Ad code

Latest

6/recent/ticker-posts

असे बनवा आपले e-Shram card फक्त 5 मिनिटात. ई श्रम कार्ड योजना 2022. ई श्रम कार्ड कसे बनवायचे ? E-shram card kase banvayache?

ई श्रम कार्ड योजना 2022. ई श्रम कार्ड कसे बनवायचे ?
E-shram card kase banvayache?


    नमस्कार मित्रांनो कसे आहात, आशा आहे की सर्व ठीक असेल. या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला e shram card kase kadhave? या सोबतच तुमचं e shram card download kase karayache? याची पूर्ण माहिती देणार आहोत. 

     तुम्हाला माहीतच असेल आपल्या भारत सरकारने कामगारांसाठी इ श्रम कार्ड नावाची एक योजना सुरू केली आहे, ज्याचा फायदा सर्व कामगार वर्गाला व इतरांना होणार आहे. मुलगा, मुलगी, महिला, वृद्ध, विधवा महिला, घटस्फोटित महिला, तरुण, प्रत्येक घटकासाठी शासनाने काही ना काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत हे आपणास माहिती आहे.

 
       तसेच आता सरकारने कामगार वर्गासाठीही एक जबरदस्त योजना सुरू केली आहे, तिचे नाव आहे ई-श्रम कार्ड योजना. या योजनेंतर्गत मजुरी करणाऱ्या प्रत्येकाला सरकार दरमहा ५०० ते 1000 रुपये देते. या पोस्ट आम्ही तुम्हाला या इ श्रम कार्ड या योजनेत कसं सहभागी होऊन या योजनेचा लाभ कसा घेता येईल व E-shram card kase banvayche हे सांगितले आहे.

E- shram कार्ड काय आहे हे जाणून घेण्यासाठी
इथे क्लिक करा👆

    मित्रांनो, सध्याच्या परिस्थिती मध्ये सर्व कामगार वर्गातील लोकांची कामे रखडली होती, परंतु आता सरकारने कामगार वर्गासाठी ई-श्रम ही योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये मजूर स्वतःची नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुमचे ई-श्रम कार्ड तयार झाल्यानंतर, तुम्ही सरकारच्या इतर योजनांशी जोडले जाता, व तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांचे लाभ मिळू लागतील.


ई श्रम कार्ड काढण्याचा हेतू


   कामगारांच्या हिताचे रक्षण करणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी, ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगारांना अनेक प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल, ज्यामुळे कामगारांचे जीवनमान आणि सन्मान वाढेल.

     ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून सरकार कामगारांचा डेटा गोळा करेल आणि त्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ दिला जाईल. आता तुमचे e-Shram हे डिजिटल असेल. सरकारने ई श्रमिक कार्ड बनवण्यासाठी ई श्रमिक पोर्टल सुरू केले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही या श्रमिक कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.


ई-श्रम कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
( E-shram card kadhanyasathi lagnari kagadpatre )

 • आधार कार्ड,
 • मोबाईल नंबर,
 • IFSC कोडसह बचत बँक खाते क्रमांक,
(जर तुमच्याकडे आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर नसेल तर, तुम्ही तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्राला (CSC) भेट देऊ शकता आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदणी करून तुमचं इ श्रम कार्ड काढू शकता.)

E- shram कार्ड काय आहे हे जाणून घेण्यासाठी
इथे क्लिक करा👆

ई श्रम कार्ड साठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी
( Online E-shram card kase kadhave -
Online registration for E-shram card on mobile in marathi
)

  जर तुम्हाला e-shram card ची ऑनलाइन नोंदणी करायची असेल, तर त्यासाठी आम्ही ई-श्रम कार्ड self registration ची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने येथे सांगितली आहे. ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे  e-shram card अगदी सहज बनवू शकाल.

स्टेप-1 : ई श्रम कार्ड तयार करण्यासाठी, सर्वात आधी तुमच्या web browser वर तुम्हाला E shram च्या अधिकृत वेबसाईट ( eshram.gov.in ) वर जावे लागेल.


स्टेप-2: ही वेबसाईट उघडल्यानंतर, तुम्हाला e-shram वर register on e-shram वर क्लिक करावे लागेल.
यानंतर, तुमच्यासमोर अशा प्रकारे एक नवीन self registration असा विंडो उघडेल.


 1.    या मध्ये सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
 2.    यानंतर समोर दिलेला captcha code तेथे भरावा लागेल. आणि खाली दिलेल्या दोन्ही पर्यायांमध्ये No वर क्लिक करा.
 3.    हे सर्व झाल्यानंतर send otp या बटणावर क्लिक करा.


स्टेप-3: आता तुम्ही रेजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर टाकला होता त्या नंबरवर एक OTP येईल, हा otp टाकल्यानंतर submit या बटणावर क्लिक करा.


स्टेप-4: आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करावा लागेल आणि I agree  या बॉक्स वर click करून सबमिट बटणावर क्लिक करा.स्टेप-5: आता तुमच्या कॉम्प्युटर/मोबाईल स्क्रीनसमोर ई-श्रम कार्ड बनवण्याचा फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुमच्या आधार कार्डशी संबंधित सर्व माहिती आपोआप येईल. यानंतर ही सर्व माहिती टप्प्याटप्प्याने भरावी लागेल.

यामध्ये

 • तुमचं आधार कार्ड,
 • तुमचे वैयक्तिक माहिती,
 • तुमचा रहिवासी पत्ता,
 • शैक्षणिक पात्रता,
 • रोजगार, व्यवसाय आणि कौशल्ये,
 • तुमच्या बँक खात्याची माहिती.


तेथे दिलेली सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर submit  वर क्लिक करावे लागेल. हे केल्यानंतर, तुमचे e-shram कार्ड तयार होईल आणि तुम्हाला एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) मिळेल आणि तो पूर्णपणे भिन्न असेल.


खाली तुम्हाला e-Shram कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ई-श्रम कार्ड डाउनलोड करू शकता.


     ई-श्रम कार्ड मधील फोटो तुमच्या आधार कार्ड प्रमाणेच असेल. आणि शेवटी तुम्हाला ई-श्रम कार्डची pdf फाईल मिळेल ती डाउनलोड करून त्याची प्रिंट करावी लागेल आणि ती लॅमिनेटेड केल्यानंतर ते कार्ड तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता.

    हा लेख वाचून कोणतीही व्यक्ती ई-श्रम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करू शकते. या लेखात, नोंदणीच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्हाला ई-श्रम पोर्टलवर ई-श्रम कार्डसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल किंवा तुम्हाला ई-श्रम कार्डबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या ई-श्रम कार्ड हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.

फोन नंबर: ०११-२३३८९९२८
टोल फ्री – 14434
ईमेल – eshramcare-mole@gov.in


निष्कर्ष
या Article मध्ये  आम्ही तुम्हाला तुमच्या E shram card sathi online registration kas karaych हे सांगितले आहे तसेच e dharm card download kase karayche  हे देखील सांगितले ज्यामध्ये तुम्ही ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्कीच शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site