापर करून पैसे कमवायचे असतील तर तुमचे स्वतःचे facebook page किंवा facebook group असणे आवश्यक आहे. आणि आपल्या ग्रुप मध्ये व page वर जास्त लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. फक्त जास्त मेम्बर असणे आवश्यक नाही तर active member असणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला चांगल्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल. फेसबुक पेज किंवा ग्रुप बनवणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण त्यावर ट्रॅफिक आणने म्हणजेच आपण टाकलेल्या पोस्ट वर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळवने हे खूप अवघड काम आहे.

फेसबुकवर ट्रॅफिक आणण्यासाठी काय करावे? Facebook var audience aananyasathi kay karave?

1. कोणताही एक विषय (Niche) निवडा?

जर तुम्ही कोणत्याही एका विषयावर काम करत असाल, म्हणजे Niche वर, तर ते तुमच्या पेजवर लवकर ट्रॅफिक आणते ज्यांना त्या विषयात रस असतो अशी लोक या पेज वर लवकर येतात. याचा फायदा असा होतो की ग्रुप किंवा page द्वारे तुम्ही एखादे product विकले तर तो खरेदी केला जाऊ शकतो.

यासोबतच तुम्ही फेसबुकवर जाहिरात पण चालवू शकता आणि तिथे तुम्ही जिथे तुम्हाला वस्तू विकायची आहे ती जागा आणि प्रेक्षक तुम्हाला इन्स्ट्रेस्टमधून मिळतील. फेसबुक वर ऍड तयार करताना, तुमची जाहिरात आकर्षक आणि प्रतिसादात्मक असणं खूप महत्त्वाचं आहे, ते तुमच्या पेजपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेक्षकांना चांगला अनुभव देते.

2. फेसबुक पेज कसे वाढवायचे? Facebook page grow kase karayche?

फेसबुक पेज grow करण्यासाठी, तुम्हाला पेज वर सतत पोस्ट करत राहावे लागेल, तुम्हाला तुमच्या प्रेक्षकाशी जोडून राहावे लागेल जेणेकरून ते तुमचे पेज किंवा ग्रुप सोडणार नाहीत आणि नवीन प्रेक्षक तुमच्या पेजवर पोहोचू शकतील.

तुम्ही photo, video, Article यासारख्या कोणत्याही प्रकारे आपल्या विषयावर फेसबुक पोस्ट करू शकता किंवा आपण इन्फोग्राफिक्स देखील वापरू शकता. यामुळे प्रेक्षक तुमच्या ग्रुपवर पेजवर गुंतून राहतील.

फेसबुक वरून पैसे कसे कमवायचे  how to earn money facebook

जर तुम्ही ट्रॅफिक कसे वाढवायचे हे शिकलात, लोकांना आपल्या ग्रुप पेजवर गुंतून कसं ठेवता येईल हे शिकलात, तर Facebook वरून पैसे आरामात कमवू शकता, कारण ही संधी तुमच्यांकडे आली आहे. कारण तुम्ही यात खूप मेहनत घेतली आहे. Facebook वरून कमाई करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, जे तुम्हाला खाली दिसतील.

1. फेसबुक Freelancing कडून.

आजकाल प्रत्येक वेबसाइट किंवा कंपनीला ट्रॅफिकची आवश्यकता असते आणि ते फेसबुकचा वापर करतात परंतु प्रत्येकाकडे वेळ नसतो किंवा त्यांना फेसबुक पेज योग्यरित्या मॅनेज कसे करावे हे माहित नसते, यामुळे ते freelancing चा पर्याय निवडतात.

तुमच्यासाठी ही सर्वात मोठी संधी आहे की तुम्ही त्यांच्यासाठी फेसबुक पेज मॅनेज करू शकता जेणेकरून ते तुम्हाला याची चांगली रक्कम देतील.

जर एखाद्याला त्यांच्या व्यवसायासाठी प्रेक्षकांची गरज असेल आणि त्यांना Facebook वर जाहिराती चालवायची असतील तर तुम्ही त्यांना मदत करून म्हणजे आपल्या पेज वर किंवा ग्रुप वर जाहिरात करून चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही तुमच्यानुसार पैसे आकारू शकता, पण हे सर्व तुम्ही फक्त तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला फेसबुक जाहिरातींचे चांगले ज्ञान असेल किंवा तुम्हाला जाहिरात कशी चालवायची हे माहित असेल.

तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या क्लायंटसाठी त्याच पद्धतीने काम करू शकता आणि एकदा तुम्ही चांगले काम केले आणि त्यांनी तुमच्यावर विश्वास निर्माण केला तर, ते तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने अजून काम देतील.

2. Facebook Affiliate Marketing मधून पैसे कमवा.

जर तुमच्याकडे स्वतःचे एखादे product असेल तर तुम्ही ते फेसबुकवर सहज विकू शकता. यासोबतच तुम्ही दुसऱ्याचे product विकूनही त्यातून चांगले कमिशन मिळवू शकता.

जर तुमच्याकडे एखादे पेज असेल आणि त्यात भरपूर प्रेक्षक असतील तर तुम्ही Affiliate Marketing करून फेसबुक द्वारे लाखोंची कमाई करू शकता. तुम्ही दिलेल्या लिंक्सद्वारे जितके जास्त लोक ती वस्तू खरेदी करतात, तितके जास्त कमिशन तुम्हाला मिळेल.

हे देखील वाचा: ऑनलाइन पैसे कसे कमवायचे 10 मार्ग?

3. Facebook Sponsorship द्वारे.

तुमच्या पेजवर चांगली ट्रॅफिक असल्यास तुम्हाला अनेक Sponsorship च्या ऑफर मिळू शकतात. जर एखाद्याला त्यांच्या व्यवसायाबद्दल मार्केटिंग करायचे असेल, तर ते तुमच्याशी संपर्क साधू शकतात आणि त्यांच्या प्रॉडक्ट किंवा व्यवसायाबद्दल पोस्ट करण्यास सांगू शकतात.

Sponsorship मुळे तुम्हाला कमी वेळेत चांगले पैसे मिळतील. जर त्यांना तुमच्या पेजचे परफॉर्मन्स आवडत असेल, तर ते तुम्हाला त्यांच्या व्यवसायासाठी जाहिराती देण्यास वारंवार सांगू शकतात, ज्यासाठी ते चांगली रक्कम देऊ शकतात.

4. Facebook page किंवा group विकून.

जर तुमच्याकडे एक चांगले फेसबुक पेज किंवा ग्रुप असेल ज्यावर खूप जास्त लोकांचा सहभाग असेल आणि ते तुम्हाला विकायचे असेल तर तूम्ही तुमचे पेज विकू शकता. पेज जितके जुने आणि प्रेक्षक जास्त तितके तुम्ही ते जास्त किमतीला विकू शकता.

आजकाल fb पेज grow करायला वेळ लागतो, पण काही लोक असे आहेत, त्यांना पेज बनवण्या ऐवजी आधीच grow झालेले पेज विकत घेणे फायद्याचे वाटते जेणेकरून त्यांच्या व्यवसायात याचा फायदा व मदत होईल.

काही कंपन्या असतात ज्यांना अश्याच पेज किंवा ग्रुप चा शोध असतो ज्यावर लोकांचा चांगला प्रतिसाद असतो. ते तुम्हाला जास्तीत जास्त पैसे देऊन पेज किंवा ग्रुप विकत घेण्यास तयार असतात. त्यामुळे तुम्ही फक्त एक पेज बनवून किती कमाई करू शकता याचा अंदाज तुम्ही यावरूनच लावू शकता.

तुम्ही वर दिलेल्या माहितीचा पूर्ण उपयोग करून फेसबुक वरून पैसे कमावू शकता.


Conclusion निष्कर्ष

आज तुम्ही २०२२ मध्ये फेसबुक वरून पैसे कसे कमवायचे ( 2022 madhe Facebook varun paise kase kamavayache )  याबद्दल वाचले आणि मला आशा आहे की तुम्ही या पद्धती नक्कीच वापरून पहाल. Facebook वरून पैसे कमवण्यासाठी या मार्गांनी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करून पहा. तुम्हाला यात काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता. आम्ही शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देऊ आणि आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site