Ad code

Latest

6/recent/ticker-posts

E Shram Card काय आहे? | काय फायदे आहेत E Shram कार्ड चे, E Shram Card Benefits In मराठी

E Shram Card काय आहे? | काय फायदे आहेत E Shram कार्ड चे,  E Shram Card Benefits In Marathi

      नमस्कार वाचक परिवार आज या article मध्ये आपण ई-श्रम कार्डबद्दल बोलणार आहोत यामध्ये E Shram Card काय आहे? | E Shram कार्ड चे काय फायदे आहेत?. ई-श्रम कार्ड काढायला काय पात्रता लागते. या विषयीची संपूर्ण माहिती या article मध्ये तुम्हाला मिळणार आहे .

  श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ई-श्रम कार्डची ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे, आता तुम्ही घरबसल्या ई-श्रम कार्डची ऑनलाइन नोंदणी करू शकता. तुम्ही स्वत:साठी किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी बनवलेले E Shram Card मिळवू शकता, हे कार्ड बनवल्यानंतर, तुम्हाला सरकारच्या अनेक योजनांचा लाभ मिळेल.

 ई श्रम कार्ड काय आहे?
( E shram card  Kaay aahe? - What is e shram card in marathi )

   सरकार देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नागरिकांचा डेटाबेस तयार करत आहे. तुम्ही एक राष्ट्र एक कार्ड बद्दल ऐकले असेलच, या अंतर्गत संपूर्ण देशात एक शिधापत्रिका लागू करण्यात आली. त्याचप्रमाणे, ई-श्रम कार्डच्या मदतीने सरकार एक डेटा तयार करत आहे ज्यामध्ये देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांची सर्व माहिती सरकारकडे असेल. 

    E-shram card मध्ये जसा pan card मध्ये आपला universal Ac. no. असतो तसाच त्यावरती एक uan no असतो. या account ला आपला बँक account लिंक असतो. सरकार कडून जी काही आर्थिक मदत येते ती थेट इ श्रम कार्ड च्या मदतीने आपल्या बँक अकाउंट ला जमा होते. 

    देशात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ४० कोटीहुन अधिक कामगारांचा डेटा तयार केला जाईल. त्यामुळे या असंघटित कामगारांना अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे.


e shram card che fayde in marathi
ई श्रम कार्ड चे फायदे 

    सरकारची कोणतीही योजना जेव्हा जारी केली जाते तेव्हा त्याचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा हाच उद्देश असतो. अशाच प्रकारे, जर तुम्ही ई-श्रम कार्डची नोंदणी केली, तर तुम्हाला भविष्यात ई-श्रम योजनेचे अनेक फायदे पाहायला मिळतील. 

   तुम्ही ई-श्रम कार्डसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला सरकारकडून युनिक आयडी कार्ड मिळेल. ज्यावर एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. ई-श्रम कार्डसाठी अर्ज केल्याने, तुम्हाला पीएम सुरक्षा विमा योजनेचा लाभ देखील मिळेल आणि सरकार त्याचा 1 वर्षाचा प्रीमियम भरेल.

भविष्यात सरकारने कामगारांसाठी कोणतीही योजना आणल्यास त्याचा लाभ कामगारांना मिळेल. नवीन आणि चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आगामी काळात कोणत्याही आपत्तीमुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना आर्थिक लाभ द्यायचा असेल तर या ई-श्रम कार्डचा डेटा सर्व कामगारांना मदत करेल. 

  जर तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर तुम्ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी देखील अर्ज करू शकता.

 जर एखादी व्यक्ती असंघटित क्षेत्रात काम करत असेल आणि त्याचे ई-श्रमिक कार्ड बनवले असेल, तर सरकार त्याच्या मुलांना आगामी काळात शिष्यवृत्ती देऊ शकते. सध्या देशातील सर्व लोक असंघटित क्षेत्रात काम करत आहेत किंवा नाहीत सर्वांना एकाच प्रमाणात रेशन मिळत आहे, पण ई श्रमिक कार्डच्या डेटाच्या आधारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना इतरांपेक्षा जास्त रेशन मिळू शकते. 

    सरकारची इच्छा असल्यास भविष्यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना बँकांमधून बिनव्याजी कर्ज मिळू शकते.

   देशात असे अनेक मजूर आहेत जे रोजंदारी करून आपले पोट भरत आहेत जीवन जगत आहेत आणि त्यांच्याकडे राहायला घरही नाही. अशा परिस्थितीत भविष्यामध्ये सरकार त्यांना पीएम आवास योजनेअंतर्गत घरे देऊ शकते.

  ई-श्रम कार्डच्या डेटाबेसच्या आधारावर, राज्य सरकारांकडून तुमच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य दिले जाऊ शकते.

ई श्रम कार्ड चे तोटे काय आहेत?

   ज्या वस्तूचा व गोष्टीचे फायदे असतात त्याच प्रमाणे तोटे पण असतात. त्याच प्रकारे E Shram card चे फायदे खूप आहेत, तर त्याचे काही तोटे देखील आहेत, म्हणून जर आपण श्रम कार्ड तसेच ई श्रम कार्ड च्या तोट्याविषयी बोललो तर भविष्यात काहीही घडू शकते परंतु e shram card che fayade जास्त आहेत आणि तोटे कमी. तर पाहूया e sharm card che nuksan काय आहेत. काय होऊ शकत तुम्ही इ श्रम कार्ड काढल्यावर.

  जर तुम्ही असंघटित मजूर नसाल आणि तुम्ही ई-श्रम कार्ड काढले असेल, तर सरकारकडे जमा केलेल्या डेटामध्ये असंघटित गरीब मजुरांसह इतर लोकांचा डेटा देखील समाविष्ट असेल. त्यामुळे या प्रकरणात डेटा verify करण्यासाठी वेळ लागेल.

जर एखाद्याचे PF खाते असेल आणि त्याने ई-श्रम कार्ड बनवले असेल तर कुठेही अर्ज करताना अडचण निर्माण होऊ शकते.

   जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्ही E-shram card बनवले असेल तर तुम्ही असंघटित कामगारांच्या श्रेणीमध्ये याल. आणि भविष्यात तुम्ही संघटित क्षेत्रात काम केल्यास तुमच्या E-shram card चा काहीही उपयोग होणार नाही.
ई-श्रम कार्ड बनवल्यानंतर, तुम्हाला ते रद्द करायचे असेल किंवा delete करायचे असेल, तर पर्याय तो दिलेला नाही.

 ई श्रम कार्ड काढण्यासाठी काय पात्रता लागते
e shram card eligibility in marathi

  सरकार जेव्हा जेव्हा एखादी नवीन योजना जारी करते तेव्हा ती योजना सर्व नागरिकांसाठी असते किंवा देशातील कोणत्याही एका वर्गासाठी असते. आणि सर्व योजनांसाठी वेगवेगळी पात्रता ठरवली जाते.

  जर आपण ई-श्रम कार्डच्या पात्रतेबद्दल बोलायचे तर, असंघटित क्षेत्रात काम करणारे सर्व कामगार ई-श्रम कार्डसाठी पात्र आहेत.

E-shram card sathi lagnari patrata पुढील प्रमाणे

1. असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार.
2. वयाची 16 ते 59 वर्षामध्ये असणारे नागरिक.
3. जी व्यक्ती किंवा लोक income tax भरत नाही अशी लोक.
4. अर्जदार EPFO ​​आणि ESIC चा सदस्य नसावा.

तर वरील पात्रता असणारा व्यक्ती  E-shram card sathi apply करू शकतो. 
या लेखात, आम्ही तुम्हाला E-shram card kay aahe आणि त्या e-shram card che fayade v nuksan  या विषयी मराठीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर याला तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्कीच शेअर करा. 
धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site