Ad code

Latest

6/recent/ticker-posts

या 10 मार्गाने तुम्ही ऑनलाईन पैसे कमावू शकता How to make money online in marathi

या 10 मार्गाने तुम्ही ऑनलाईन पैसे कमावू शकता How to make money online in marathi

सध्याच्या डिजिटल जगात ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यामुळे आता तुम्ही कमी दिवसांत उत्तम कमाई करू शकता. प्रत्येकाला पैश्याची गरज असते म्हणून प्रत्येक जण रोज सकाळी उठून कामावर जातात व पैसे कमावतात. लोक अनेक मार्गांनी पैसे कमवतात, जसे की नोकरी करून, स्वतःचा व्यवसाय सुरू करून किंवा ऑनलाइन. प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. काही लोकांना हे माहीत असत की इंटरनेट चा वापर करून पैसे कसे कमवायचे याची पूर्ण माहीत असते, पण काही लोकांना याची पूर्ण माहिती नसते की ऑनलाईन पैसे कसे कमावले जातात म्हणूनच लोक रोज गुगलवर शोधत असतात की, 'ऑनलाइन पैसे कसे कमवायचे', 'गुगलवरून पैसे कसे कमवायचे', 'इंटरनेटवरून पैसे कसे कमवायचे', अशी माहिती लोक इंटरनेट वर शोधत असतात. प्रत्येकाला पैशाची गरज असते जेणेकरून ते त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील.

२०२२ मध्ये घरबसल्या ऑनलाइन पैसे कसे कमवायचे?

तर आजच्या या लेखात तुम्हाला कळेल की, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे. तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत असे काम शोधत आहात. जे घरी बसून सहज करता येइल आणि कोणत्याही गुंतवणुकीशिवाय पैसे कमवता येतील मग तुम्ही योग्य पेजवर आला आहात.

आजच्या काळात विद्यार्थ्यापासून गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सुद्धा आपल्या मोकळ्या वेळेचा योग्य वापर करून पैसे कमविण्याचा विचार करत असतो. जेणेकरुन ते त्यांचा खर्च सांभाळू शकतील व त्याच्या गरजा पूर्ण करू शकतील.येथे आम्ही तुम्हाला इंटरनेट च्या साहाय्याने पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगणार आहोत, जे तुम्ही घरी बसून सहज करू शकता. आणि तुम्ही पण पैसे कमवू शकता.

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मार्गांचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता. पुढे जाण्यापूर्वी या पोस्ट मध्ये दिलेली सर्व माहिती पूर्णपणे वाचा जेणेकरून तुम्हाला हे समजेल की कोणते काम करणे तुमच्यासाठी सोपे होईल.

येथे 10 अश्या ऑनलाईन कामाची माहिती दिलेली आहे ज्याचा वापर करून तुम्ही पण पैसे कमावू शकता व आपल्या गरजा पूर्ण करू शकता.

ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी कशाची गरज लागते
जर तुम्ही खरच online पैसे कमावू इच्छित आहेत तर तुमच्या कडे या गोष्टी असणे आवश्यक आहे.

1. SmartPhone/Laptop/Computer.
2. चांगलं Internet Connection.
3. तुमच्या कडे संयम आणि चिकाटी असणे गरजेचे आहे .
4. काय Real आहे आणि काय Scam आहे हे ओळखण्याची क्षमता.

या 10 मार्गांनी तुम्ही ऑनलाइन पैसे कमवू शकता
How to make money online in marathi

01). Blogging (ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे.)

Blogging हा ऑनलाइन पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग आहे. कोणीही चांगली मेहनत करून आणि निष्ठेने ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवू शकतो.

यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे self hosted website असावी. जेव्हा आपण ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे याचा विचार करतो, तेव्हा सामान्यत: पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जाहिरात. याशिवाय तुम्ही ब्लॉगिंग द्वारे पैसे कमावण्यासाठी Affiliate Marketing आणि Google AdSense चा वापर करू शकता.
ब्लॉगिंगच्या माध्यमातून जगभरातील बरेच लोक चांगले पैसे कमवत आहेत. बरेच लोक ब्लॉगिंग पार्ट टाईम जॉब म्हणून काम करतात आणि काही जण हा फुल टाइम म्हणून ब्लॉगिंग करतात .ब्लॉगिंगपासून लोक घरी बसून दरमहा लाखो रुपये कमवत आहेत. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण आपल्या संगणक तसेच मोबाईल वरून ब्लॉगिंग करू शकता. Blogging साठी आपल्याला घराबाहेर जाण्याची देखील गरज लागत नाही.
        आपण ब्लॉग तयार करून त्यावर विशिष्ट विषयावर माहिती लिहून पोस्ट टाकून तुम्ही तुमचा ब्लॉग इंटरनेट वर रँक करू शकता.आणि ब्लॉगवर adsence लावून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
सर्व प्रथम आपल्याला content वर लक्ष केंद्रित करावे लागेल व त्यासाठी कष्ट करावे लागेल, त्याशिवाय पैसे कमावणे अशक्य आहे. जर तुम्ही मन लावून ब्लॉग वर कष्ट केले तर येथे पैसे कमावणे खूपच सोपे आहे. माझ्या मते ऑनलाईन पैसे कमवायचा पद्धतीमध्ये ब्लॉगिंग पहिल्या नंबरला आहे.

02). YouTube वरून पैसे कसे कमवायचे.


तुम्हाला माहीत असेलही की लोक यूट्यूबवरून लाखो रुपये कमावतात. तर हा त्या लोकांसाठी एक चांगला पर्याय नाहीये का, ज्यांच्याकडे  विशिष्ट विषयात ज्ञान आहे, ते त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून youtube च्या माध्यमातून इतर लोकांना चांगले ज्ञान देऊ शकतात किंवा त्यांच्या व्हिडिओद्वारे त्यांचे मनोरंजन करू शकतात. गूगलनंतर यूट्यूब हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आपल्या सगळ्यांना यूट्यूब विषयी माहिती असेलच आपल्या पैकी खूप जण याचा उपयोग दर दिवशी करतच असतो.

YouTube एक व्हिडिओ Sharing प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर जगातील कोणीही व्यक्ती व्हिडिओ टाकू शकतो. हे एक फ्री प्लॅटफॉर्म आहे, यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत. आपण YouTube वर कोणत्याही विषया संबधीत व्हिडिओ अपलोड करू शकता. आपल्याला यूट्यूबवर सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील.

Youtube वरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला एक youtube चॅनेल बनवावे लागेल, त्यानंतर त्यामध्ये लोकांना आवडतील असे विडिओ अपलोड करावे लागतील. जेव्हा तुमच्या YouTube चॅनेलचे सदस्य वाढतात आणि तुमच्या अपलोड केलेल्या व्हिडिओंचे व्ह्यूज येऊ लागतात तेव्हा तुमचं चॅनेल वर monetization चालू होईल त्यानंतर तुम्ही youtube वर विडिओ टाकून आणि व्हिडिओवर जाहिराती देऊन चांगले पैसे कमवू शकता.


03).  Affiliate marketing ने पैसे कमवा

जर तुम्ही social media वर रोज वेळ घालवत असाल म्हणजेच facebook, instagram, youtube अश्या social media प्लॅटफॉर्म वर तुम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असेल किंवा तुमचा ब्लॉग किंवा वेबसाइट देखील असेल, तर तुम्ही affiliate marketing ने तुमची कमाई करू शकता.

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे यामध्ये Affiliate marketing मार्केटींग हा चांगला पर्याय आहे. आजच्या इंटरनेट च्या काळात सगळ्याच वस्तू ऑनलाईन उपलब्ध आहेत.आणि इंटरनेट स्वस्त झाल्यामुळे प्रत्येक जण आपला वेळ वाचवण्यासाठी दुकानात न जाता वस्तू ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तुम्ही यागोष्टीचा फायदा घेऊ शकता आणि तुमच्या मार्फत प्रत्येक विकल्या गेलेल्या वस्तू मागे commission घेऊन कमाई करू शकता.

Amazon, Flipkart आणि बऱ्याच अश्या Website आहेत ज्यांचे Affiliate Program जॉईन करून आपल्या ब्लॉग वर किंवा फेसबुक, इन्स्टाग्राम, youtube वर त्यांच्या प्रॉडक्ट ची जाहिरात करून त्या वस्तू विकून उत्तम प्रकारे कमाई करू शकता.

04). Digital marketing मधून पैसे कमवा.


आज काळाबरोबर पैसे कमावण्याच्या पद्धतींमध्ये बरेच बदल झाले आहेत, कारण पूर्वी तुम्हाला पैसे कमवण्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत काम करावे लागत होते, पण आता काळ बदलला आहे, आज असे अनेक मार्ग आहेत तुम्ही घरातून काम करू शकता आणि पैसे कमवू शकता. आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग हा एक असा शब्द आहे ज्यामध्ये अनेक शक्यता आहेत, डिजिटल मार्केटिंग द्वारे तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काही काम करावे लागणार नाही, तुमच्या या व्यवसायासाठी तुम्हाला तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर तासनतास खर्च करावे लागतील. .

Digital marketing मध्ये तुम्हाला कोणतीही वस्तू विकायची असेल तर बाहेर जावे लागत नाही, तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल, लॅपटॉप वरून त्या वस्तूची मार्केटिंग करू शकता व चांगले इनकम मिळवू शकता.

तुम्ही काही महिन्यांत डिजिटल मार्केटिंग शिकू शकता आणि तुमची स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकता. आणि तुम्ही घरबसल्या सहज पैसे कमवू शकता.


05). Social media वरून पैसे कसे कमवायचे.


सोशल मीडिया मार्केटिंग प्रचंड वेगाने वाढत जाणारी आणि जास्त वापरात असणारी पद्धत आहे, जी कधीही बंद होनार नाही. जर तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंगची आवड असेल, तर तुम्ही ऑनलाइन पैसे कमवण्याच्या अर्ध्या मार्गावर आला आहात.

तुम्ही Facebook, Instagram या सारख्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पेज सुरू करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार त्यावर कंटेंट पोस्ट तयार करू शकता.

याव्यतिरिक्त, तुमची सेवा व वस्तू विकण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी तुम्हाला पेजवर ट्रॅफिकची आवश्यकता असेल. एफिलिएट मार्केटिंग हा सोशल मीडियाद्वारे पैसे कमवण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. याद्वारे, तुम्ही विकलेल्या प्रत्येक वस्तू किंवा सेवेसाठी तुम्ही कमिशन मिळवता.

तुम्ही सोशल मीडियातील सर्वात प्रसिद्ध whatsapp, telegram आणि Quora वरून देखील पैसे कमवू शकता!

याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या सोशल मीडिया खात्यांद्वारे ब्रँड आणि उत्पादनांचा प्रचार करून पैसे कमावू शकता.


06). Photo विकून पैसे कमवा.


सध्या आपला स्मार्टफोन आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आताच्या स्मार्टफोन मध्ये खूप चांगळ्याप प्रतीचे कॅमेरे देखील आले आहेत आणि ते फोटो काढण्यासाठी उत्तम आहेत. जर तुम्हाला फोटो ग्राफीची आवड असेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनने काढलेल्या फोटोंमधून ऑनलाइन पैसे कमवू शकता. तुम्हाला फक्त निसर्ग, खाद्यपदार्थ, ठिकाणे, लोक, घरे इत्यादींचे चांगल्या क्वालिटी चे फोटो काढायची गरज आहे आणि त्यांची ऑनलाइन विक्री करायची आहे.

जेव्हा जेव्हा एखाद्या ग्राहकाला तुम्ही काढलेले फोटो आवडतील व त्याला तुमचे फोटो विकत घ्यायचे असतील तेव्हा तुम्ही ठरवलेल्या किंमतीनुसार तुम्हाला पैसे दिले जातील. एकाच फोटोसाठी तुम्ही अनेक वेळा पैसे कमवू शकता.

तुम्ही तुमचे फोटो या website द्वारे ग्राहकांना विकू शकता
Shutterstock, Fotolia, iStockPhoto, Photobucket अशा अनेक उत्तम साइट्स आहेत जिथे तुम्ही तुमचे फोटो सबमिट करू शकता आणि ते विकून पैसे कमावू शकता.

07). Online sell विक्री करून पैसे कमवा


ऑनलाइन विक्री ही पारंपारिक विक्रीसारखी नसते. या विक्री मध्ये तुमचा माल बाजारपेठेबाहेर विकण्यासाठी तुमच्याकडे मोकळीक मिळणार नाही पण ऑनलाइन विक्रीमध्ये तुम्ही तुमचे उत्पादन देशभरात विकून ऑनलाइन पैसे कमवू शकता.

ऑनलाइन सामान विकण्याचे 2 पर्याय आहेत.

पहिला पर्याय, तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट तयार करू शकता आणि तुमच्या वेबसाइटवरून तुमची उत्पादने, वस्तू, माल विकू शकता.

दुसरा पर्याय म्हणजे Amazon, Flipkart, Paytm, eBay, Snapdeal या सारख्या अनेक शॉपिंग वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला तुमचा माल विकण्याची मोकळीकता देते. तुम्ही या शॉपिंग पोर्टलवर विक्रेता बनून तुमचा माल ऑनलाईन कुठेही विकून उत्तम नफा मिकवू शकता.


08). Freelancing मधून पैसे कमवा


लहान असो किंवा मोठे प्रत्येक कलेला एक मूल्य असते. तुमच्या मध्ये असलेल्या कलेचा कौशल्याचा तुम्ही जास्तीत जास्त कसा फायदा घ्याल हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्या कंपनीला तुम्ही तुमच्या कौशल्याने काम करू शकता आणि त्या बदल्यात पगार मिळवू शकता.

किंवा तुम्ही बर्‍याच कंपन्यांसाठी काम करा आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून पैसे कमवा. Freelancing या दोघांचे एकत्रीकरण आहे. तुम्ही पूर्णवेळ नोकरी आणि फ्रीलान्सिंग या दोन्हीं गोष्टी करू शकता.

Freelancing प्रत्येकाला त्यांच्या मध्ये असलेल्या  कौशल्याने कमाई करण्याची ऑफर देते. आणि उत्तम इनकम मिळवण्यासाठी वापरले जाणारा एक मार्ग आहे.

जगातील सर्वात प्रसिद्ध कंपन्या – freelancer.com आणि elance.com अश्या अनेक कंपन्या तुम्हाला freelancer म्हणून काम करण्याची संधी देतात व तुमची चांगली कमाई होइल याचे मार्ग खुले करतात.


09). Online survey करून पैसे कमवा


विद्यार्थी आणि गृहिणीं तसेच आपल्या साठीही पैसे कमवण्याचा एक वेगवान आणि सोपा मार्ग म्हणजे ऑनलाइन सर्वे करून आपल्या फावल्या वेळेत कमाई करणे.

अशा अनेक सर्वे कंपन्या आहेत ज्या सामान्यतः इंटरनेट युजर्स ना त्यांच्या लोकप्रिय product and services वर त्यांच्या मतांसाठी व विचारांचे पैसे देतात. तसेच ते लोकांना त्यांच्या उत्पादनाची चाचणी घेण्यासाठी मोफत उत्पादने आणि सेवा देतात.

जर तुम्ही ऑनलाइन पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग शोधत असाल, तर तुम्ही विश्वासु सर्वे कंपनीकडे नोंदणी करण्याचा विचार करू शकता.

येथे खाली काही वेबसाइट दिल्या आहेत जिथे तुम्ही ऑनलाइन paid survey च काम करू शकता.
Swagbucks.
Prizerebel.


10). SMS पाठवून पैसे कमवा


एसएमएस पाठवून पैसे कमवा
एसएमएस पाठवण्याचे काम म्हणजे मोबाइल फोनवर मॅसेज पाठवणे. कुठल्याही गुंतवणुकीशिवाय पैसे मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. एसएमएस पाठवण्यासाठी कंपन्या चांगले पैसे देत आहेत.

हे सर्व अधिक आकर्षक बनवते ते म्हणजे येथे सगळेच जन मुक्त आहे. Sms पाठवणाऱ्या बहुतांश नोकर्‍या तुम्हाला दररोजचे पैसे देतील. त्यामुळे तुम्ही या नोकर्‍या कधीही वापरून पाहू शकता.

तसेच, या कामासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष कौशल्याची गरज लागणार नाही. फक्त तुमच्याकडे एक मोबाईल फोन आणि दररोज काही तासांची मेहनत करून तुम्ही चांगले रिटर्न मिळवू शकता.


तर या होत्या काही निवडक पद्धती ज्याचा उपयोग करून तुम्ही ऑनलाईन पैसे कमावू शकता. या पद्धतींनी तुम्हाला हे समजले असेल की online paise kase kamavayache. यात दिलेल्या कोणत्याही पद्धतीवर तुम्ही घरच्या आरामात काम करून सहज पैसे कमवू शकता. या सर्व पद्धती तुम्हाला मोफत काम करण्याची संधी देतात.

Conclusion- निष्कर्ष:

तर मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की Online kam karun paise kase kamavatat हे सोपे काम आहे. आता जर तुम्हाला घरी बसून online paise kamavayache असतील तर मला आशा आहे की ही पोस्ट तुम्हाला खूप मदत करेल. येथे आम्ही वर 10 मार्ग ज्याने ऑनलाईन पैसे कमावले जातात हे सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन पैसे कमवू शकता आणि तुम्हाला त्यात गुंतवणूक करण्याचीही गरज लागत नाही.

तर मित्रांनो, जर तुम्हाला आमची Online Paise कसे Kamavayche ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल देखील माहिती मिळू शकेल आणि आम्हाला कमेंट करून सांगू शकतील की तुम्ही यापैकी कोणते काम करत आहात किंवा ऑनलाइन पैसे कमवू इच्छित आहात.

धन्यवाद


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Menu Site